एक्स्प्लोर
पतीच्या अफेअरमुळे पत्नीचा विमानात धिंगाणा, चेन्नईत इमर्जन्सी लँडिंग
इराणी मद्यधुंद महिला विमानातच आपल्या पतीसोबत भांडण करत होती. तिला शांत करण्यासाठी गेलेल्या विमानातील कर्मचाऱ्यांबरोबर देखील या महिलेनं असभ्य वर्तन केलं. त्यामुळे पायलटला नाईलाजानं चेन्नई विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं.
चेन्नई : पतीच्या अफेअरचा पर्दाफाश झाल्यामुळे कतार एअरवेजच्या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करावं लागल्याची घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इराणी मद्यधुंद महिला विमानातच आपल्या पतीसोबत भांडण करत होती. तिला शांत करण्यासाठी गेलेल्या विमानातील कर्मचाऱ्यांबरोबर देखील या महिलेनं असभ्य वर्तन केलं. त्यामुळे पायलटला नाईलाजानं चेन्नई विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं.
नेमकं प्रकरण काय?
इराणी महिला आणि तिचा पती सुट्टी एन्जॉय करण्यासाठी बालीला जात होते. यावेळी पती विमानात झोपलेला असताना महिलेनं पतीच्या बोटांचे ठसे वापरुन त्याच्या मोबाईल अनलॉक केला. त्यानंतर तिला मोबाइलमध्ये जे काही सापडलं त्यावरुन तिचा पाराच चढला. पतीचं दुसऱ्या महिलेसोबत अफेअर असल्याचं समजताच तिनं मद्यपान करुन पतीसोबत भांडण सुरु केलं.
महिलेचा रुद्रावतार पाहून विमानातील कर्मचाऱ्यांनी तिला शांत करण्याचा प्रयत्न केला. पण, संबंधित महिलेने विमानातील कर्मचाऱ्यांबरोबर देखील असभ्य वर्तन केले. त्यामुळे नाईलाजाने पायलटनं विमानाचं चेन्नई विमान तळावर इमर्जन्सी लँडिंग केलं.
त्यानंतर या इराणी कुटुंबाला चेन्नईत उतरवण्यात आले.थोड्या वेळाने महिला शांत झाल्यावर त्या इराणी कुटुंबाला क्वालालांपूरच्या विमानातून कनेक्टेड फ्लाइटनं दोहाला पाठवण्यात आले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement