एक्स्प्लोर

कलम 371 ला हातही लावणार नाही : अमित शाह

अमित शाह हे ईशान्य परिषदेचे अध्यक्षही आहेत. गुवाहाटीमध्ये आयोजित या बैठकीत पूर्वोत्तरमधील आठ राज्यांचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री सहभागी झाले होते.

गुवाहाटी : कलम 371 ला हातही लावणार नाही, असं आश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिलं. कलम 371 हे आसामसह पूर्वोत्तरमधील सर्व राज्यांना विशेष घटनात्मक दर्जा देतं. कलम 370 हटवल्यानंतर विरोधकांनी मोहीम राबवून कलम 371 ही हटवणार असल्याची अफवा पसरवली आहे, असा आरोपही शाह यांनी केला. अमित शाह रविवारी (8 सप्टेंबर) गुवाहाटी इथे बोलत होते. अमित शाह हे ईशान्य परिषदेचे अध्यक्षही आहेत. गुवाहाटीमध्ये आयोजित या बैठकीत पूर्वोत्तरमधील आठ राज्यांचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री सहभागी झाले होते. ईशान्य परिषदेच्या 68व्या बैठकीला संबोधित करताना अमित शाह म्हणाले की, "जम्मू-काश्मीरसाठीचं कलम 370 हटवल्यानंतर टीका होत आहे. लोकशाही असलेल्या देशात असं करण्याचा सगळ्यांना अधिकार आहे. पण याचा कलम 371 सोबतही संबंध लावला जात आहे. पूर्वोत्तर राज्यातील नागरिकांच्या मनात संभ्रम निर्माण केला जात आहे. पण कलम 370 आणि 371 मध्ये फार अंतर आहे. 'कलम 370 तात्पुरतं, तर कलम 371 विशेष तरतूद' शाह म्हणाले की, "मी संसदेतही स्पष्ट केलं होतं आणि इथेही सांगू इच्छितो, कलम 371 हटवलं जाणार नाही. कलम 370 ही तात्पुरतं होतं. जर कलम 371 ही विशेष तरतूद आहे. दोघांमधील हा मुख्य फरक आहे. नरेंद्र मोदी सरकार कलम 371 आणि 371 (ए) पासून 371 (जे) अंतर्गत सर्व तरतुदींचा सन्मान करतं. मी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पुन्हा आश्वासन देतो की, कलम 371 ला हातही लावणार नाही." काय आहे कलम 371? कलम 371 मध्ये अनेक राज्यांसाठी विशेष तरतुदी आहेत. यापैकी बहुतांश राज्ये पूर्वोत्तर भारतातील आहेत. संविधानातील हे कलम जनजातीय संस्कृतीला संरक्षण प्रदान करण्यावर भर देतं. याच आधारावर त्यांना या कलमाच्या माध्यमातून विशेष दर्जा मिळाला आहे. आसाममध्ये एनआरसीचं काम वेळेत पूर्ण "एकाही घुसखोराला देशात थारा देणार नाही. आसाममध्ये वेळेत एनआरसीचं काम पूर्ण झालं आहे," असं अमित शाह यांनी सांगितलं. अमित शाह ने कहा, "नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीझन्स (NRC)वर अनेकांनी वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले आहेत. पण मला स्पष्ट करायचं आहे की, "एकाही अवैध नागरिकाला भारत सरकार देशात थारा देणार नाही." 3.11 कोटी लोकांची नावं एनआरसीमध्ये आसामच्या 3 कोटी 30 लाख 27 हजार 661 लोकांनी एनआरसीसाठी अर्ज केला होता. 31 ऑगस्ट रोजी जारी झालेल्या यादीत 3 कोटी 11 लाख 21 हजार 4 लोकांची नावं आहेत. तर 19 लाख 6 हजार 657 लोकांच्या नावांचा यादीत समावेश नाही. "ज्यांची नावं एनआरसीमध्ये नाहीत त्यांना परदेशी लवादसमोर आपली नागरिकता सिद्ध करण्याची संधी मिळेल," असं आसाम सरकारने सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या

Congress Vs CJP : टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
हवाई प्रवाशांना मोठा फटका! सणासुदीच्या मुहूर्तावर हवाई प्रवास महागला, नेमकी किती झाली वाढ? 
हवाई प्रवाशांना मोठा फटका! सणासुदीच्या मुहूर्तावर हवाई प्रवास महागला, नेमकी किती झाली वाढ? 
Rahul Gandhi: काँग्रेसचं सलग तिसऱ्या दिवशी आंदोलन...जे खासदार आंदोलनात आले नाहीत त्यांची यादी तयार करा, राहुल गांधी यांची केसी वेणुगोपाल यांना सूचना
जे खासदार आंदोलनात आले नाहीत त्यांची यादी तयार करा, राहुल गांधी यांची केसी वेणुगोपाल यांना सूचना
GST Council Meeting : अधिकाऱ्यांची अटक करण्याची शक्ती रद्द, 10 हजारांपर्यंतच्या दंडालाही ब्रेक; जीएसटी कौन्सिलचा मोठा निर्णय
अधिकाऱ्यांची अटक करण्याची शक्ती रद्द, 10 हजारांपर्यंतच्या दंडालाही ब्रेक; जीएसटी कौन्सिलचा मोठा निर्णय

व्हिडीओ

Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
USA : अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?
अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?
Congress Vs CJP : टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
Drought Relief Maharashtra : दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
Donald Trump : भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
पाकिस्तानला धक्का, भारतात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीतून वगळलं, पाकची मागणी अमान्य करत बागंलादेशला संधी
पाकिस्तानला धक्का,भारतातील चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेरचा रस्ता, पाकची मागणी अमान्य, बांगलादेशला लॉटरी
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
Home Loan :  रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
 रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
CJP Protest In Bengaluru: बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
Embed widget