एक्स्प्लोर
बॉयफ्रेंडशी अफेअर असल्याचा संशय, तरुणीकडून बहिणीची हत्या
नवी दिल्ली : मोठ्या बहिणीची आपल्या बॉयफ्रेण्डशी जवळीक वाढल्याच्या संशयातून तरुणीने बहिणीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 21 वर्षीय शाजियाने गोळ्या झाडून आपल्या सख्ख्या बहिणीला ठार मारलं.
बॉयफ्रेंड वसीम उर्फ रेहनमध्ये मोठी बहीण सोनमला रस निर्माण झाल्यामुळे तिचा काटा काढल्याची कबुली शाजियाने दिली आहे. आपण अनेकवेळा तिला दूर होण्यास सांगूनही ती ऐकत नव्हती, असा दावा सोनमने केला आहे. दिल्लीतील सीलमपूर भागात ही घटना घडल्याची माहिती आहे.
बॉयफ्रेंड वसीमच्या बंदुकीने तिने सोनमची हत्या केली. बहिणीचा पाठलाग करणाऱ्या व्यक्तीने तिची हत्या केल्याचा बनाव आधी शाजियाने केला, मात्र अखेर चौकशीत सत्य समोर आलं. हत्येनंतर फरार झालेल्या वसीम आणि त्याचा मित्र अबिदचा शोध पोलिस घेत आहेत.
घटनेच्या दिवशी शाजियाने मुद्दाम बहिणीसोबत भांडण उकरुन काढलं. त्यानंतर शाजियाने बंदूक काढल्यावर दोघी बहिणींमध्ये झटापट झाली. त्याचवेळी शाजियाने बहिणीवर गोळी झाडली. तिचा मृत्यू झाल्यानंतर शाजियाने बॉयफ्रेण्ड वसीमची बंदूक त्याला परत केली. आई-वडील घरी परतल्यावर बहिणीचा पाठलाग करणाऱ्या दोघांनी तिची हत्या केल्याचा बनाव तिने रचला. मात्र पोलिस तपासात अखेर सत्य समोर आलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement