Amandeep Kaur : हातात दोन लाखाचे घड्याळ, गाॅगल 85 हजारचा, जुनी थार विकून नवीन थार अन् बरंच काही! दोनदा निलंबित, आता तुरुंगात; रील स्टार हेड कॉन्स्टेबल आहे तरी कोण?
अमनदीप कौर सोशल मीडियावर खूप सक्रिय होती. ती इन्स्टावर 'इन्स्टा क्वीन' म्हणून प्रसिद्ध होती. 27 वर्षीय अमनदीप पूर्वी मानसा येथे तैनात होती आणि नुकतीच भटिंडा पोलिस लाइन्समध्ये पोस्ट करण्यात आली होती

Who is Amandeep Kaur : पंजाब पोलिसांनी गुरुवारी एका सोशल मीडियातील चमको महिला कॉन्स्टेबलला सेवेतून बडतर्फ केलं आहे. तिला भटिंडा जिल्ह्यात 17.71 ग्रॅम हेरॉईनसह अटक करण्यात आली. अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्स आणि पंजाब पोलिसांनी अमनदीप कौरला बादल रोड, भटिंडा येथून अटक केली. ती थारमधून प्रवास करत होती आणि पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ती हेरॉईनचा पुरवठा करणार होती. थार अमनदीप कौरने 20 दिवसांपूर्वीच खरेदी केल्याचे पोलिसांनी सांगितले.
गिअर बॉक्समधून सुमारे 17 ग्रॅम हेरॉइन सापडले
इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार डीजीपी सुखचैन सिंग गिल यांनी सांगितले की, हेड कॉन्स्टेबल अमनदीप कौर सध्या भटिंडा येथील पोलीस लाईन्समध्ये कर्तव्य बजावत होती. पोलिसांनी अमनदीपची कार थांबवताच, अमनदीपने प्रथम कर्मचाऱ्यांना धमकावण्यास सुरुवात केली आणि काही न झाल्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पथकाने तत्काळ पाठलाग करून पकडले. कारची झडती घेतली असता गिअर बॉक्समधून सुमारे 17 ग्रॅम हेरॉइन सापडले.
ये है हेड कांस्टेबल अमनदीप कौर -हाथ में जो घड़ी है, उसकी कीमत 2 लाख रुपए है। चश्मा 85 हजार रुपए का है। पुरानी थार बेचकर नई थार खरीदी है। जीजा को बुलेट खरीदकर गिफ्ट की है। 50 लाख रुपए का एक प्लॉट है। जिस कोठी में खुद रहती है, उसमें करोड़ों का फर्नीचर है।
— Gagan Pratap 🇮🇳 (@GaganPratapMath) April 5, 2025
दरअसल, अमनदीप कौर हेरोइन… pic.twitter.com/oit4g1jHO0
अमनदीप कौर सोशल मीडियावर खूप सक्रिय
अमनदीप कौर सोशल मीडियावर खूप सक्रिय होती. ती इन्स्टाग्रामवर 'इन्स्टा क्वीन' म्हणून प्रसिद्ध होती. 27 वर्षीय अमनदीप पूर्वी मानसा येथे तैनात होती आणि नुकतीच भटिंडा पोलिस लाइन्समध्ये पोस्ट करण्यात आली होती, ती सोशल मीडियावरील ग्लॅमरस रील्समुळे देखील चर्चेत होती. अमनदीप खाकी वर्दीत पंजाबी गाण्यांवर रील बनवत असे, त्यामुळे सोशल मीडियावर तिचे जवळपास 30 हजार फॉलोअर्स होते. 26 नोव्हेंबर 2011 रोजी अमनदीप पंजाब पोलिसात भरती झाली होती. अत्यं उच्चभ्रू लाईफस्टाईल ती जगत होती. वाडा, महागड्या गाड्या, घड्याळे आणि सोन्याच्या चेनचा छंद तिच्या आयुष्याचा एक भाग होता.
ये है अमनदीप कौर। पंजाब पुलिस की बर्खास्त हेड कांस्टेबल। हाथ में जो घड़ी है, उसकी कीमत 2 लाख रुपए है। चश्मा 85 हजार रुपए का है। पुरानी थार बेचकर नई थार खरीदी है। जीजा को बुलेट खरीदकर गिफ्ट की है। 50 लाख रुपए का एक प्लॉट है। जिस कोठी में खुद रहती है, उसमें करोड़ों का फर्नीचर है।… pic.twitter.com/toAMcnzB8V
— Sachin Gupta (@SachinGuptaUP) April 4, 2025
महिला कॉन्स्टेबलच्या मालमत्तेची चौकशी केली जाईल
अहवालानुसार, अधिकाऱ्याने सांगितले की, भारतीय राज्यघटनेच्या कलम 311 अंतर्गत अमनदीपला सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. गिल म्हणाले, "सध्या सुरू असलेल्या अमली पदार्थ विरोधी मोहिमेच्या अनुषंगाने मुख्यमंत्री भगवंत मान यांनी दिलेल्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली. महिला कॉन्स्टेबलने गुन्ह्यातून मिळवलेल्या सर्व संपत्तीचीही चौकशी करून कायद्यानुसार कारवाई करू." अमनदीप कौरची एसयूव्ही, महिंद्रा थार भटिंडा येथील बादल फ्लायओव्हरजवळ थांबली अधिकाऱ्याने सांगितले की, झडती घेतल्यानंतर पोलिसांना 17.71 ग्रॅम हेरॉईन सापडले आणि एसयूव्ही जप्त करण्यात आली. दरम्यान, चौकशीसाठी थांबल्यावर अमनदीपने वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याशी असलेले जवळचे संबंध उघड करण्यासाठी व्हॉट्सॲप मेसेज, चॅट्स आणि छायाचित्रे दाखवल्याचे कळते. "अलीकडेच, फाजिल्का ते भटिंडा येथे मोठ्या प्रमाणात हेरॉइन घेऊन जात असल्याचा संशय आला आणि तिला एका चौकीवर पोलीस कर्मचाऱ्यांनी थांबवले. तिने त्यांना तिची गाडी तपासू दिली नाही आणि पोलीस असल्याचे भासवून पळून जाण्यात यशस्वी झाली," असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
अमनदीपवर अनेक आरोप केले जात आहेत
दरम्यान, गुरमीत कौर नावाच्या महिलेने फेसबुकवर लाइव्ह जाऊन दावा केला की, अमनदीपसह तिचा पती बलविंदर सिंगने हेरॉइन विकण्यासाठी रुग्णवाहिकेचा वापर केला होता. रिपोर्टनुसार, महिलेने सांगितले की, तिचा नवरा 2022 पासून अमनदीपसोबत राहत होता. तिने दावा केला की अमनदीपचे 2015 मध्ये लग्न झाले होते. मात्र, नंतर तिच्या पतीला बलात्काराच्या प्रकरणात अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले. याआधी फेब्रुवारीमध्ये पंजाब पोलिसांनी 52 कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ केले होते, ज्यांच्यावर भ्रष्टाचारासह कर्तव्यात कसूर, अंमली पदार्थांच्या व्यापारात सहभाग आणि बराच काळ कर्तव्यावर गैरहजर राहण्याचा आरोप होता. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, भ्रष्टाचाराच्या आरोपांना सामोरे जाणाऱ्या पोलिसांची आणखी एक यादी तयार करण्यात येत असून येत्या काही दिवसांत सुमारे तीन डझन पोलिस कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ केले जाणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या























