एक्स्प्लोर
Advertisement
बिहार, गुजरातनंतर उत्तर प्रदेशातही दारुबंदी?
लखनऊ : गुजरात आणि बिहारनंतर उत्तर प्रदेशमध्येही दारुबंदी होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दारु विक्रीविरोधात कडक कारवाई सुरु केली आहे. त्यांनी नुकतीच यासंबंधी अबकारी सचिवांसोबत बैठक घेतली. ही बैठकच दारुबंदीच्या दिशेनं टाकलेलं पहिलं पाऊल असावं, असा अंदाज बांधला जात आहे.
उत्तर प्रदेश डीआयजी रेंजने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत मद्यविक्रीच्या दुकानांमध्ये तपासणी अभियान सुरु केलं आहे. या अभियानात सार्वजनिक ठिकाणी दारु पिणाऱ्या 15 जणांवर कारवाई करण्यात आली. तर ड्रंक अँड ड्राईव्हच्या घटना होऊ नये, यासाठी वाहनांची तपासणीही केली. नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत.
दरम्यान योगी आदित्यनाथ यांनी यापूर्वी संसदेत दारुबंदी करण्याचीही मागणीही केलेली आहे. त्यामुळे योगी आदित्यनाथ यांची ही बैठक दारुबंदीच्या दिशेने टाकलेलं पाऊल तर नाही ना, अशी चर्चा सध्या उत्तर प्रदेशात रंगली आहे.
योगी आदित्यनाथ यांचे तीन दिवसात पाच निर्णय
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पदभार स्वीकारल्यानंतर कामांचा धडाका लावला आहे. त्यांनी महिला सुरक्षेसाठी पहिल्याच दिवशी अँटी रोमियो पथकाची स्थापना केली. याद्वारे तरुणींची छेड काढणाऱ्या तरुणांवर कारवाई सुरु करण्यात आली आहे.
अँटी रोमियो पथक
प्रचारात भाजपने महिला सुरक्षेचा मुद्दा लावून धरला होता. त्याचाच भाग म्हणून आदित्यनाथ यांच्या सरकारने पहिल्याच दिवशी अँटी रोमियो पथकाची स्थापना केली. या पथकाने लखनऊमध्ये पहिली कारवाई करत 4 ठिकाणांहून 8 तरुणांना ताब्यात घेतलं.
‘राम म्युझियम’साठी 25 एकर जमीन
योगी आदित्यनाथ यांनी राम म्युझियमसाठी मंजुरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेची घोषणा केली होती. मात्र अखिलेश यादव सरकारच्या काळात या योजनेची अंमलबजावणी झाली नाही. आता उत्तर प्रदेशच्या नवीन सरकारने या योजनेसाठी 25 एकर जमीन देण्याची तयारी दाखवली आहे. तर केंद्राकडून 154 कोटींचा निधी मिळणार आहे.
धार्मिक स्थळांची सुरक्षा
आगामी, रामनवमी आणि नवरात्र उत्सवासाठी उत्तर प्रदेशातील सर्व धार्मिक स्थळांची सुरक्षा व्यवस्था वाढवण्याचे आदेश योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत.
कायदा आणि सुव्यवस्थेवर भर
भाजपने प्रचारादरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेवरुन समाजवादी पार्टीवर हल्लाबोल केला होता. योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारताच कायदा आणि सुव्यवस्थेवर भर दिला आहे.
कत्तलखान्यांवर कारवाई
भाजपचा मुख्यमंत्री शपथ घेईल त्यादिवशी रात्री 12 वाजल्यापासून उत्तर प्रदेशातील अवैध कत्तलखान्यांवर कारवाई सुरु होईल, अशी घोषणा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी केली होती. 15 मार्चपासून आतापर्यंत वाराणासी, गाझियाबाद, अलाहाबादमध्ये अनेक कत्तलखाने बंद करण्याची कारवाई करण्यात आली आहे.
संबंधित बातम्या :
3 दिवस, 5 निर्णय, योगी आदित्यनाथांचा धडाका
निवडणूक प्रचारात घोषणा, सत्तेत येताच कत्तलखान्यांवर कारवाई
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योग्य आदित्यनाथ यांची संपत्ती किती?
कोणत्याही मंत्र्यांनं लाल दिव्याची गाडी वापरु नये: योगी आदित्यनाथ
योगी आदित्यनाथ यांच्या पहिल्याच दिवशी पाच घोषणा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
पालघर
सोलापूर
महाराष्ट्र
Advertisement