Long Covid Symptoms In Omicron: कोरोना व्हायरसने (Corona Virus) लोक प्रचंड त्रस्त झाले आहेत. त्याचवेळी, आता कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉन (Omicron) देखील वेगाने पसरत आहे आणि लोकांना आपल्या विळख्यात अडकवत आहे. ओमायक्रॉनचा धोका लक्षात घेता, डॉक्टरांनीही लोकांना विशेष खबरदारी घेण्यास सांगितले आहे. त्यामुळे कोरोनाच्या काळात तुम्ही स्वतःची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.


त्याच वेळी ओमायक्रॉनमधून बरे झालेल्या काही लोकांमध्ये लाँग कोविडची लक्षणे (Long Covid Symptoms) दिसत आहेत. त्यामुळे लोक त्रस्त झाले आहेत. अशा परिस्थितीत, तुम्ही देखील काळजीत असाल, तर टेन्शन घेण्याची गरज नाही. आम्ही तुम्हाला अशाच काही लक्षणांबद्दल सांगणार आहोत, जे तुम्हाला तुमच्या शरीरात दीर्घकाळ दिसू शकतात. चला जाणून घेऊया...


ओमायक्रॉन व्हेरियंटच्या रुग्णांमध्ये दिसतात ‘ही’ लाँग कोविडची लक्षणे


अनेक ओमायक्रॉन व्हेरियंट रुग्ण बरे झाल्यानंतरही त्यांना अधिक थकवा जाणवत आहे. दुसरीकडे, पुरुषांच्या तुलनेत महिलांना थकवा अधिक जाणवत असल्याचे दिसून येते. त्याच वेळी, असेही मानले जाते आहे की, लोकांची जीवनशैली देखील थकव्याचे कारण असू शकते. परंतु, ओमायक्रॉन संसर्गाने ग्रस्त लोकांमध्ये थकवा आणि अशक्तपणा हे एक प्रमुख लक्षण मानले जाते. तथापि, या सर्वांसोबत, इतर काही लक्षणे देखील दिसून येत आहेत, ज्याकडे लोकांनी विशेष लक्ष दिले पाहिजे आणि काळजी देखील घेतली पाहिजे.


‘ही’ आहेत लाँग कोविडची लक्षणे :


* चव आणि वासाची जाणीव कमी होणे म्हणजेच वासाची जाणीव आणि चव ओळखण्याची क्षमता कमी होणे.


* वाहती सर्दी


* डोकेदुखी


जर, तुम्हाला ओमायक्रॉनचा संसर्ग झाला असेल, तर ही लक्षणे तुम्हालाही बराचकाळ त्रास देऊ शकतात.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


संबंधित बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha