एक्स्प्लोर

Exclusive: मी अॅलोपॅथी, डॉक्टरांच्या विरोधात नाही; माझी लढाई औषध माफियांविरोधात: योगगुरु बाबा रामदेव

योगगुरु बाबा रामदेव हे मागील काही दिवसांपासून त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेचा विषय ठरत आहेत

नवी दिल्ली : योगगुरु बाबा रामदेव हे मागील काही दिवसांपासून त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेचा विषय ठरत आहेत. अॅलोपॅथी उपचारपद्धतीसंदर्भात केलेल्या एका वक्तव्यासाठी त्यांना स्पष्टीकरणवजा माफीही मागावी लागली. इतकंच नव्हे तर आपले उदगार त्यांना परतही घ्यावे लागले. असं असलं इंडियम मेडिकल असोसिएशन यांच्यात अद्यापही खटके उडतच आहेत. याच वादाच्या भोवऱ्यात अडकलेलं असताना योगगुरु बाबा रामदेव यांनी एबीपी न्यूजला मुलाखत देत आपली बाजू स्पष्ट केली. 

मी अॅलोपॅथी आणि डॉक्टरांच्या विरोधात नाही
आपल्या विधानावरुन वाद निर्माण झाल्याचं लक्षात आल्यानंतर भूमिका स्पष्ट करताना बाबा रामदेव म्हणाले, 'मी अॅलोपॅथी आणि डॉक्टरांच्या विरोधात नाही. आयएमएच्या विरोधात जाण्याचा प्रश्नच उदभवत नाही. ही लढाई तर, औषध माफियांच्या विरोधात आहे. जे 2 रुपयांचं औषध 2 हजार आणि केव्हा केव्हा तर 10 हजार रुपयांना विकतात. गरज नसतानाही शस्त्रक्रिया करतात.' 

अनेकदा तर औषधांचा अधिक मारा केल्यानं काय परिणाम होतात हे तर एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांच्याकडूनही आपण ऐकल्याचं म्हणत मी वाद संपवू इच्छितो असी ठाम भूमिका त्यांनी मांडली. मेडिकल सायंसनी एडवांस सर्जरी आणि आयुष्य वाचवणाऱ्या औषधांच्या रुपात मोठी प्रगती केली आहे. मी स्वत: मेडिकल सायंन्सचा आदर करतो. असं म्हणत असतानाच आयुर्वेदामुळंही अनेक जीवघेणे आणि दुर्धर आजार बरे होत असल्याचा दाखला त्यांनी दिला. 

आयएमएबाबत काय म्हणाले बाबा रामदेव? 
कोरोना लसीच्या संदर्भात संभ्रम निर्माण करणाऱ्या आरोपांसंदर्भातील प्रश्नाचं उत्तर देत बाबा रामदेव यांनी सांगितलं, 'मी तर म्हणालो होतो की, लसीचे दोन डोस घेण्यासोबतच आयुर्वेदाचेही दोन डोस घ्या'. आपल्याला देशद्रोही म्हणणाऱ्या आयएमएनं कशा प्रकारे संविधानाविरोधात वक्तव्य केलं आहे, लोकशाहीविरोधात वक्तव्य केलं आहे, भारतीय संस्कृतीविरोधात वक्तव्य केलं आहे हे सांगत आपण आयएमएचा फार गांभीर्यानं विचार करत नसल्याचं त्यांनी ठामपणे सांगितलं. 

गर्दीच करणार असाल तर कठोर निर्णय घ्यावा लागेल; महापौर किशोरी पेडणेकरांचा मुंबईकरांना इशारा 

कोरोनाची लस केव्हा घेणार? 
कोरोना प्रतिबंधात्मक लस केव्हा घेणार या प्रश्नाचं उत्तर देताना आपण लसीचं समर्थन करत असल्याचं सांगत लसीसाठी प्रथम लहान मुलं आणि वयोवृद्धांना प्राधान्य द्यावं असा आग्रही सुर आळवला. 'स्वामी रामदेव इतके सुदृढ आहेत, माझं हृदय नीट काम करत आहे, माझा रक्तदाब योग्य आहे, माझी किडनी ठीक आहे, यकृतही ठिक आहे', असं म्हणत आपल्या रोगप्रतिकारक शक्तीवर त्यांनी प्रकाश टाकत आपण लसीसाठीच्या अंतिम यादील नाव नोंदणी केल्याचं त्यांनी सांगितलं. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल

व्हिडीओ

Akola Police : घर सोडून गेलेल्या मुलाला अकोला पोलिसांनी कसं शोधलं Special Report
Ambadas Danve Viral Video : कुणाचे खोके, नोटांचे कोण राजकीय बोके? Special Report
Phaltan Lady Doctor Case : फलटण डॉक्टर महिलेने स्वत:च जीवन संपवलं Special Report
Ram Shinde Vs Rohit Pawar : राम शिंदे विरूद्ध रोहित पवार वादाचा भाग तिसरा Special Report
Indigo Flight : इंडिगो कधी सावरणार? प्रवास सुरळीत कधी होणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
IPL 2026 Auction : आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो
फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो
Embed widget