News
News
टीव्हीabp shortsABP शॉर्ट्सव्हिडीओ पॉडकास्ट
X

म्हणून ड्रायव्हरलेस गाड्यांना परवानगी देणार नाही : गडकरी

तंत्रज्ञानामुळे जर अनेकांवर बेरोजगारी ओढवणार असेल, तर भारतात ड्रायव्हरलेस गाड्यांना परवानगी देणार नाही, अशी भूमिका नितीन गडकरी यांनी घेतली आहे.

FOLLOW US: 
Share:
नवी दिल्ली : भारतात ड्रायव्हरलेस गाड्यांना परवानगी देणार नसल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केलं. तंत्रज्ञानामुळे जर अनेकांचे रोजगार हिरावले जाणार असतील, तर त्याला कधीच संमती मिळणार नसल्याचं गडकरींनी सांगितलं. एकीकडे गुगल, मर्सिडीजसारख्या टेक जायंट्सनी ड्रायव्हरलेस कार आणून क्रांती घडवण्याचे प्रयत्न केले आहेत. मात्र नितीन गडकरींनी आपण भारतात ड्रायव्हरलेस गाड्यांना परवानगी न देण्याबाबत आपल्या मतांवर ठाम असल्याचं सांगितलं आहे. 'तंत्रज्ञानामुळे जर अनेकांवर बेरोजगारी ओढवणार असेल, तर ते मला मान्य नाही. देशात बेरोजगारी ही मोठी समस्या असताना टेक्नॉलॉजीमुळे अनेकांचे रोजगार हिरावलं जाणं परवडणारं नाही' असं गडकरी म्हणाले. भारतात आजच्या घडीला 22 लाख व्यावसायिक चालकांची गरज आहे. सरकार देशभरात 100 चालक प्रशिक्षण संस्था सुरु करण्याच्या विचारात आहे. पुढच्या पाच वर्षात पाच लाख जणांना नोकरी मिळेल, असा दावाही गडकरींनी केला. प्रस्तावित मोटर वाहन (सुधारणा) बिल 2017 मध्ये अशाप्रकारे नव्या तंत्रज्ञानाची चाचणी घेण्याची तरतूद आहे. हे विधेयक राज्यसभेत प्रलंबित आहे.
Published at : 25 Jul 2017 10:21 AM (IST) Tags: रोजगार Nitin Gadkari नितीन गडकरी job नोकरी

आणखी महत्वाच्या बातम्या

Infosys Salary Hikes : आठवड्यात 72 तास काम करा म्हणणाऱ्या नारायण मूर्तींच्या इन्फोसिसमध्ये कर्मचाऱ्यांना पगारवाढ, 'इतक्या' टक्क्यांनी वाढले पगार

Infosys Salary Hikes : आठवड्यात 72 तास काम करा म्हणणाऱ्या नारायण मूर्तींच्या इन्फोसिसमध्ये कर्मचाऱ्यांना पगारवाढ, 'इतक्या' टक्क्यांनी वाढले पगार

'या' भारतीय माशाची अमेरिकेसह चीनला भुरळ, माशांच्या विक्रितून कमावले 60 हजार कोटी 

'या' भारतीय माशाची अमेरिकेसह चीनला भुरळ, माशांच्या विक्रितून कमावले 60 हजार कोटी 

भारत-बांगलादेश सीमेवर तणापूर्ण वातावरण, दोन्हीकडील शेतकरी सीमेवरच भिडले, नेमकं प्रकरण काय? 

भारत-बांगलादेश सीमेवर तणापूर्ण वातावरण, दोन्हीकडील शेतकरी सीमेवरच भिडले, नेमकं प्रकरण काय? 

तंबूत असलेल्या सिलेंडरचा स्फोटामुळे भीषण आग, महाकुंभ मेळ्यात अग्नितांडव; तंबू आणि साहित्य जळून खाक

तंबूत असलेल्या सिलेंडरचा स्फोटामुळे भीषण आग, महाकुंभ मेळ्यात अग्नितांडव; तंबू आणि साहित्य जळून खाक

IPS Shivdeep Lande : बिहारचे सिंघम शिवदीप लांडेचा राजीनामा अखेर स्वीकारला; अवघ्या काही दिवसांमध्येच तीन धडाकेबाज अधिकाऱ्यांचा खाकी वर्दीला 'रामराम'

IPS Shivdeep Lande : बिहारचे सिंघम शिवदीप लांडेचा राजीनामा अखेर स्वीकारला; अवघ्या काही दिवसांमध्येच तीन धडाकेबाज अधिकाऱ्यांचा खाकी वर्दीला 'रामराम'

टॉप न्यूज़

Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप

Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 

Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त

Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त

Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार

Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार