एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ICC World Cup 2019 : भारत-न्यूझीलंड सामन्यादरम्यान ओल्ड ट्रॅफर्ड मैदान 'नो फ्लाय झोन' म्हणून घोषित
शनिवारी भारत आणि श्रीलंका यांच्यात झालेल्या सामन्यादरम्यान घडलेल्या एका घटनेने इंग्लंडमध्ये मोठी खळबळ निर्माण झाली होती. या सामन्यादरम्यान एका विमानाने अवकाशात पाच घिरट्या मारल्या होत्या.
मॅन्चेस्टर : भारत आणि न्यूझीलंड दरम्यान आज विश्वचषकातील पहिल्या उपांत्य सामना होत आहे. मॅन्चेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात हा सामना खेळवण्यात येत आहे. विशेष म्हणजे या सामन्यादरम्यान मैदान असलेले क्षेत्र 'नो फ्लाय झोन' म्हणून घोषित करण्यात आले आहे. हा सामना सुरु असताना मैदानावरुन कोणतेही विमान उडवण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यादरम्यान झालेल्या सामन्यावेळी एका खासगी विमानातून भारत विरोधी घोषणा असलेले फलक झळकवण्यात आले होते. त्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. इंग्लंडच्या ECB या क्रिकेट बोर्डाकडून BCCI ला ही माहिती देण्यात आली आहे.
शनिवारी भारत आणि श्रीलंका यांच्यात झालेल्या सामन्यादरम्यान घडलेल्या एका घटनेने इंग्लंडमध्ये मोठी खळबळ निर्माण झाली होती. या सामन्यादरम्यान एका विमानाने अवकाशात पाच घिरट्या मारल्या होत्या. या विमानातून एक बॅनर बाहेर झळकत होते ज्यावर 'जस्टिस फॉर काश्मीर' असे इंग्रजीत लिहिण्यात आले होते. ते विमान कोणाचे होते? त्यात कोण व्यक्ती होत्या? याविषयी अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. परंतु आयसीसी आणि स्थानिक पोलिसांनी ही घटना खूपच गांभीर्याने घेतली होती. तसेच पाकिस्तान आणि अफगानिस्तान यांच्यातील सामन्यावेळी देखील बलुचिस्तान संदर्भातील मजकूर असणारे फलक एका खासगी विमानातून दाखवण्यात आले होते. या दोन घटनांनंतर आजच्या सामन्यासाठी मैदानाजवळील क्षेत्र 'नो फ्लाय झोन' घोषित करण्यात आले आहे.
विश्वचषकातील पहिल्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. मॅन्चेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात हा सामना खेळवण्यात येत आहे. या सामन्यात मोहम्मद शमीला वगळलं असून भुवनेश्वर कुमारला संघात स्थान मिळालं आहे. तर कुलदीप यादवच्या जागी युजुवेंद्र चहलला संधी मिळाली आहे. दोन्ही संघ या उपांत्य सामन्यात एक एक बदलासह मैदानात उतरली आहे. या सामन्यात फिरकीपटू युजुवेंद्र चहलचं संघात पुनरागमन झालं आहे. कुलदीप यादवच्या जागी युजुवेंज्र चहलला संघात स्थान मिळालं आहे.
तर मागील सामन्याप्रमाणेच आजच्या सामन्यातही मोहम्मद शमीचा प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश झालेला नाही. तर न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने आपल्या संघात बदल करत लॉकी फर्ग्युसनला संधी दिली आहे. लॉकी या विश्वचषकातील न्यूझीलंडचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला आहे. त्याने या स्पर्धेत आतापर्यंत एकूण 17 विकेट्स घेतल्या आहेत. टिम साऊदीच्या जागी त्याचा समावेश करण्यात आला आहे.
जसप्रीत बुमराहच ठरणार का टीम इंडियाचा मॅचविनर?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement