Russia Ukraine Conflict : युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी सुरू केलेले ऑपरेशन गंगा (Operation Ganga) आता पोलंडमध्ये जवळपास संपले आहे. सोमवारी, 201 भारतीयांसह भारतीय हवाई दलाचे C-17 विमान राजधानी दिल्लीजवळील हिंडन हवाई तळावर परतले. भारताचा जखमी विद्यार्थी हरजोत सिंह आणि रस्ते वाहतूक मंत्री जनरल व्ही. के. सिंह (निवृत्त) हे देखील त्याच विमानात उपस्थित होते.
युक्रेनमधून पोलंडला पोहोचलेल्या भारतीयांना घेऊन हवाई दलाचे शेवटचे C-17 ग्लोबमास्टर विमान हिंडन हवाई तळावर आले. यावेळी त्याचे स्वागत करण्यासाठी संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट आणि पोलंडचे भारतातील राजदूत अॅडम बुराकोव्स्कीही तेथे उपस्थित होते. तसेच एक रुग्णवाहिकाही उपस्थित होती. ग्लोबमास्टर हिंडन तळावर पोहोचताच प्रथम जखमी हरजोत सिंहला रुग्णालयात हलवण्यात आले. युक्रेनमध्ये हरजोत सिंहला गोळी लागली होती. युक्रेनमधील भारतीय दूतावासाने कारने हरजोतला पोलंडला पोहोचवले होते.
हिंडन एअरबेसवर प्रसारमाध्यमांशी बोलताना माजी लष्करप्रमुख आणि रस्ते वाहतूक राज्यमंत्री जनरल व्ही. के. सिंग (निवृत्त) म्हणाले की, हरजोतची प्रकृती आता स्थिर आहे, मात्र त्यांला चांगल्या उपचारांसाठी दिल्लीतील लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. व्ही. के. सिंह यांनी सांगितले की, पोलंडहून आलेली ही शेवटची फ्लाइट आहे. पोलंडमधून आतापर्यंत सुमारे 3000 भारतीयांना आणण्यात आले आहे. त्यांनी सांगितले की आता एकही भारतीय पोलंडमध्ये नाही. युक्रेनमधून अजूनही कोणी भारतीय पोलंडमध्ये आला तर त्यालाही आणण्याची व्यवस्था केली जाईल.
पोलंडचे राजदूत अॅडम बुराकोव्स्की यांनी युक्रेनवरील रशियाच्या हल्ल्याचा निषेध करताना सांगितले की, आतापर्यंत सुमारे पाच दशलक्ष निर्वासित युक्रेनमधून पोलंडच्या सीमेवर पोहोचले आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Russia Ukraine War : दोन अमेरिकन शास्त्रज्ञ अनेक महिन्यांपासून रशियन कॅप्सूलमध्ये बंद, बाहेर सुरु असलेल्या युद्धाची कल्पनाच नाही
Ukraine Russia War : सुमी शहरातील विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी भारतीय दूतावासाची योजना, भारतीयांना तयार राहण्याच्या सूचना
- Google Maps : नेव्हिगेशनसाठी इंटरनेटची गरज नाही, अशा प्रकारे ऑफलाइन मोडमध्ये Google Maps
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha