एक्स्प्लोर

Eknath Khadse vs Chandrakant Patil : विधानसभेआधीच एकनाथ खडसे-चंद्रकांत पाटलांमध्ये कलगीतुरा, थेट अरे-तुरेची भाषा, जळगावात राजकीय वातावरण तापलं!

Eknath khadse vs Chandrakant Patil : गेल्या तीस वर्षापासून एकनाथ खडसे आणि चंद्रकांत पाटील यांच्यामध्ये राजकीय वैमनस्य असल्याचं मुक्ताईनगरमध्ये पाहायला मिळाले आहे.

जळगाव : भाजपच्या (BJP) वाटेवर जाणार असल्याचे सांगणारे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे (NCP Sharad Pawar Group) ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी पुढील काळात राष्ट्रवादी पक्षातच राहणार असल्याचे संकेत दिले आहेत. यांनतर मुक्ताईनगरचे शिवसेना शिंदे गटाचे (Shiv Sena Shinde Group) आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि एकनाथ खडसे यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपांचा कलगीतुरा रंगल्याचे पाहायला मिळत आहे. 

गेल्या तीस वर्षापासून एकनाथ खडसे आणि चंद्रकांत पाटील यांच्यामध्ये राजकीय वैमनस्य असल्याचं मुक्ताईनगरमध्ये पाहायला मिळाले आहे. त्यामुळं हे दोन्ही नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याची एकही संधी सोडत नाही. त्यातच एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी पक्षासोबत राहणार असल्याचे वक्तव्य केले होते. 

खडसेंकडून कुटुंबाच्या स्वार्थाचं राजकारण : चंद्रकांत पाटील

यावर आमदार चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसे हे जनतेच्या विकासाचे राजकारण न करता कुटुंबाच्या स्वार्थाचे राजकारण करत असल्याचा आरोप केला होता. एकनाथ खडसे हे रंग बदलणारे सरपटणारे प्राणी आहेत. आपण आमदार झाल्याचे त्यांना सहन होत नसल्याने आणि वयामुळे ते भ्रमिष्ट झाले आहेत म्हणून ते काहीही बोलतात आणि वागतात. त्यांना आपण फारसे गंभीरतेने घेत नाही, असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटले. 

चंद्रकांत पाटील खोकेबाज आमदार : एकनाथ खडसे 

यावर उत्तर देताना एकनाथ खडसे यांनी चंद्रकांत पाटील हे खोकेबाज आमदार असल्याचा आरोप केला आहे. तसेच एकनाथ खडसे यांनी चंद्रकांत पाटलांवर टीका करताना एकेरी भाषेचा उल्लेख केला त्यांनी म्हटलंय की, चंद्रकांत पाटलांना नीतिमत्ता आहे का? तुझी नियत आहे का? राष्ट्रवादीच्या बळावर निवडून आला त्यांना टांग मारून परत म्हणतो मी उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा आहे. आता म्हणतोय मी शिंदे साहेबांचा आहे. नेमका तू कोणाचा आहे? सरड्यासारखा रंग कोण बदलत आहे? तू बदलतोय का मी बदलतोय? मी तर अजून कुठल्याच पक्षात गेलेलो नाही, अशी पलटवार एकनाथ खडसे यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर केलाय.  

आरोप-प्रत्यारोपांचा कलगीतुरा

बोडवड उपसा जलसिंचन योजनेबाबतदेखील दोन्ही नेते एकमेकांवर आरोप करताना पाहायला मिळत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत आमदार चंद्रकांत पाटील आणि खडसे परिवारात आमना-सामना होण्याची शक्यता निर्माण झाल्याने या दोन्ही नेत्यांमधील आरोप प्रत्यारोप कलगीतुरा आतापासूनच रंगल्याचे दिसून येत आहे. 

आणखी वाचा 

Eknath Khadse: राज्यात महाविकास आघाडीचं सरकार यावं, एकनाथ खडसेंनी सांगितलं कारणं, म्हणाले महायुतीचा अनुभव....

