एक्स्प्लोर
काटजूंना सुप्रीम कोर्टाचा दणका, संसदेने मंजूर केलेला प्रस्ताव रद्द करण्यास नकार
नवी दिल्ली: सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश मार्कडेय काटजू यांच्याविरोधातील संसदेने महात्मा गांधी आणि सुभाषचंद्र बोस यांचा आवमान केल्याप्रकरणी निंदा प्रस्ताव एकमताने मंजूर केला होता. पण हा प्रस्ताव रद्द करण्यास सुप्रीम कोर्टाने स्पष्ट नकार देत काटजूंना खडेबोल सुनावले आहेत.
काटजू यांनी 10 मार्च रोजी आपल्या ब्लॉगमधून महात्मा गांधी आणि सुभाषचंद्र बोस यांचा आवमान केला होता. यानंतर देशभरातून संतप्त प्रतिक्रीया उमटली होती. देशातील विविध ठिकाणी काटजूंचा निषेध करण्यात आला होता.
काय म्हणाले काटजू?
यानंतर संसदेनेही त्यांचा निषेध करत, त्यांच्याविरोधात 11 आणि 12 मार्च रोजी संसदेच्या दोन्ही सदनाने निंदेचा प्रस्ताव एकमताने पारित केला. यानंतर काटजूंनी संसदेच्या प्रस्तावाविरोधात 29 जून रोजी ही याचिका दाखल केली. पण न्यायालयाने त्यांची ही याचिका फेटाळून लावली आहे.
दरम्यान, याआधी लोकमान्या टिळकांचाही उल्लेख ब्रिटांशाचे एजंट म्हणून केल्यानंतर, मोठा वाद निर्माण झाला होता. शिवसेनेने काटजूंच्या या विधानाचा तीव्र निषेध करत त्यांची पदवी तपासण्याची गरज असल्याचे म्हणले होते.
संबंधित बातम्या
‘काटजूंचे अज्ञान लोकांसमोर’, तुषार गांधींचे काटजूंवर टीकास्त्र
मार्कंडेय काटजू वेड्या मोहम्मदाचे एजंट : सामना
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement