Yogi Adityanath Sworn in : 25 मार्चला योगींचा शपथविधी; 'या' दिग्गजांची राहणार उपस्थिती, विरोधकांनांही आमंत्रण
उत्तर प्रदेशमध्ये भाजपला सलग दुसऱ्यांदा बहुमत मिळाले आहे. त्यामुळं येत्या 25 मार्च रोजी योगी आदित्यनाथ मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
Yogi Adityanath Sworn in: पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला 4 राज्यात चांगले यश मिळाले आहे. पंजाब वगळता अन्य चार राज्यात भाजप सत्ता स्थापन करणार आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाचे राज्य म्हणजे उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेशमध्ये भाजपला सलग दुसऱ्यांदा बहुमत मिळाले आहे. त्यामुळं येत्या 25 मार्च रोजी योगी आदित्यनाथ मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. इकाना स्टेडियममध्ये शपथविधी सोहळा संपन्न होणार आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. मोदी यांच्याबरोबर अनेक दिग्गज नेते या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. कोण कोणते नेते उपस्थित राहणार ते पाहुयात...
सर्व बड्या नेत्यांना समारंभासाठी आमंत्रित करण्याची योजना
योगी सरकारच्या शपथविधीची तारीख पुढे ढकलली आहे. त्यामुळं या सोहळ्यासाठी बोलावण्यात येणाऱ्या मान्यवरांची यादी देखील वाढली आहे. भाजपच्या सर्व बड्या नेत्यांना या कार्यक्रमाला आमंत्रित करण्याची योजना आहे. या सोहळ्यासाठी एक मोठा स्टेज असून, त्यासमोरील इकाना स्टेडियममध्ये भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने असणार आहेत.
शपथविधी सोहळ्याला उपस्थित असलेले खास व्यक्ती
पंतप्रधान नरेंद्र मोदी
गृहमंत्री अमित शाह
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह
भाजप अध्यक्ष जेपी नड्डा
केंद्र सरकारचे मंत्री
भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत आणि संघाचे वरिष्ठ पदाधिकारी
प्रसिद्ध उद्योगपती आणि धार्मिक नेत्यांनाही आमंत्रित केलं आहे
एवढेच नाही तर या शपथविधी सोहळ्यात देशातील नामवंत उद्योगपती आणि धार्मिक नेत्यांनाही आमंत्रित करण्यात आले आहे. या सर्वांशिवाय यावेळी भाजपच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या शासकीय योजनेच्या लाभार्थ्यांनाही या सोहळ्यासाठी बोलावण्यात आले आहे.
विरोधी पक्षनेत्यांनाही आमंत्रण
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती, समाजवादी पार्टीचे नेते मुलायम सिंह यादव, समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव, काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी, सरचिटणीस प्रियांका गांधी वड्रा यांच्यासह अन्य विरोधी पक्षांच्या नेत्यांनाही शपथविधी कार्यक्रमाला आमंत्रीत केले जाणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या: