International Women Day Doodle 2022 : प्रत्येक प्रसंगाला खास बनवणाऱ्या गुगलने आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त पुन्हा एकदा आकर्षक डूडल तयार केले आहे. या अ‍ॅनिमेटेड डूडलमध्ये महिलांचा संयम, त्याग यासोबतच त्यांचा आंतरिक आत्मविश्वासही दाखवण्यात आला आहे. Google च्या मुख्यपृष्ठावर विविध संस्कृतींमधील स्त्रियांच्या जीवनाची झलक दाखवणारे आकर्षक डूडलसह अ‍ॅनिमेटेड स्लाइडशो आहे. नोकरी करणाऱ्या आईपासून ते मोटारसायकल मेकॅनिकपर्यंत या डूडलची सर्व महिलांना हे डूडल समर्पित करण्यात आले आहे.


महिला दिन 2022 ची थीम 


दरवर्षी प्रमाणे, या वर्षीची थीम आहे 'शाश्वत उद्यासाठी आज लैंगिक समानता' (Gender Equality Today for a Sustainable Tomorrow) म्हणजेच शाश्वत उद्यासाठी लैंगिक समानता आवश्यक आहे. प्रत्येक क्षेत्रात महिलांसमोर आव्हाने उभी राहिली आहेत, ज्यांचा त्या उत्तम प्रकारे सामना करत आहेत. खरंतर, आंतरराष्ट्रीय महिला दिन 8 मार्च 1908 मध्ये सुरू झाला होता, परंतु तो साजरा करण्याचा उपक्रम कामगार चळवळीतून एक वर्षानंतर आला आणि त्यानंतरच संयुक्त राष्ट्राने याला आंतरराष्ट्रीय महिला दिन असे नाव दिले.


केंद्र सरकारची भेट
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त केंद्र सरकारने भेट दिली आहे. महिला दिनानिमित्त संरक्षित वारसा, संग्रहालये आणि पुरातत्व स्थळांसाठी सर्व देशी आणि परदेशी टूरिस्टकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) ने सोमवारी ही माहिती दिली. देशातील ASI संरक्षित वारसा स्थळांची संख्या 3,691 आहे. उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक 745 हेरिटेज साइट्स आहेत.


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha