एक्स्प्लोर
Advertisement
दाढी न केल्याने संताप, पत्नीने पतीवर उकळतं पाणी ओतलं!
अलीगढ (उत्तर प्रदेश) : पती दाढी करत नाही म्हणून पत्नीने पतीवर उकळतं पाणी ओतल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेत पती गंभीर जखमी झाला आहे. पतीला उपचारासाठी जेएन मेडिकल कॉलेजमध्ये भरती करण्यात आले आहे. पीडित पतीने क्वार्सी पोलिस ठाण्यात पत्नीविरोधात तक्रार दाखल केली आहे.
क्वार्सीच्या जमालपूर कॉलनी परिसरात ही घटना घडली. पीडित सलमानने सहा महिन्यांपूर्वी खाईडोरीमध्ये राहणाऱ्या नगमासोबत लग्न केलं होतं. नगमाने अत्यंत क्षुल्लक कारणावरुन पती सलमानवर उकळतं पाणी ओतलं.
दाढी केली नाही म्हणून अनेकदा पत्नी चिडत असे, असे पीडित सलमान सांगतात. धक्कादायक म्हणजे, अनेकदा पत्नी मारण्याची धमकीही देत असे.
पीडित सलमानने क्वार्सी पोलिस ठाण्यात पत्नी नगमाविरोधात तक्रार दाखल केली असून, या प्रकरणात न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
निवडणूक
महाराष्ट्र
क्रीडा
Advertisement