एक्स्प्लोर

भारत-बांगलादेश सीमेवर तणापूर्ण वातावरण, दोन्हीकडील शेतकरी सीमेवरच भिडले, नेमकं प्रकरण काय? 

भारतीय आणि बांगलादेशच्या सीमेवर दोन्ही देशांच्या शेतकऱ्यांमध्ये वाद झाला आहे. या वादानंतर  भारत आणि बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे.

India Bangladesh Border : भारतीय आणि बांगलादेशच्या सीमेवर दोन्ही देशांच्या शेतकऱ्यांमध्ये वाद झाला आहे. या वादानंतर  भारत आणि बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे. भारतीय शेतकऱ्यांनी बांगलादेशी शेतकऱ्यांवर सीमेपलीकडून पीक चोरीचा आरोप केला आहे. त्यामुळं दोन्ही बाजूंमध्ये वाद सुरु झाला आहे. दोन्ही देशांतील शेतकऱ्यांची संख्या वाढू लागल्यानं प्रकरण वाढण्याची शक्यता आहे. यावेळी दगडफेक देखील झाली आहे. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. 

घटनेची माहिती मिळताच बीएसएफ (भारतीय सीमा सुरक्षा दल) आणि बीजीबी (बांगलादेश बॉर्डर गार्ड) तात्काळ घटनास्थळी पोहोचले आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. दोन्ही सुरक्षा दलांनी आपापल्या देशातील शेतकऱ्यांना पांगवले आहे. मालदा सीमेवर भारत आणि बांगलादेशच्या शेतकऱ्यांमध्ये चोरी आणि अतिक्रमणाच्या आरोपावरून जोरदार चकमक झाली आहे. भारतीय शेतकऱ्यांनी बांगलादेशी शेतकऱ्यांवर पीक चोरीचा आरोप केला आहे.

बीएसएफ आणि बीजीबीची भूमिका

बीएसएफने भारतीय शेतकऱ्यांना सीमेवर असे वाद टाळण्याचे आवाहन केले आहे. तसेच अशा कोणत्याही समस्येबाबत तात्काळ सुरक्षा दलांना कळवावे. दुसरीकडे, बीजीबीनेही बांगलादेशी शेतकऱ्यांना समजावून सांगितले आहे. त्यांच्या भागात कारवाई करून परिस्थिती बिघडण्यापासून रोखण्यात आले आहे. दरम्यान, सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र, भारतीय शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. कारण बांगलादेशच्या शेतकऱ्यांनी भारतीय शेतकऱ्यांची पिके चोरल्याचा आरोप आहे. 

सीमेवर परिस्थिती नियंत्रणात

सर्व भारतीय शेतकऱ्यांना सुखरूप परत बोलावण्यात आले आहे. मात्र, या घटनेनंतर बांगलादेशच्या सीमेच्या 50 ते 75 मीटर आत काही बांगलादेशी नागरिक दिसले होते. त्यानंतर BGB ने त्यांना हटवले आहे. सध्या सीमेवरील परिस्थिती पूर्णपणे सामान्य आणि नियंत्रणात आहे. भारत आणि बांगलादेश दरम्यान सुमारे 4,096 किमी लांबीची सीमा आहे. जी पश्चिम बंगाल, आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोरामला लागून आहे. ही जगातील सर्वात लांब आणि जटिल आंतरराष्ट्रीय सीमांपैकी एक आहे. सीमावादामुळे दोन्ही देशातील शेतकरी आणि नागरिकांमध्ये अनेकदा तणावाच्या घटना घडतात. मात्र, बीएसएफ आणि बीजीबीच्या युनिट कमांडंटनी सीमेवर शांतता राखण्यासाठी आणि भविष्यात असे वाद टाळण्यासाठी समन्वय बैठक घेण्याचे नियोजन केले आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Attacker Update : सैफवरील हल्लेखोर वरळीच्या सिल्कवर्क्स कॅफेमध्ये होता कामाला, इतर कर्मचाऱ्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यातSaif Ali Khan Attacker Update : सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीचं वरळीतील कोळीवाड्यात वास्तव्य, आरोपीचे शेजारी काय म्हणाले?ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 19 January 2024Anandache Paan ज्येष्ठ साहित्यिक वसंत आबाजी डहाकेंशी समकाल आणि समांतर पुस्तकांच्या निमित्त खास संवाद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Embed widget