एक्स्प्लोर
भर कार्यक्रमात महिलेचा मुख्यमंत्री सिद्धरमय्यांना किस!

बंगळुरु : बंगळुरुमधील पॅलेस ग्राऊंडवरील एका कार्यक्रमात उपस्थित राहिलेले कर्नाटकचे मुख्यमंत्री के. सिद्धारमय्या यांना स्टेजवर सर्वांसमोर किस करुन महिला स्टेजवरुन गायब झाली. मुख्यमंत्री सिद्धरमय्या कोरबा समाजाच्या एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेले होते. पुरस्कार स्वीकारल्यानंतर एका महिलेने अचानकपणे मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांच्या गालावर किस केला. महिलेचं स्पष्टीकरण सिद्धरमय्या यांना किस करणारी महिला पत्रकारांशी बोलताना म्हणाली, “मी कोरबा समाजातील आहे. मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांनी एवढ्या जवळून पाहिल्यावर उत्साहित झाली आणि किस केला.” दरम्यान, तालुका पंचायत सदस्या गिरिजा श्रीनिवास यांनी या महिलेच्या वतीने स्पष्टीकरण दिले आहे. सिद्धरमय्या हे त्या महिलेसाठी वडिलांसारखे असून, त्यामुळे याचे वेगळे अर्थ लावू नये, असे गिरिजा श्रीनिवास म्हणाल्याय. https://twitter.com/ANI_news/status/747018033978187777
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
कोल्हापूर
करमणूक
महाराष्ट्र























