एक्स्प्लोर

Girish Mahajan : एकदा निवडून दाखवा उगाच तोंडाच्या वाफा सोडू नका; गिरीश महाजनांनी एकनाथ खडसेंना डिवचले

Girish Mahajan On Eknath Khadse : एकनाथ खडसेंनी लोकसभेला उभे राहावं आणि निवडून येऊन दाखवावं असं थेट चॅलेंज गिरीश महाजन यांनी दिले आहे.

Girish Mahajan On Eknath Khadse :  जळगावमध्ये भाजप नेते आणि राज्याचे मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्यात पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे. खडसेंनी राष्ट्रवादीच्या शिबिरात सरकारवर टीका केली होती. त्यानंतर आता गिरीश महाजन यांनी थेट खडसे यांनाच आव्हान दिले आहे. खडसे यांनी मतदार संघात एकदा निवडून दाखवावे, उगाच तोंडाच्या वाफा सोडू नका अशा शब्दांत महाजनांनी डिवचले. 

महायुतीचे सरकार हे अपयशी असल्याचे वक्तव्य एकनाथ खडके यांनी शिर्डी येथील पक्षाच्या अधिवेशनादरम्यान केले होते. एकनाथ खडसेंच्या या वक्तव्याचा गिरीश महाजन यांनी चांगला समाचार घेतला आहे. एकनाथ खडसेंनी लोकसभेला उभे राहावं आणि निवडून येऊन दाखवावं असं थेट चॅलेंज गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंना दिले आहे. निवडणुकीत उभा राहिल्यावर कळेल की यश अपयश कोणाचं आहे. त्यामुळे एकनाथ खडसेंनी उगाच तोंडाच्या वाफा सोडू नये असा हल्लाबोल गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंवर केला आहे. 

लोकसभेच्या उमेदवारी बाबत आपल्या नावाच्या चर्चेत गिरीश महाजनांनी खंडन केलं आहे. मी आमदार आहे आमदारच राहणार असे गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले आहे. माझा लोकसभेचा कोणताही विचार नसून माध्यमांनीच हा विषय काढला असल्याचे त्यांनी म्हटले. तर आपल्याला सत्तेची हाव नसून पक्षाने आमदारकी नाही दिली तरी आपण पक्षाचे काम करत राहू. त्यामुळे इकडे पडलो की तिकडे जायचं चोऱ्या माऱ्या करायच्या असे उद्योग मी करत नसल्याचे म्हणत गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंना टोला लगावला आहे. 

देशभरात स्वच्छता मोहीम सुरू आहे, राजकीय आकासाचा गैरसमज नको

गिरीश महाजन यांना रोहित पवार यांच्या कार्यालयावरील छाप्यांबाबत विचारले असता त्यांनी म्हटले की, देशभरात स्वच्छता मोहीम सुरू त्यामुळे राजकीय आकासातून केलं जातंय असा गैरसमज करू नये. ज्यांच्यावर संशय आहे त्या सर्वांवर छापेमारी सुरू आहे. तुम्ही काही केलं नसेल तर तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. संघर्ष यात्रा काढल्या म्हणून तुम्हाला सर्व माफ असतं का? केंद्रीय यंत्रणेला संशयास्पद आढळला असेल म्हणून त्यांचा तपास सुरू असल्याचे त्यांनी म्हटले. रोहित पवार प्रामाणिक असतील तर त्यांना घाबरण्याचं कारण नाही, असा सल्लाही त्यांनी दिला. 

इतर महत्त्वाच्या बातम्या :

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

रेल्वे अभियंत्यांवरील FIR मागे घ्या , मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांचं ऐन गर्दीच्या वेळी आंदोलन, लोकल सेवा पाऊण तास ठप्प झाल्यानंतर पुन्हा सुरु
मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांचं ऐन गर्दीच्या वेळी आंदोलन, लोकल पाऊण तास ठप्प, मध्य व हार्बर मार्गावरील लोकल उशिरानं
मोठी बातमी! मुंबईत धावत्या लोकलमधून 4 जण खाली पडले; आंदोलनामुळे स्टेशनवर गर्दी, ट्रेन खोळंबल्या
मोठी बातमी! मुंबईत धावत्या लोकलमधून 4 जण खाली पडले; आंदोलनामुळे स्टेशनवर गर्दी, ट्रेन खोळंबल्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 नोव्हेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 नोव्हेंबर 2025 | गुरुवार
महार वतनातील जमीन म्हणजे काय, वारसदारांना विकता येते का; ब्रिटीशकालीन इतिहास काय सांगतो?
महार वतनातील जमीन म्हणजे काय, वारसदारांना विकता येते का; ब्रिटीशकालीन इतिहास काय सांगतो?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Omkar Beat Case :'ओंकार' हत्तीला अमानुष मारहाण, व्हिडीओ व्हायरल
Parth Pawar Case : पार्थ पवार जमीन प्रकरणी चौकशी समिती गठीत
Mahayuti Rift: 'प्रत्येक कार्यकर्त्याची भावना स्वबळाची', Nitesh Rane यांचा Sindhudurg मध्ये नारा
Eknath Shinde On Foresst Department : 'यानंतर एकही मृत्यू होता कामा नाही', उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांचा वनविभागाला इशारा
Parth Pawar Land Deal: पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरण, मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रेल्वे अभियंत्यांवरील FIR मागे घ्या , मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांचं ऐन गर्दीच्या वेळी आंदोलन, लोकल सेवा पाऊण तास ठप्प झाल्यानंतर पुन्हा सुरु
मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांचं ऐन गर्दीच्या वेळी आंदोलन, लोकल पाऊण तास ठप्प, मध्य व हार्बर मार्गावरील लोकल उशिरानं
मोठी बातमी! मुंबईत धावत्या लोकलमधून 4 जण खाली पडले; आंदोलनामुळे स्टेशनवर गर्दी, ट्रेन खोळंबल्या
मोठी बातमी! मुंबईत धावत्या लोकलमधून 4 जण खाली पडले; आंदोलनामुळे स्टेशनवर गर्दी, ट्रेन खोळंबल्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 नोव्हेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 नोव्हेंबर 2025 | गुरुवार
महार वतनातील जमीन म्हणजे काय, वारसदारांना विकता येते का; ब्रिटीशकालीन इतिहास काय सांगतो?
महार वतनातील जमीन म्हणजे काय, वारसदारांना विकता येते का; ब्रिटीशकालीन इतिहास काय सांगतो?
Indurikar Maharaj : इंदुरीकर महाराजांचं ट्रोलर्संना सडेतोड उत्तर; लेकीच्या राजशाही साखरपुड्यावरून डिवचणाऱ्यांना स्पष्टच सांगितलं
इंदुरीकर महाराजांचं ट्रोलर्संना सडेतोड उत्तर; लेकीच्या राजशाही साखरपुड्यावरून डिवचणाऱ्यांना स्पष्टच सांगितलं
मोठी बातमी! असलं काहीही चुकीचं केलेलं मला चालणार नाही; पार्थ पवार जमीनप्रकरणावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
मोठी बातमी! असलं काहीही चुकीचं केलेलं मला चालणार नाही; पार्थ पवार जमीनप्रकरणावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
Supriya Sule on Parth Pawar: पार्थ पवारांवर महार वतनाच्या 1800 कोटींच्या जमिनीवर 300 कोटीत डल्ला मारल्याचा आरोप; आत्या सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया आली
पार्थ पवारांवर महार वतनाच्या 1800 कोटींच्या जमिनीवर 300 कोटीत डल्ला मारल्याचा आरोप; आत्या सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया आली
आई-वडिलांवर कुऱ्हाडीने घाव घातला, नंतर स्वतःलाही संपवलं... एकाच दिवशी कुटुंब संपलं, बुलढाण्यातील थरार
आई-वडिलांवर कुऱ्हाडीने घाव घातला, नंतर स्वतःलाही संपवलं... एकाच दिवशी कुटुंब संपलं, बुलढाण्यातील थरार
Embed widget