एक्स्प्लोर

संसदेच्या हिवाळी अधिवेशनात 250 कोटी रुपये पाण्यात

नवी दिल्ली: नोटबंदीच्या ऐतिहासिक निर्णयावर चर्चा करण्याऐवजी सभागृहात फक्त गोंधळ घालण्यातच खासदारांनी धन्यता मानल्याने संसदेचं हिवाळी अधिवेशनच पाण्यात गेलं आहे. अधिवेशनाच्या कामकाजासाठी एका मिनिटाचा खर्च अडीच लाख रुपये इतका आहे. मात्र कोट्यवधी रुपये खर्चूनही फक्त गोंधळच पाहायला मिळाला. 16 नोव्हेंबर ते 16 डिसेंबर असं एक महिन्याचं हिवाळी अधिवेशन नोटबंदीच्या मुद्द्यावरुन पूर्णपणे वाया गेलं. वास्तविक, नोटाबंदीचा निर्णय हा लोकांची जीवनशैली बदलून टाकणारा निर्णय होता. त्यामुळे त्यावर संसदेत काही चर्चा होणं अपेक्षित होतं. मात्र पूर्ण महिनाभर केवळ आणि केवळ गोंधळच ऐकायला मिळाला. या एक महिन्याच्या अधिवेशनात एकूण 22 दिवस कामकाजाचे होतं. यात 19 विधेयकं मंजूर होणं अपेक्षित होतं. मात्र विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमधील वादांमुळे केवळ दोनच विधेयकं मंजूर झाली. त्यातलं एक आयकर दुरुस्ती विधेयक तर गोंधळात कुठल्याही चर्चेविना उरकलं. तर दुसरं दिव्यांगांना त्यांचं हक्क मिळवून देणारं विधेयक. एका मिनिटाला अडीच लाख या हिशोबानं जवळपास 250 कोटी रुपये खर्च या अधिवेशनावर झाला. 1 एप्रिल 2017 पासून जीएसटीची अंमलबजावणी करण्यासाठी या अधिवेशनात जीएसटीच्या करासंदर्भातली चार महत्वाची विधेयकं येणार होती. मात्र विरोधकांच्या गोंधळी पवित्र्यामुळे ती पुढे ढकलावी लागली. अनेक खासदारांना त्यांच्या मतदारसंघातले प्रश्नही मांडता आले नाहीत. कारण गोंधळ घालताना प्रश्नकाळाचंही पावित्र्य जपलं गेलं नाही. त्यामुळेच पंतप्रधानांच्या सभा, राहुल गांधींच्या पत्रकार परिषदा हा सिलसिला चालूच होता. संसद ही गोंधळ घालण्याची जागा नव्हे, त्यासाठी रस्ते मोकळे आहेत इतक्या तिखट शब्दांत राष्ट्रपतींनी कान उपटूनही परिणाम नाही झाला. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी हे देखील या प्रकारानं उद्विग्न झाले. लोकसभेत कुठल्या नियमानुसार चर्चा करायची यावर महिनाभर गोंधळ घातला, तर राज्यसभेत पंतप्रधानांच्या उपस्थितीवरुन. विरोधक हट्टी आहेत तर सरकारही काही कमी नव्हतं. इतका क्रांतीकारी निर्णय होता, तर मग त्याबद्दल दोन शब्द संसदेत बोलायचं औदार्य मोदींनी का नाही दाखवलं हा देखील प्रश्न इतिहासात कायम विचारला जाईल. एकूणच संसदीय कार्यप्रणालीवरचा विश्वास कमी होऊन जनतेचीही अवस्था उद्विग्न मुखर्जी, अडवाणी यांच्याप्रमाणेच झालेली असणार आहे. आणि त्यांच्याप्रमाणेच जनतेलाही मूकपणे पाहण्याशिवाय पर्याय नाही.

महत्त्वाच्या बातम्या

कळसूत्री बाहुल्यांचे मोदी शाहाच सूत्रधार, तेच मतचोरी करून निवडणूक जिंकत आहेत; देशव्यापी मोर्चे ते निवडणूक आयोगावर भव्य मोर्चा, इंडिया आघाडीने निर्णायक रणशिंग फुंकलं!
कळसूत्री बाहुल्यांचे मोदी शाहाच सूत्रधार, तेच मतचोरी करून निवडणूक जिंकत आहेत; देशव्यापी मोर्चे ते निवडणूक आयोगावर भव्य मोर्चा, इंडिया आघाडीने निर्णायक रणशिंग फुंकलं!
Supreme Court on Firecracker Verdict: मोठी बातमी! फटाक्यांवरील देशव्यापी बंदीच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाचे महत्वाचे निरीक्षण; म्हणाले, पूर्णपणे बंदी घालता येणार नाही, पण...
मोठी बातमी! फटाक्यांवरील देशव्यापी बंदीच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाचे महत्वाचे निरीक्षण; म्हणाले, पूर्णपणे बंदी घालता येणार नाही, पण...
Asian Games 2026 : आईनं सोनं गहाण ठेऊन धनुष्यबाण घेऊन दिला; लेकानं गोल्ड जिंकत सुवर्णक्षण कमावला, वडिलांना आनंदाश्रू
आईनं सोनं गहाण ठेऊन धनुष्यबाण घेऊन दिला; लेकानं गोल्ड जिंकत सुवर्णक्षण कमावला, वडिलांना आनंदाश्रू
boAt Aavante Bar Prime Soniq-D Review: 240W डॉल्बी ऑडिओ, इक्विकोर ड्राइव्हर्ससह 2.1-चॅनेल साउंडबार, boAt Aavante Bar Prime SoniQ-D ची खास वैशिष्ट्य, वाचा सविस्तर
240W डॉल्बी ऑडिओ, इक्विकोर ड्राइव्हर्ससह 2.1-चॅनेल साउंडबार; boAt Aavante Bar Prime SoniQ-D ची खास वैशिष्ट्य, वाचा सविस्तर

व्हिडीओ

Thackeray Congress on EC : आयोगाविरोधात थोपटले दंड, विरोधकांची तयारी प्रचंड | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case : टॅटू, चॅटिंग, मर्डर; आरोपांचा डोंगर | Special Report ABP Majha
Raj Thackeray Rahul Gandhi : राज-राहुल संपर्क? चर्चेत राऊतांचा तर्क Special Report
Chakan MIDC : चाकणला 1400 कोटी मिळाले, उद्योजकांनी आभार मानले
Sanjay Raut on FDA Tukaram Mundhe : धाड मुंढेंची, कमाई अधिकाऱ्यांची?राऊतांच्या पत्राने खळबळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कळसूत्री बाहुल्यांचे मोदी शाहाच सूत्रधार, तेच मतचोरी करून निवडणूक जिंकत आहेत; देशव्यापी मोर्चे ते निवडणूक आयोगावर भव्य मोर्चा, इंडिया आघाडीने निर्णायक रणशिंग फुंकलं!
कळसूत्री बाहुल्यांचे मोदी शाहाच सूत्रधार, तेच मतचोरी करून निवडणूक जिंकत आहेत; देशव्यापी मोर्चे ते निवडणूक आयोगावर भव्य मोर्चा, इंडिया आघाडीने निर्णायक रणशिंग फुंकलं!
सांगली बँकेच्या निवडणुकांसाठी गोपीचंद पडळकरांचा अर्ज, जयंत पाटलांविरुद्ध घोषणाबाजी; कार्यालयात तणाव
सांगली बँकेच्या निवडणुकांसाठी गोपीचंद पडळकरांचा अर्ज, जयंत पाटलांविरुद्ध घोषणाबाजी; कार्यालयात तणाव
Supreme Court on Firecracker Verdict: मोठी बातमी! फटाक्यांवरील देशव्यापी बंदीच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाचे महत्वाचे निरीक्षण; म्हणाले, पूर्णपणे बंदी घालता येणार नाही, पण...
मोठी बातमी! फटाक्यांवरील देशव्यापी बंदीच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाचे महत्वाचे निरीक्षण; म्हणाले, पूर्णपणे बंदी घालता येणार नाही, पण...
Gold Silver Rate: आज सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीचे दरही कोसळले, दोन दिवसांमध्ये 'इतक्या' हजारांनी झाले कमी, जाणून घ्या आजचे दर
आज सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीचे दरही कोसळले, दोन दिवसांमध्ये 'इतक्या' हजारांनी झाले कमी, जाणून घ्या आजचे दर
Asian Games 2026 : आईनं सोनं गहाण ठेऊन धनुष्यबाण घेऊन दिला; लेकानं गोल्ड जिंकत सुवर्णक्षण कमावला, वडिलांना आनंदाश्रू
आईनं सोनं गहाण ठेऊन धनुष्यबाण घेऊन दिला; लेकानं गोल्ड जिंकत सुवर्णक्षण कमावला, वडिलांना आनंदाश्रू
Plane Hijack: विमानात वाद अन् दाबला गेला हायजॅकिंगचा कोड! अलर्टने इस्रायल-सौदीत उडाली धावपळ, फ्लाय दुबईच्या विमानात नेमकं काय घडलं? तासाभराच्या थरारानंतर अखेर सत्य समोर
विमानात वाद अन् दाबला गेला हायजॅकिंगचा कोड! अलर्टने इस्रायल-सौदीत उडाली धावपळ, फ्लाय दुबईच्या विमानात नेमकं काय घडलं? तासाभराच्या थरारानंतर अखेर सत्य समोर
Maharashtra Goverment On Agniveer: ना परीक्षा, ना ट्रेनिंग, कुठलीही अट नाही; अग्निवीरांना पोलिसांच्या पदावर घेणार, महाराष्ट्र सरकारचा सगळ्यात मोठा निर्णय
ना परीक्षा, ना ट्रेनिंग, कुठलीही अट नाही; अग्निवीरांना पोलिसांच्या पदावर घेणार, महाराष्ट्र सरकारचा सगळ्यात मोठा निर्णय
Manoj Jarange Defender Car : मनोज जरांगेंनी वापरलेली 'ती' वादग्रस्त डिफेंडर गाडी सोलापूर जिल्ह्यात परतली; गावोगावी गाडीची पूजा, नागरिक म्हणाले, 'गाडीमध्ये ज्या सिटावरती हे आमचं दैवत बसलं होतं....'
मनोज जरांगेंनी वापरलेली 'ती' वादग्रस्त डिफेंडर गाडी सोलापूर जिल्ह्यात परतली; गावोगावी गाडीची पूजा, नागरिक म्हणाले, 'गाडीमध्ये ज्या सिटावरती हे आमचं दैवत बसलं होतं....'
Embed widget