Uttar Pradesh Election 2022 : उत्तर प्रदेशातील (UP elections 2022) पश्चिम भागात आज 58 जागांवर मतदान पार पडले, तर दुसरीकडे,  पुढील टप्प्याचा प्रचारही जोरात सुरू आहे. गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सहारनपूरमध्ये एका सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी मुस्लिम महिलांचा उल्लेख करत विरोधकांवर निशाणा साधला. 


"राजकारणासाठी मुस्लिम मुलींचा वापर केला जातोय" - पंतप्रधान


विरोधकांवर निशाणा साधताना PM मोदी म्हणाले की, "समाजकंटकांकडून केवळ राजकारणासाठी मुस्लिम मुलींना भरकटविण्याचा प्रयत्न करण्यात येतोय, आमचे सरकार सदैव मुस्लिम महिलांच्या पाठीशी उभे आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, जेव्हा मुस्लिम महिलांचा पाठिंबा भाजपला उघडपणे मिळू लागला. तेव्हा मतांच्या ठेकेदारांची झोप उडाली. त्याच्या पोटात दुखू लागले. जेव्हा मुस्लिम मुलींनी आपले व्हिडिओ सोशल मिडियावर टाकत भाजप सरकारचे कौतुक करण्यास सुरुवात केली. तेव्हा जे मतांचे ठेकेदार आहेत, त्यांची झोप उडाली, ते अस्वस्थ झाले. कारण बऱ्याच शतकांनंतर इतका मोठा सन्मान भाजपाला मिळाला. " मुस्लिम मुलींकडून मोदींची स्तुती करतानाचे त्यांचे व्हिडीओ पाहून या ठेकेदारांना वाटले की, या मुलींना थांबवावे लागेल. जर ती मोदींकडे गेली तर त्यांची सत्ता जाईल." त्यामुळे मुस्लिम भगिनी-मुलींना त्यांचे हक्क न मिळण्यासाठी, त्यांच्या विकासाच्या आकांक्षा रोखण्यासाठी नवनवीन मार्ग शोधले जात आहेत."


 






 


देशाच्या विकासात महिलांचा सहभाग हवा


सहारनपूर येथील सभेत पंतप्रधान मोदी म्हणाले, "सबका साथ सबका विकास हा यूपीचा मूळ मंत्र आहे. भाजपसाठी देशाच्या विकासात महिलांचा सहभाग ही सर्वात मोठी प्राथमिकता आहे, त्यामुळे आज प्रत्येक क्षेत्र मुलींसाठी खुले केले जात आहे. मुस्लिम महिला आमच्या विकासाचा स्पष्ट हेतू चांगल्याप्रकारे समजतात. आम्ही मुस्लिम भगिनींना तिहेरी तलाकच्या अत्याचारातून मुक्त केले आहे. आम्ही तिहेरी तलाकविरोधातील कायद्याने मुस्लिम भगिनींना सुरक्षिततेचा विश्वास दिला आहे."


इतर महत्त्वाच्या बातम्या: