COVID 19 new Variants: जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) एका मोठ्या अधिकाऱ्याने कोरोनाबाबत एक महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांच्यामते ओमायक्रॉन (Omicron) हा कोरोनाचा शेवटचा व्हेरियंट नसून यानंतरही नवे व्हेरियंट येऊ शकतात असं त्यांनी सांगितलं आहे. तसंच काळजी घेणंही कायम ठेवण्याचा महत्त्वाचा सल्ला दिला आहे.


विषाणूवर आमची बारीक नजर - WHO


WHO चे अधिकारी सोशल मीडियावर आयोजित प्रश्न-उत्तराच्या सत्रात बोलत होते. यावेळी कोव्हिड-19 च्या तांत्रिक दलातील मारिया वान केरखोव यांनी ओमाक्रॉनच्या चार वेगवेगळ्या प्रकारांबाबत बोलताना या सर्वावर आमची बारीक नजर असल्याचं सांगितलं. तसंच त्या म्हणाल्या, 'आम्ही आता या व्हायरसबाबत बऱ्याच गोष्टी जाणतो, पण सर्व गोष्टी माहित नसल्याने या व्हायरस प्रकाराला एक 'वाइल्ड कार्ड' म्हणू शकतो. पण या सर्वावर आमची बारीक नजर असली तरी नागरिकांनी काळजी घेणंही गरजेचं आहे.'


लसीकरण महत्त्वाच - WHO


यावेळी WHO च्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीत हे चिंताजनक असलं तरी कोरोनावरील लस एक मोठा दिलासा असून सर्वांचं संपूर्ण लसीकरण होणं गरजेचं आहे. या विषाणूपासून वाचण्यासाठी हे एक मोठं शस्त्र असल्याचंही WHO नं सांगितलं आहे.  


महाराष्ट्रात तयार झाली भारताची पहिली मेसेंजर आरएनए कोरोना लस


वर्षभरापासून भारतामध्ये कोरोना लसीकरण सुरु आहे. कोरोना महामारीला रोखण्यासाठी लसीकरण एक महत्वाचं शस्त्र ठरत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची गुरुवारी देशातील कोरोना परिस्थितीसंदर्भात पत्रकार परिषद झाली. यामध्ये केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देशाली कोरोना स्थितीची माहिती देण्यात आली. त्यासोबतच एक दिलासादायक बातमी दिली आहे. भारताची पहिली मेसेंजर आरएनए Messenger RNA (mRNA)  कोरोना लस जवळपास तयार झाली आहे. ही लस पुण्यात तयार झाली आहे. भारताची पहिली मेसेंजर आरएनए कोरोना लस अंतिम टप्यात आहे. ही लस पुण्यातील जेनोवा बायोफार्मास्युटिकल्स (Gennova Biopharmaceutical ) यांनी विकसीत केली आहे. पुढील काही दिवसांमध्ये ही लस वापरास येऊ शकते, असे निती आयोगाचे सदस्य व्ही के पॉल यांनी सांगितले.  


संबंधित बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha