Womens Day 2022 : आज जागतिक महिला दिन, आणि याच दिवशी त्रिपुरा सरकारकडून तिथल्या महिलांना मोठं गिफ्ट दिले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज त्रिपुरातील महिलांसाठी मोठी घोषणा केली आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त त्रिपुरामध्ये सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांसाठी 33 टक्के आरक्षणाची घोषणा केली. आणखी काय म्हणाले अमित शहा..


त्रिपुरा आत्मनिर्भर बनण्याच्या दिशेने 


जनतेला संबोधित करताना अमित शहा म्हणाले, राज्यातील सत्ताधारी आघाडीला 4 वर्षे पूर्ण झाल्या निमित्ताने आणि महिला दिनाचे औचित्य साधून अमित शहा यांनी ही घोषणा केली आहे. भारत देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. राज्यात गरिबांच्या नावाने कम्युनिष्टांनी 25 वर्षे येथे राज्य कारभार केला. मात्र, गरिबांसाठी काहीच केलं नाही. याउलट भाजपसह इतर 39 कार्यकर्त्यांची हत्या करण्याचं काम कम्युनिष्टांनी केलं. त्याचवेळी भाजपने येथे मोठं आंदोलन उभारण्याची घोषणा केली. मी इंटेरियर त्रिपुरामध्ये पहिल्यांदाच चलो पटलाईचा नारा दिला, त्यावेळी लोकांमध्ये मोठा उत्साह होता. तेव्हाच येथे परिवर्तन होणार हे दिसून आले. 4 वर्षांपूर्वी येथे भाजपचं सरकार बनलं, तत्पूर्वी ड्रग्ज आणि नशेच्या कारभाराने हा प्रदेश त्रस्त होता. मात्र, आज त्रिपुरा आत्मनिर्भर बनण्याच्या दिशेने पुढे जात आहे. माता-भगिनींना 33 टक्के आरक्षण देण्याचं काम भाजप सरकारने केलंय, असेही शहा यांनी म्हटले.


ड्रग्ज आणि नशेच्या कारभाराने हा प्रदेश त्रस्त होता


भारत देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यासोबतच, सुंदर राज्य असलेल्या त्रिपुरालाही 50 वर्षे पूर्ण होत आहेत. 25 वर्षांपासून त्रिपुरामध्ये कम्युनिष्टांनी सरकार चालवले. यापूर्वी 2015 मध्ये मी जेव्हा येथे आलो होतो, तेव्हा येथील जनता त्रस्त असल्याचं दिसून आल्याचे अमित शहा यांनी म्हटले. राज्यात गरिबांच्या नावाने कम्युनिष्टांनी 25 वर्षे येथे राज्य कारभार केला. मात्र, गरिबांसाठी काहीच केलं नाही. याउलट भाजपसह इतर 39 कार्यकर्त्यांची हत्या करण्याचं काम कम्युनिष्टांनी केलं. त्याचवेळी भाजपने येथे मोठं आंदोलन उभारण्याची घोषणा केली. मी इंटेरियर त्रिपुरामध्ये पहिल्यांदाच चलो पटलाईचा नारा दिला, त्यावेळी लोकांमध्ये मोठा उत्साह होता. तेव्हाच येथे परिवर्तन होणार हे दिसून आले. 4 वर्षांपूर्वी येथे भाजपचं सरकार बनलं, तत्पूर्वी ड्रग्ज आणि नशेच्या कारभाराने हा प्रदेश त्रस्त होता. मात्र, आज त्रिपुरा आत्मनिर्भर बनण्याच्या दिशेने पुढे जात आहे. त्रिपुरातील प्रत्येक गरिबाच्या घरात वीज पोहोचविण्याचं काम भाजपने केलंय. आता, माता-भगिनींना 33 टक्के आरक्षण देण्याचं काम भाजप सरकारने केलंय, असेही शहा यांनी म्हटले. 


असा निर्णय घेणारे बिहार हे एकमेव राज्य


यापूर्वी, 2020 साली पंजाब सरकारने महिला सशक्तीकरणाच्या (Women Empowerment) दिशेने पाऊल टाकत महिलांना सरकारी नोकऱ्यांमध्ये ३३ टक्के आरक्षण (33 % Reservation) देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. पंजाब मुख्यमंत्री कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार, मंत्रिमंडळाने पंजाब नागरी सेवांच्या थेट भरती प्रक्रियेत महिलांच्या आरक्षणाला मंजुरी दिली होती.  पंजाब व्यतिरिक्त बिहार राज्यात महिलांना सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्यात आले आहे. नीतीश कुमार सरकारने सरकारी नोकऱ्यांच्या सर्वच पदांवरील थेट भर्तीसाठी महिलांना 35 टक्के आरक्षण देण्याची तरतूद केली आहे. असा निर्णय घेणारे बिहार हे एकमेव राज्य आहे.


 लोकसभेत केवळ १४ टक्के खासदार महिला


 खरंतर महिलांना राजकारणात 33 टक्के आरक्षण आहे. सध्या लोकसभेत केवळ १४ टक्के खासदार महिला आहेत. मात्र, राज्यघटनेतील ७४ व्या दुरुस्तीने उप-राष्ट्रीय स्तरावर महिला आरक्षणाचा पाया १९९२ मध्येच रचला. नगरपालिका, महानगरपालिका यांसारख्या शहरी स्थानिक प्रशासनामध्ये थेट निवडणुकीद्वारे भरल्या जाणाऱ्या एकूण जागांपैकी किमान ३३ टक्के जागांवर महिलांसाठी आरक्षण अनिवार्य करण्यात आले. त्याखेरीज, अनुसूचित जाती आणि जमातींसाठी स्थानिक संस्थांमध्ये आरक्षित असलेल्या जागांपैकी किमान ३३ टक्के आरक्षण या गटांतील महिलांसाठी राखीव असणे आवश्यक आहे. या व्यतिरिक्त, शहरी स्थानिक संस्थांच्या अध्यक्षांची किमान ३३ टक्के पदेही महिलांसाठी राखीव आहेत.


महिला दिन का साजरा केला जातो?


महिला दिन साजरा करण्याची परंपरा महिला कामगार चळवळीमुळे सन 1908 मध्ये सुरू झाली. या दिवशी न्यूयॉर्क शहरातील 15,000 महिलांनी नोकरीचे तास कमी करण्यासाठी, चांगल्या पगाराची मागणी आणि इतर काही अधिकारांच्या मागण्यांसाठी निदर्शने केली. त्यानंतर एका वर्षांनंतर अमेरिकेच्या सोशलिस्ट पार्टीने हा दिवस पहिला राष्ट्रीय महिला दिन म्हणून घोषित केला. 1910 मध्ये कोपेनहेगन येथे महिला कामगारांची एक आंतरराष्ट्रीय परिषद पार पडली. त्यात हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा करण्याचं ठरवण्यात आलं आणि हळूहळू हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून लोकप्रिय झाला. 1975 मध्ये खऱ्या अर्थाने हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून ओळखला गेला जेव्हा संयुक्त राष्ट्र संघाने थीमसह हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केली.


 


महत्त्वाच्या इतर बातम्या :