एक्स्प्लोर

Yuvraj Singh : शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ युवराज सिंग, वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय

Yuvraj Singh Birthday : युवराज सिंग आज 39 वर्षाचा झाला आहे. दिल्लीत चाललेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवत त्याने यावर्षी आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतलाय

चंदीगड: टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने आज 39 वर्षाचा झाला आहे. दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवत त्याने यावर्षी आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. वाढदिवसानिमित्त आपली इच्छा व्यक्त करताना युवराज सिंगने म्हटलं आहे की शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या लवकर पूर्ण होवोत. त्याच सोबत आपले वडील योगराज सिंह यांच्या वक्तव्यावर त्याने नाराजी व्यक्त करत ते वक्तव्य निराशाजनक असल्याचं सांगितलं आहे.

युवराज सिंहने शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ एक संदेश लिहला आहे. त्यात त्यानं म्हटलं आहे की, "प्रत्येकाला वाढदिवसानिमित्त आपली इच्छा व्यक्त करण्याची संधी असते. आजचा वाढदिवस साजरा करण्यापेक्षा केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांच्यात सुरु असलेल्या चर्चेतून मार्ग निघावा अशी माझी इच्छा आहे."

युवराज सिंगने शेतकऱ्यांचा देशाची लाईफलाइन असा उल्लेख केला. त्याने म्हटले आहे की, "शेतकरी आपल्या देशाची लाईफलाइन आहेत. अशी कोणतीही समस्या नसते की ज्यातून मार्ग निघत नाही. चर्चेच्या माध्यमातून प्रत्येक मुद्दा सोडवता येऊ शकतो."

वडिलांचे वक्तव्य निराशाजनक युवराज सिंगने आपल्या वडिलांनी केलेलं वक्तव्य निराशाजनक असल्याचं सांगत त्यावर नाराजी व्यक्त केली. तो म्हणाला की, "मी भारतीय असल्याचा मला अभिमान आहे. योगराज सिंह यांचं वक्तव्य अत्यंत निराशाजनक आहे आणि त्याचा माझ्याशी काही संबंध नाही."

काय म्हणाले होते युवराजचे वडील? काही दिवसापूर्वी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा द्यायला गेलेले युवराज सिंहचे वडील योगराज सिंह यांनी हिंदूंच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केलं होतं. पंजाबी भाषेत त्यांनी केलेल्या भाषेत त्यांनी महिलांच्याबद्दलही आक्षेपार्ह शब्द वापरले होते. त्यांचे भाषण सोशल मीडियावर व्हायरल झालं होतं.

अजूनही कोरोनाचं संक्रमण कमी झालं नसून प्रत्येकाने काळजी घ्यावी असंही त्यानं सांगितलंय. युवराज सिंह एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखला जायचा. त्याने 2019 साली क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली. भारतीय संघासाठी त्याने आतापर्यंत 40 कसोटी, 304 एकदिवसीय सामने आणि 54 टी20 सामने खेळले आहेत.

महत्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे
Maharashtra Live News Updates: सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे
शिक्षण सचिवांची बदली करत पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांची नियुक्ती केली ज्यांच्यावर कित्येक कोटींच्या गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप, हा देशातील तरुणांचा अपमान, अभिजित दिपकेंचा हल्लाबोल
शिक्षण सचिवांची बदली करत पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांची नियुक्ती केली ज्यांच्यावर कित्येक कोटींच्या गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप, हा देशातील तरुणांचा अपमान, अभिजित दिपकेंचा हल्लाबोल
Delhi Police : पहिल्यांदा दिल्लीत 18 ऑक्टोबरपर्यंत राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू अन् आता सर्व पोलिसांच्या सुट्ट्या रद्द; पोलिस आयुक्तांना कोणालाही ताब्यात घेत तीन महिने नजरकैदेत ठेवण्याचा अधिकार
पहिल्यांदा दिल्लीत 18 ऑक्टोबरपर्यंत राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू अन् आता सर्व पोलिसांच्या सुट्ट्या रद्द; पोलिस आयुक्तांना कोणालाही ताब्यात घेत तीन महिने नजरकैदेत ठेवण्याचा अधिकार
Supreme Court : 'आम्ही हे असेच सोडून देऊ शकत नाही...' नीट पेपरफुटी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाची कठोर भूमिका, विद्यार्थ्यांच्या हिताबाबत गंभीर असल्याचे निरीक्षण
'आम्ही हे असेच सोडून देऊ शकत नाही...' नीट पेपरफुटी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाची कठोर भूमिका, विद्यार्थ्यांच्या हिताबाबत गंभीर असल्याचे निरीक्षण, कोर्टात नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report
Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report
CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report
NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिक्षण सचिवांची बदली करत पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांची नियुक्ती केली ज्यांच्यावर कित्येक कोटींच्या गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप, हा देशातील तरुणांचा अपमान, अभिजित दिपकेंचा हल्लाबोल
शिक्षण सचिवांची बदली करत पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांची नियुक्ती केली ज्यांच्यावर कित्येक कोटींच्या गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप, हा देशातील तरुणांचा अपमान, अभिजित दिपकेंचा हल्लाबोल
ऐकावं ते नवल, परभणीत चक्क बोकड देतंय दररोज पाऊल लिटर दूध; पशुवैद्यक तज्ज्ञांनी सांगितलं कारण
ऐकावं ते नवल, परभणीत चक्क बोकड देतंय दररोज पाऊल लिटर दूध; पशुवैद्यक तज्ज्ञांनी सांगितलं कारण
शाळेत विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्यांवर कारवाई होते, मग दिल्लीत, मुंबईत...; राज ठाकरेंचा सवाल, आदेश देण्याऱ्यांवर रोख
शाळेत विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्यांवर कारवाई होते, मग दिल्लीत, मुंबईत...; राज ठाकरेंचा सवाल, आदेश देण्याऱ्यांवर रोख
Pune Crime News : पुण्यातील पेठेत सकाळच्या सुमारास थरार! पूर्ववैमनस्यातून तरुणावर गोळ्या झाडल्या अन्...; हल्लेखोराला पोलिसांनी घेतले ताब्यात
पुण्यातील पेठेत सकाळच्या सुमारास थरार! पूर्ववैमनस्यातून तरुणावर गोळ्या झाडल्या अन्...; हल्लेखोराला पोलिसांनी घेतले ताब्यात
'मी यांना घाबरत नाही, हिंदू असून इथंच मरून दफन होऊन जाईन...' सर आताच मारुन टाका, मारून टाका म्हणत दिल्ली पोलिसांच्या अत्याचाराला निधड्या छातीनं भिडलेला नागपूरचा भारत काय काय म्हणाला?
'मी यांना घाबरत नाही, हिंदू असून इथंच मरून दफन होऊन जाईन...' सर आताच मारुन टाका, मारून टाका म्हणत दिल्ली पोलिसांच्या अत्याचाराला निधड्या छातीनं भिडलेला नागपूरचा भारत काय काय म्हणाला?
PM Modi Video: 'मित्रों' नाही तर 'फ्रेंड्स', कॅमेरा ना अँगल, वापरला सेल्फी कॅमेरा! पंतप्रधान मोदींनी अवघ्या 3 मिनिटांचा व्हिडीओ शेअर केला अन्..., Gen Zचं लक्ष वेधण्यासाठी केलेली कृती चर्चेत
'मित्रों' नाही तर 'फ्रेंड्स', कॅमेरा ना अँगल, वापरला सेल्फी कॅमेरा! पंतप्रधान मोदींनी अवघ्या 3 मिनिटांचा व्हिडीओ शेअर केला अन्..., Gen Zचं लक्ष वेधण्यासाठी केलेली कृती चर्चेत
Mumbai Police Student Girl Harassment: दीपक बल्लाळ नावाच्या पोलिसाने तरुणीला आक्षेपार्ह पद्धतीने पकडलं; नेमकं काय घडलेलं?, पोलिसांनी सगळं सांगितलं!
दीपक बल्लाळ नावाच्या पोलिसाने तरुणीला आक्षेपार्ह पद्धतीने पकडलं; नेमकं काय घडलेलं?, पोलिसांनी सगळं सांगितलं!
Maharashtra kharif Sowing: महाराष्ट्रात खरीप पेरणीचा वेग वाढला; किती टक्के पेरणी पूर्ण? सोयाबीन, तूर, मक्याचा पेरा कुठवर? वाचा एकाच क्लिकवर
महाराष्ट्रात खरीप पेरणीचा वेग वाढला; किती टक्के पेरणी पूर्ण? सोयाबीन, तूर, मक्याचा पेरा कुठवर? वाचा एकाच क्लिकवर
Embed widget