Womens Day 2022 : दरवर्षी 8 मार्च रोजी महिला दिन (Womens Day 2022) साजरा केला जातो. बदलत्या वर्षानुसार या दिवशी वेगवेगळ्या थीमचं (Theme) आयोजन केलं जातो. यावर्षीची महिला दिनाची थीम नेमकी काय असणार आहे याविषयी तुम्हालाही उत्सुकता असेल. तर जाणून घेऊयात यावर्षीच्या थीमविषयी...


महिला हे उद्याचं भविष्य आहे हे आपणा सर्वांना माहितच आहे. एकंदरीतच मार्च महिना हा महिला इतिहास महिना म्हणूनही ओळखला जातो. या महिन्यात स्त्रियांच्या सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक क्षेत्रात गौरवशाली कामगिरीचा उल्लेख केला जातो. त्यांचे स्मरण केले जाते. 


महिला दिन 2022 ची थीम (Womens Day 2022 Theme) : 


आंतरराष्ट्रीय महिला दिन 2022 (International Womens Day 2022) ची यावर्षीची थीम आहे 'सस्टेनेबल उद्यासाठी आज लैंगिक समानता' (Gender Equality Today for a Sustainable Tomorrow) आहे. यानुसार समाजात आता लिंग समानता जरी दिसली, तर अजूनही समाजातील असे काही घटक आहेत जिथे महिलांना शिक्षणाचा, मोकळेपणाने बोलण्याचा, आपल्या स्वप्नांना पूर्ण करण्याचा हक्क मिळाला नाही. अशा घटकांत जनजागृती करण्यासाठी दरवर्षी वेगवेगळ्या थीमचे आयोजन केले जातो. यानुसार, यावर्षीची थीम ही लिंग समानता आहे. 


आंतरराष्ट्रीय महिला वर्षात (International Womens Day) 8 मार्च रोजीच UN ने पहिला अधिकृत आंतरराष्ट्रीय महिला दिन (International Womens Day) साजरा केला.


महत्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha