एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

कर्नाटक : बहुमत सिद्ध करताना आकड्यांची जुळवाजुळव कशी असेल?

कर्नाटकात कोणत्याही पक्षाला बहुमत न मिळाल्याने मोठा पेच निर्माण झाला होता. मात्र भाजपने सत्ता स्थापनेचा दावा करत, येडियुरप्पा यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीचा सोहळाही पार पाडला.

बंगळुरु : भाजपच्या बी. एस. येडियुरप्पा यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. येडियुरप्पा हे तिसऱ्यांदा कर्नाटकाच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. मात्र येडियुरप्पा यांना उद्या शनिवारी दुपारी 4 वाजता सभागृहात बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. कर्नाटकात कोणत्याही पक्षाला बहुमत न मिळाल्याने मोठा पेच निर्माण झाला होता. मात्र भाजपने सत्ता स्थापनेचा दावा करत, येडियुरप्पा यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीचा सोहळाही पार पाडला. कुणाला किती जागा? कर्नाटक विधानसभेच्या 224 पैकी 222 जागांसाठी मतदान झालं होतं. बहुमताचा आकडा 112 आहे. यामध्ये भाजपने सर्वाधिक 104 जागा मिळवल्या आहेत.  तर काँग्रेसला एकूण 78 आणि जेडीएस 38 जागा मिळाल्या आहेत. मात्र काँग्रेसने जेडीएसला पाठिंबा देऊन सत्ता स्थापन करण्यासाठी मोकळीक दिली आहे. त्यामुळे काँग्रेस आणि जेडीएसकडे मिळून 116 आमदारांचं बळ आहे. भाजपसमोर पर्याय काय? भाजपकडे स्वतःचे 104 आमदार आहेत. जर अपक्ष, केपीजेपी आणि बसपाचा एक आमदार सोबत आला, तर हा आकडा 107 होईल. मात्र तरीही भाजपकडे 112 हा आकडा गाठण्यासाठी जागा कमी पडतील. अशा परिस्थितीमध्ये काँग्रेसच्या सात लिंगायत आमदारांचा आपल्याला पाठिंबा असल्याचा भाजपचा दावा आहे. काँग्रेसच्या सात आमदारांनी पाठिंबा दिल्यास एकूण आकडा 114 होईल. मात्र भाजपचा हा दावा Anti-defection law च्या विरोधात आहे. या परिस्थितीमध्ये सभागृहात अविश्वास ठराव पास करायचा असेल, तर काँग्रेसच्या त्या सात आमदारांना गैरहजर रहावं लागेल, किंवा राजीनामा द्यावा लागेल. तेव्हा विधानसभेत 215 आमदार उरतील. यानंतर बहुमताचा आकडाही घटून 108 वर येईल. मात्र तरीही भाजपला एक आमदार कमी पडणार आहे. काँग्रेस-जेडीएसचं सरकार कसं स्थापन होईल? कर्नाटकच्या निवडणुकीत काँग्रेसला 78 जागा मिळाल्या आहेत. काँग्रेस दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला. काँग्रेसने भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी जेडीएसला मुख्यमंत्रिपदाची ऑफर देत समर्थनाची घोषण केली. त्यामुळे काँग्रेसचे 78 आणि जेडीएसच्या 38 जागा मिळून आकडा 116 होत आहे, जो बहुमतापेक्षा चारने जास्त आहे. जेडीएसचे कुमारस्वामी मुख्यमंत्री झाले, तर ते दुसऱ्यांदा जागा कमी असतानाही मुख्यमंत्री होतील. यापूर्वी 2004 सालीही जेडीएसला 58 जागा मिळाल्या होत्या. मात्र भाजपच्या समर्थनामुळे कुमारस्वामी कर्नाटकचे मुख्यमंत्री झाले होते. नियम काय सांगतो? राज्यपाल अगोदर सरकार स्थापनेसाठी सर्वात मोठ्या पक्षाला निमंत्रण देतात. मात्र गोवा आणि मणिपूरमध्ये राज्यपालांनी सरकार स्थापनेसाठी दुसऱ्या क्रमांकाच्या पक्षाला निमंत्रण दिलं होतं. या दोन्हीही ठिकाणी निमंत्रण मिळणाऱ्या पक्षाने सभागृहात बहुमत सिद्ध करण्यात यश मिळवलं. कर्नाटक विधानसभा निवडणूक निकाल 2018 भाजप 104 काँग्रेस 78 जनता दल (सेक्युलर) 37 बहुजन समाज पार्टी 1 कर्नाटक प्रज्ञावंत जनता पार्टी 1 अपक्ष 1
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Gaikwad : आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
Numerology : अत्यंत अतिशहाणे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; दुसऱ्यांना लेखतात कमी, स्वत:चंच म्हणणं करतात खरं
अत्यंत अतिशहाणे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; दुसऱ्यांना लेखतात कमी, स्वत:चंच करतात खरं
Maharashtra Ekikaran Samiti : बेळगावात मराठी भाषकांच्या मेळाव्यास परवानगी नाहीच, कडक कारवाई करण्याचा कर्नाटक पोलिसांचा इशारा
बेळगावात मराठी भाषकांच्या मेळाव्यास परवानगी नाहीच, कडक कारवाई करण्याचा कर्नाटक पोलिसांचा इशारा
Waqf Board : काळजीवाहू सरकार असताना वक्फ बोर्डला 10 कोटींचा निधी, या प्रकाराची चौकशी करणार; देवेंद्र फडणवीसांचा पहिला मोठा निर्णय
काळजीवाहू सरकार असताना वक्फ बोर्डला 10 कोटींचा निधी, या प्रकाराची चौकशी करणार; देवेंद्र फडणवीसांचा पहिला मोठा निर्णय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour : सत्तानाट्यात अचानक सातारा जिल्ह्याची एण्ट्री, शपथविधी 5 डिसेंबरला?Rahul Shewale On Amit Shah Meeting |एकनाथ शिंदेंचा आदर राखून पुढचे निर्णय घेतले जातीलEknath Shinde Vastav EP 109 : गुवाहाटीला जाणारे शिंदे आणि दरे गावात नाराज शिंदे- एक वर्तुळ पूर्णVinay Sahasrabuddhe On Maharashtra CM | छोट्या पक्षांसोबत नेहमी न्याय केला,अन्याय होतो म्हणणं चुकीचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Gaikwad : आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
Numerology : अत्यंत अतिशहाणे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; दुसऱ्यांना लेखतात कमी, स्वत:चंच म्हणणं करतात खरं
अत्यंत अतिशहाणे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; दुसऱ्यांना लेखतात कमी, स्वत:चंच करतात खरं
Maharashtra Ekikaran Samiti : बेळगावात मराठी भाषकांच्या मेळाव्यास परवानगी नाहीच, कडक कारवाई करण्याचा कर्नाटक पोलिसांचा इशारा
बेळगावात मराठी भाषकांच्या मेळाव्यास परवानगी नाहीच, कडक कारवाई करण्याचा कर्नाटक पोलिसांचा इशारा
Waqf Board : काळजीवाहू सरकार असताना वक्फ बोर्डला 10 कोटींचा निधी, या प्रकाराची चौकशी करणार; देवेंद्र फडणवीसांचा पहिला मोठा निर्णय
काळजीवाहू सरकार असताना वक्फ बोर्डला 10 कोटींचा निधी, या प्रकाराची चौकशी करणार; देवेंद्र फडणवीसांचा पहिला मोठा निर्णय
AR Rahman Net Worth : भारतापासून अमेरिकेपर्यंत आलिशान घरे, महागड्या कार; किंग कोहलीपेक्षाही गर्भश्रीमंत, एकूण किती हजार कोटींचा मालक?
एआर रहमान : भारतापासून अमेरिकेपर्यंत आलिशान घरे, महागड्या कार; किंग कोहलीपेक्षाही गर्भश्रीमंत, एकूण किती हजार कोटींचा मालक?
Champions Trophy : तर चॅम्पियन्स ट्रॉफी भारतामध्ये होणार? पाकिस्तानात होणार की नाही? आजच निर्णय होण्याची शक्यता
तर चॅम्पियन्स ट्रॉफी भारतामध्ये होणार? पाकिस्तानात होणार की नाही? आजच निर्णय होण्याची शक्यता
डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे गेला चिमुकल्याचा जीव, मृत्यूनंतर 11 दिवस ठेवलं व्हेंटिलेटरवर; संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार
डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे गेला चिमुकल्याचा जीव, मृत्यूनंतर 11 दिवस ठेवलं व्हेंटिलेटरवर; संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार
Hardik Pandya Video : 6,0,6,6,4,6 हार्दिक पांड्याची पुन्हा एकदा त्सुनामी! एकाच षटकात 28 धावांचा पाऊस पाडत 52 चेंडूत सामना संपवला
Video : 6,0,6,6,4,6 हार्दिक पांड्याची पुन्हा एकदा त्सुनामी! एकाच षटकात 28 धावांचा पाऊस पाडत अवघ्या 52 चेंडूत सामना संपवला
Embed widget