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Numerology : अत्यंत साधेभोळे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; कोणीही यांना पटकन फसवतं, यांच्या साध्या स्वभावाचा लोक नेहमीच घेतात फायदा
अत्यंत साधेभोळे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; कोणीही यांना पटकन फसवतं, यांच्या साध्या स्वभावाचा लोक नेहमीच घेतात फायदा
Thane  : महिलांची छेडछाड होऊ नये म्हणून साध्या वेशातील पोलिस तैनात, गणेश विसर्जनासाठी ठाण्यात 9 हजार पोलिसांचा फौजफाटा
महिलांची छेडछाड होऊ नये म्हणून साध्या वेशातील पोलिस तैनात, गणेश विसर्जनासाठी ठाण्यात 9 हजार पोलिसांचा फौजफाटा
Ganesh Visarjan 2024 Time : अनंत चतुर्दशीला 'या' शुभ मुहूर्तावर करा गणपतीचं विसर्जन; पाहा योग्य पूजा पद्धत आणि साहित्य
गणपती विसर्जनासाठी शुभ मुहूर्त कोणता? पाहा योग्य पूजा पद्धत आणि साहित्य
रामगिरी महाराज आणि नितेश राणे यांना अटक करा, सर्वोच्च न्यायालयात याचिका 
रामगिरी महाराज आणि नितेश राणे यांना अटक करा, सर्वोच्च न्यायालयात याचिका 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 16 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 11 PM 16 September 2024 : ABP MajhaRaj Thackeray Special Report : Aaditya Thackeray यांच्या मतदारसंघात राज ठाकरे सक्रिय?Sanjay Gaikwad Special Report : गायकवाड, शिरसाट ते पडळकर; बेताल वक्तव्यांचं राजकारण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Numerology : अत्यंत साधेभोळे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; कोणीही यांना पटकन फसवतं, यांच्या साध्या स्वभावाचा लोक नेहमीच घेतात फायदा
अत्यंत साधेभोळे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; कोणीही यांना पटकन फसवतं, यांच्या साध्या स्वभावाचा लोक नेहमीच घेतात फायदा
Thane  : महिलांची छेडछाड होऊ नये म्हणून साध्या वेशातील पोलिस तैनात, गणेश विसर्जनासाठी ठाण्यात 9 हजार पोलिसांचा फौजफाटा
महिलांची छेडछाड होऊ नये म्हणून साध्या वेशातील पोलिस तैनात, गणेश विसर्जनासाठी ठाण्यात 9 हजार पोलिसांचा फौजफाटा
Ganesh Visarjan 2024 Time : अनंत चतुर्दशीला 'या' शुभ मुहूर्तावर करा गणपतीचं विसर्जन; पाहा योग्य पूजा पद्धत आणि साहित्य
गणपती विसर्जनासाठी शुभ मुहूर्त कोणता? पाहा योग्य पूजा पद्धत आणि साहित्य
रामगिरी महाराज आणि नितेश राणे यांना अटक करा, सर्वोच्च न्यायालयात याचिका 
रामगिरी महाराज आणि नितेश राणे यांना अटक करा, सर्वोच्च न्यायालयात याचिका 
Ganesh Visarjan 2024 : मंगळवारी गणपतीचं विसर्जन करणं योग्य की अयोग्य? शास्त्र सांगते...
मंगळवारी गणपतीचं विसर्जन करणं योग्य की अयोग्य? शास्त्र सांगते...
अग्निशमनच्या जवानांच्या उड्या, जिवाची बाजी लावली; गोदावरीत बुडणाऱ्या 50 वर्षीय व्यक्तीला वाचवलं
अग्निशमनच्या जवानांच्या उड्या, जिवाची बाजी लावली; गोदावरीत बुडणाऱ्या 50 वर्षीय व्यक्तीला वाचवलं
आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणस्थळी धनगर बांधवाचे विष प्राशन; तत्काळ रुग्णालयात हलवले
आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणस्थळी धनगर बांधवाचे विष प्राशन; तत्काळ रुग्णालयात हलवले
Weekly Lucky Zodiacs : पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी ठरणार चमत्कारी; उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले, अपार धनलाभाचे संकेत
पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी ठरणार चमत्कारी; उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले, अपार धनलाभाचे संकेत
Embed widget