(Source: ECI/ABP News/ABP Majha)
World Happiness Report 2021 : भारतातले लोक दु:खी? आनंदी देशांच्या यादीत 139 वा क्रमांक
संयुक्त राष्ट्र संघटनेने World Happiness Report 2021 जाहीर केला असून 149 देशांच्या या यादीत भारताचा क्रमांक 139 आहे. फिनलॅन्ड या यादीत वरच्या क्रमांक आहे.
World Happiness Report 2021 : संयुक्त राष्ट्राच्या वतीने दरवर्षी World Happiness Report जाहीर करण्यात येतोय. या वर्षाचा अहवाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला असून 149 देशांच्या या यादीत भारताने 139 वा क्रमांक पटकावला आहे. या यादीत फिनलॅन्डने पहिला क्रमांक पटकावला आहे. या अहवालात कोरोना आणि त्याचा लोकांच्या जीवनावर झालेला परिणाम यावर लक्ष केंद्रीत करण्यात आलं आहे.
गेल्या वर्षीच्या World Happiness Report मध्ये भारताचा क्रमांक 140 वा होता. तो आता एका क्रमांकाने वधारून या वर्षी 139 वा क्रमांक आहे. त्या अर्थी भारतातले लोक जगाच्या तुलनेत दु:खी असल्याचं स्पष्ट आहे. कोरोना काळात या वर्षीचा अहवाल तयार करताना लोकांशी प्रत्यक्ष भेटून आणि काही लोकांशी फोनवर चर्चा करून हा अहवाल तयार करण्यात आला आहे.
World Sparrow Day : आज जागतिक चिमणी दिवस, अकोल्यात भन्नाट पद्धतीनं जपलं जातंय चिमण्यांचं अस्तित्व
फिनलॅन्डने या यादीत सर्वात वरचा क्रमांक पटकावला आहे. त्यानंतर आइसलॅन्ड, डेन्मार्क, स्वित्झर्लंड, जर्मनी आणि नॉर्वे या देशांचा क्रमांक आहे. महत्वाचं म्हणजे भारताचा शेजारी असलेल्या पाकिस्तानचे लोक भारतीयांपेक्षाही आनंदी असल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलंय. पाकिस्तानने या यादीत 105 वा क्रमांक पटकावला आहे तर बांग्लादेश या यादीत 101 आणि चीन 84 व्या स्थानी आहे.
कायम युद्धाची परिस्थिती असलेल्या अफगानिस्तानचे लोक सर्वाधिक दु:खी असल्याचं या अहवालात सांगण्यात आलं आहे. त्याच्यावर झिम्बाग्वे, रवांडा, बोत्सवाना आणि लेसोथो या देशांचा क्रमांक लागतोय. अमेरिका या यादीत 19 व्या स्थानी आहे.