(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मोदी सरकारचे 20 लाख कोटी गेले कुठे? युवक काँग्रेस करणार पर्दाफाश आंदोलन
मोदी सरकारने घोषित केलेले 20 लाख कोटी कुठे गेले असा प्रश्न उपस्थित करत महाराष्ट्र युवक काँग्रेस एक अनोखं राज्यव्यापी आंदोलन करणार आहे.
नवी दिल्ली : कुठे गेले ते वीस लाख कोटी रुपये? हा सवाल उपस्थित करत महाराष्ट्र युवक काँग्रेस एक अनोखं राज्यव्यापी आंदोलन करणार आहे. पंतप्रधान मोदी यांनी 12 मे 2020 रोजी 20 लाख कोटींच्या पॅकेजची घोषणा केली होती. पण जमिनीवर याची किती अंमलबजावणी झाली आहे हे दाखवण्यासाठी हे पर्दाफाश आंदोलन करत असल्याचा युवक काँग्रेसचा दावा आहे. युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी ही माहिती दिली.
10 ते 14 ऑगस्ट या कालावधीत चालणाऱ्या या आंदोलनात युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते पहिल्या दिवशी शेतकऱ्यांकडे जाऊन या 20 लाख कोटी पॅकेजचा काही लाभ मिळाला आहे की नाही व त्यांच्या प्रतिक्रिया व्हिडीओ चित्रित करणार आहेत. सोबतच पंतप्रधान कार्यालयाला फोन करुन आणि पत्र लिहून मागण्यासमोर ठेवायला मदत करणार आहेत. दर दिवशी एका घटकाला भेटून त्यांच्या मागण्या सरकारसमोर ठेवण्यात येणार आहेत.
उद्धव ठाकरे देशातील लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत, योगी आदित्यनाथ सर्वाधिक लोकप्रिय
काँग्रेसचे पर्दाफाश आंदोलन
छोट्या व्यापाऱ्यांना जीएसटीमध्ये सवलत मिळाली का? नोकरदारांच्या काय अडचणी आहेत, बेरोजगार झालेल्या युवकांना काय मदत मिळाली ह्याचा पर्दाफाश युवक काँग्रेस करणार असून ह्या सर्वांच्या मागण्या व्हिडिओ चित्रण करुन व पंतप्रधान कार्यालयाला फोन करून व पत्र लिहून सरकारला जाब विचारणार आहेत. पंतप्रधानांच्या घोषणेनंतर अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी एका पाठोपाठ एक पत्रकार परिषद घेऊन या पॅकेज संदर्भातल्या घोषणा केल्या होत्या. जर खरोखर या पॅकेजची अंमलबजावणी झाली असती तर अनेक घटकांची परिस्थिती सुधारली असती. मात्र, प्रत्यक्षात तसे झाले नाही त्यामुळे हे आंदोलन करण्याची वेळ आली असल्याचं युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी म्हटलं आहे.
TOP 50 | गल्ली ते दिल्ली महत्त्वाच्या बातम्यांचा संक्षिप्त आढावा | बातम्यांचं अर्धशतक