एक्स्प्लोर
पतीच्या अंत्यसंस्कारासाठी 5 दिवसाच्या चिमुकल्यासह महिला अधिकाऱ्याची हजेरी
कुमुद डोगरा, असं या महिला अधिकाऱ्याचं नाव आहे.

नवी दिल्ली : आपल्या पतीच्या अंत्यसंस्कारासाठी भारतीय सैन्यातली एक महिला अधिकारी आपल्या पाच दिवसांच्या नवजात बालकासह दाखल झाली. कुमुद डोगरा, असं या महिला अधिकाऱ्याचं नाव आहे.
कुमुद यांचे पती दुष्यंत भारतीय सैन्यात विंग कमांडर होते. 15 फेब्रुवारीला त्यांचं मायक्रोलाईट हेलिकॉप्टर माजुली आईसलँड भागात कोसळलं. यामध्ये विंग कमांडर जयपाल जेम्स आणि विंग कमांडर दुष्यंत वत्स यांचं निधन झालं.
दुष्यंत यांच्या अंतिम संस्कारावेळी कुमुद या आपल्या सैनिकी पेहरावात आपल्या 5 दिवसांच्या नवजात बालकाला घेऊन दाखल झाल्या. आधी देश नंतर कुटुंब हे ब्रीद त्यांनी इथंही आपल्या वागणुकीतून सार्थ ठरवलं.
दरम्यान, सर्वसामान्य महिलेला आपल्या आयुष्यातला जोडीदार सोडून गेल्यावर, तिला दु:खातून सावरायला बराच काळ जातो. पण कुमुद डोगरा यांच्या या कृतीने सर्वांचेच लक्ष्य वेधले आहे. कुमद यांचं सध्या सोशल मीडियावर कौतुक होतं आहे.
व्हिडीओ पाहा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
बातम्या
भारत
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
