एक्स्प्लोर
यूपीतील अलाहाबाद शहराचं नाव आता प्रयागराज होणार
उत्तर प्रदेशातील अलाहाबाद शहराचं नाव आता प्रयागराज होणार आहे.
लखनऊ | उत्तर प्रदेशातील अलाहाबाद शहराचं नाव आता प्रयागराज होणार आहे. यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज नव्या नावाची घोषणा केली आहे. दसऱ्यापूर्वी नामांतराची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.
गंगा, यमुना आणि सरस्वती अशा त्रिवेणी संगमावर वसलेल्या या शहराला ऐतिहासिक महत्त्व आहे. 1553 सालापूर्वी या शहराचं नाव प्रयाग हेच होतं. पण त्यानंतर अकबराने या शहराचं नाव अलाहाबाद ठेवलं. अलाह याचा अर्थ अकबराने सुरु केलेल्या दान-धर्माशी संबंधित आहे. अलाहाबाद म्हणजेच ईश्वराने वसवलेलं गाव.
प्रयाग हे महाकुंभ भरणारं पहिलं महत्त्वाचं स्थान आहे. दर 12 वर्षांनी इथे महाकुंभमेळा भरतो.
याआधी मायावती सत्तेत असतानाही यूपीतील अनेक शहरांचं नामकरण झालं. नोएडाचं नामकारण गौतमबुद्ध नगर झालं तर, भदोईचं नामकरण संत रविदास नगर करण्यात आलं. फैजाबाद जिल्ह्याचं विभाजन करुन आंबेडकर नगर जिल्हा तयार झाला. तसंच खलिलाबादचं संत कबीर नगर असं नामांतर झालं होतं.
योगींच्या राज्यातही यापूर्वी मुघलसराय शहराचं नामकरण दीनदयाल उपाध्याय नगर असं करण्यात आलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
राजकारण
क्रीडा
बातम्या
Advertisement