Teesta Prahar : चीनच्या कुरापतींना उत्तर देण्यासाठी भारताचा 'तीस्ता प्रहार', धाडसी युद्धाभ्यासाने जग आचंबित
Teesta Prahar : एकीकडे पाकिस्तानसोबत लढण्यास सज्ज असताना दुसऱ्या फ्रन्टवर म्हणजे चीनला उत्तर देण्यासाठीही भारतीय लष्कर तयार असल्याचा संदेश देण्यात आला.

मुंबई : भारताचं ऑपरेशन सिंदूर सुरू असताना दुसरीकडे चीनच्या कुरापतींवरही भारताची नजर होती. म्हणूनच युद्धजन्य परिस्थितीतही भारतीय सैन्यदलाची एक तुकडी पूर्वेकडे युद्धसरावात व्यस्त होती. पश्चिम बंगालच्या सिलिगुडीत भारताच्या तिन्ही सैन्य दलानं हा संयुक्त युद्धाभ्यास केला. याचं नाव होतं 'ऑपरेशन तीस्ता प्रहार'. या धाडसी युद्धाभ्यासातून भारतानं चीनला कोणता संदेश दिलाय? काय होतं या युद्धाभ्यासामागचं नेमकं धोरण? या तीस्ता फायरिंग रेंजची नेमकी वैशिष्ट्य काय आहेत? पाहूयात या खास रिपोर्ट...
ज्या काळात भारत पाकिस्तान सीमेवर भारतीय सैन्यदल पाकिस्तानला चारी मुंड्या चीत करत होतं, दहशतवाद्यांचं कंबरडं मोडत होतं, त्यांचे एकेक तळ नष्ट करत होतं... त्याचवेळी भारताच्या पूर्वेकडे सुरु होता एक युद्धसराव. पण हा युद्धसराव हा पाकिस्तानला नव्हे तर चीनला धडा शिकवण्यासाठी होता. या युद्धसरावाचं नाव होतं 'तीस्ता प्रहार'
What is Teesta Prahar : 'तीस्ता फील्ड फायरिंग रेंज' नेमकी कशी आहे?
- पश्चिम बंगालच्या सिलीगुडीमध्ये भारतीय सैन्यदलाची तीस्ता फील्ड फायरिंग रेंज.
- बंगालमधील तीस्ता नदीच्या काठावर रेंजची उभारणी.
- 1960 पासून 'तीस्ता फील्ड फायरिंग रेंज' कार्यरत.
- उत्तर आणि ईशान्य भारतातील सर्वात मोठे गोळीबार क्षेत्र.
- भारतीय सैन्यदलाच्या वेगवेगळ्या युद्धसरावासाठी तीस्ता फायरिंग रेंजचा वापर.
याच ठिकाणी भारतानं गेल्या आठवड्यात युद्धाभ्यास करुन चीनला सूचक इशारा दिला.
Exercise #TeestaPrahar: Showcasing joint combat synergy & readiness in challenging riverine terrain. The Indian Army validated modern weapons, tactical drills, & swift operations, reflecting its commitment to excellence & modernization. #IndianArmy pic.twitter.com/o8JyhcgdV7
— PRO, Defence, Guwahati (@prodefgau) May 15, 2025
चीनच्या कुरापतींना उत्तर
गेली अनेक वर्ष भारताच्या ईशान्य आणि पूर्व सीमेवर चीनच्या कुरापती वाढत चालल्या आहेत. लडाख आणि अरुणाचल सीमाभागात चीनचा वारंवार होणारा हस्तक्षेप भारतासाठी डोकेदुखी ठरतोय. याच दरम्यान पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकिस्तानशी संघर्ष सुरु असताना चीनचा पाकिस्तानला उघड पाठिंबा होता. त्यामुळे पाकिस्तानशी लढताना दुसऱ्या बाजूनं चिनी ड्रॅगननं कुरापती केल्या तर भारतीय सैन्याची दुसरी फळीही सज्ज होती हे या युद्धाभ्यासावरुन समोर आलं आहे.
चीनच्या सीमेजवळ उघडपणे आणि इतका धाडसी युद्धाभ्यास... यातून चीनला हवा तो संदेश मिळाला असेल.
ही बातमी वाचा:























