एक्स्प्लोर

हुंड्यासाठी सासरी छळ होत असेल तर पीडित महिला कुठूनही तक्रार करु शकते : सुप्रीम कोर्ट

विवाहितेचा हुंड्यासाठी सासरी छळ होत असेल तर पीडित महिला ज्या ठिकाणी राहत असेल तिथल्या पोलीस ठाण्यात जाऊन सासरच्या मंडळींविरोधात तक्रार दाखल करु शकते, असा फैसला सुप्रीम कोर्टाने सुनावला आहे.

नवी दिल्ली : विवाहितेचा हुंड्यासाठी सासरी छळ होत असेल तर पीडित महिला ज्या ठिकाणी राहत असेल तिथल्या पोलीस ठाण्यात जाऊन सासरच्या मंडळींविरोधात तक्रार दाखल करु शकते, असा फैसला सुप्रीम कोर्टाने सुनावला आहे. याप्रकरणी गेल्या सात वर्षांपासून सुप्रीम कोर्टात खटला सुरु होता. सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यासह तीन न्यायाधीशांच्या बेंचने आज (मंगळवार, 09 एप्रिल) याप्रकरणी निकाल दिला आहे. कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजरनुसार ज्या ठिकाणी गुन्हा घडला आहे, तो परिसर ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहे, त्याच पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करता येतो. गुन्हा जर एकापेक्षा अधिक ठिकाणी घडला असेल, तर गुन्हा घडलेल्या ठिकाणांपैकी कोणत्याही एका ठिकाणी गुन्हा दाखल करता येतो. हुंड्यासाठी सासरी छळ होत असेल तर पीडित महिलेला तक्रार नोंदवण्यासाठी सासरचे घर ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहे, तिथेच जाऊन तक्रार करावी लागत होती. परंतु आता त्याची गरज भासणार नाही. याप्रकरणी आज झालेल्या सुनावणीत कोर्टाने म्हटले आहे की, पीडित महिला कुठेही राहत असेल, माहेरी, कोणत्याही नातेवाईकाकडे अथवा स्वतंत्र राहत असेल तर ती राहत्या ठिकाणी जवळ जे पोलीस ठाणे असेल, तिथे जाऊन सासरच्या मंडळींविरोधात तक्रार नोंदवू शकते. अशा प्रकरणांमध्ये देशभरातल्या विविध न्यायालयांनी वेगवेगळे निकाल दिले होते. त्यामध्ये काही न्यायालयांनी म्हटले होते की, सासरच्या जाचाने त्रासलेली महिला जर माहेरी राहत असेल, तर तिथल्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करु शकते. परंतु आता सुप्रीम कोर्टाने त्याहीपुढे जाऊन पीडित महिला कुठल्याही पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करु शकते असा निकाल दिला आहे. याप्रकरणी निकाल देताना सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे की, हुंड्यासाठी अथवा इतर कारणांमुळे एखाद्या विवाहितेचा सासरी छळ होत असेल, या छळाला कंटाळून ती पीडित महिला सासर सोडून माहेरी अथवा इतर कोणत्याही ठिकाणी राहत असेल, तर केवळ तक्रार दाखल करण्याकरता तिला परत तिच्या सासरी येण्यासाठी आपण भाग पाडू शकत नाही. ती महिला जिथे राहत असेल तिथल्या पोलीस ठाण्यात ती तक्रार दाखल करु शकते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हातीABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Embed widget