एक्स्प्लोर
राजकीय फायद्यासाठी हिंसाचार होऊ दिला, हायकोर्टाची खट्टर सरकारला फटकार
कोणत्याही राजकीय, सामाजिक किंवा धार्मिक नेत्याने भडकाऊ विधानं करु नयेत. जर कोणी असं केलं तर त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करा, असा आदेशही न्यायालयाने दिला होता.
चंदीगड : बाबा गुरमीत राम रहीमच्या निकालानंतर उसळलेल्या हिंसाचाराप्रकरणी पंजाब-हरियाणा हायकोर्टाने खट्टर सरकारला जोरदार फटकारलं आहे. राजकीय फायद्यासाठी हिंसाचार होऊ दिला. सरकारने शरणागती पत्करल्याचं वाटत आहे, अशा शब्दात हायकोर्टाने मनोहरलाल खट्टर सरकारला सुनावलं.
साध्वीवर बलात्कार केल्याप्रकरणी 15 वर्षांनी दोषी ठरल्यानंतर बाबा राम रहीमच्या समर्थकांनी अक्षरश: हैदोस घातला. हरियाणा आणि पंजाबमध्ये आतापर्यंत 31 जणांचा मृत्यू झाला असून 250 पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. मृतांमध्ये 29 पंचकुला आणि 2 सिरसामधील आहे.
याची नुकसानभरपाई डेरा सच्चा सौदाकडून वसूल करावी, असा आदेश पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने दिला होता.
कोर्टात येताना राम रहीमच्या गाड्यांच्या ताफ्यात 100 हून जास्त गाड्या कशा आल्या? गुप्तचर यंत्रणांकडून माहिती मिळूनही सरकारने गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आवश्यक पावलं का उचलली नाहीत? कलम 144 लागू केल्यानंतर पंचकुलामध्ये एवढ्या मोठ्या संख्येने अनुयायी कसे पोहोचले, असे सवाल हायकोर्टाने राज्य सरकारला विचारले.
याशिवाय कोणत्याही राजकीय, सामाजिक किंवा धार्मिक नेत्याने भडकाऊ विधानं करु नयेत. जर कोणी असं केलं तर त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करा, असा आदेशही न्यायालयाने दिला होता.
अशी परिस्थिती हातळण्यासाठी अधिकाऱ्यांनी कोणत्याही भीतीशिवाय आणि निष्पक्षपणे आपलं काम करावं. एखादा अधिकारी आपल्या कर्तव्यात कमी पडला तर त्याविरोधात न्यायालय कठोर कारवाई करेल, असंही उच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.
हायकोर्टाने राज्यातील कायदा-सुव्यवस्थेबाबत हरियाणा सरकारचे कान उपटले होते. निकालानंतर परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जर शस्त्र किंवा बळाचा वापर करावा लागल्यास तर मागे हटू नका, असंही हायकोर्टाने सांगितलं होतं.
संबंधित बातम्या
राम रहीमच्या डेरावर कारवाई, मुख्यालयात सैन्य घुसलं
गुरमीत राम रहीमनंतर ‘ही’ महिला डेरा सच्चा सौदाची प्रमुख?
व्हिडिओ : पंचकुलामध्ये राम रहीमच्या गुंडांचा जिल्हाधिकाऱ्यांवरच हल्ला
बाबा राम रहीमला व्हीआयपी ट्रीटमेंट, एसी खोलीत रात्र घालवली
बाबा राम रहीम समर्थकांचा पंजाब-हरियाणात धुडगूस, 30 जणांचा मृत्यू
भाजप खासदार साक्षी महाराजांकडून राम रहीमचं समर्थन
अमित शाह आणि मोदींची बैठक, मनोहरलाल खट्टर यांची खुर्ची धोक्यात?
कोर्टातून हेलिकॉप्टरने थेट तुरुंगात, राम रहीम कडेकोट सुरक्षा बंदोबस्तात
राम रहीमची संपत्ती विकून लोकांना नुकसान भरपाई द्या : हायकोर्ट
बलात्कार प्रकरणात बाबा गुरमीत राम रहीम दोषी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement