नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रामाणिक करदात्यांसाठी नव्या विशेष प्लॅटफॉर्मची सुरुवात केली आहे. या प्लॅटफॉर्मचं नाव 'ट्रान्सपरंट टॅक्सेशन: ऑनरिंग द ऑनेस्ट' असं आहे. या निमित्ताने पंतप्रधान मोदींनी टॅक्सपेअर्स चार्टरसारख्या मोठ्या बदलाचा उल्लेख केला आहे. पण प्रश्न असा आहे की टॅक्सपेअर्स चार्टर काय आहे? हे जाणून घेऊया.


आजपासून प्रामाणिक करदात्यांसाठी 21व्या शतकातील टॅक्स सिस्टमची नवी व्यवस्था सुरु करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'ट्रान्सपरंट टॅक्सेशन: ऑनरिंग द ऑनेस्ट' (पारदर्शक कराधान मंच) नावाच्या एका मंचाचं लोकार्पण केलं. पंतप्रधान मोदी म्हणाले की, 'या प्लॅटफॉर्ममध्ये Faceless Assessment, Faceless Appeal आणि Taxpayers Charter यांसारखे मोठे रिफॉर्म्स आहेत. Faceless Assessment आणि Taxpayers Charter आजपासून लागू करण्यात आले आहेत. तर Faceless appeal ची सुविधा 25 सप्टेंबर म्हणजेच, दीन दयाळ उपाध्याय यांच्या जयंतीच्या दिवशी संपूर्ण देशभरात नागरिकांसाठी उपलब्ध करण्यात येईल.'





प्रामाणिक करदात्यांचं देशाच्या विकासात मोठं योगदान : पंतप्रधान मोदी

टॅक्सपेअर्स चार्टर म्हणजे काय?
सोप्या भाषेत सांगायचं झालं तर टॅक्सपेअर्स चार्टरच्या माध्यमातून करदाते आणि आयकर विभाग यांच्यामधील विश्वास वाढवण्याचा प्रयत्न केला जाईल. या चार्टरमध्ये करदात्याच्या अडचणी कमी करण्याच्या आणि आयकर विभागाच्या अधिकाऱ्याचं उत्तरदायित्व निश्चित करण्याची व्यवस्था असेल.


सध्याच्या घडीला जगभरात केवळ तीन देशांमध्ये टॅक्सपेअर्स चार्टर लागू आहे. हे देश म्हणजे अमेरिका, कॅनाडा आणि आस्ट्रेलिया. या देशांमध्ये लागू असलेल्या टॅक्सपेअर्स चार्टरच्या काही गोष्टी समान आहेत. उदाहरणार्थ करदात्याने करचोरी किंवा अफरातफर केल्याचं जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत तो प्रामाणिक करदाताच असेल. याचाच अर्थ विनाकारण नोटीस पाठवून दबाव टाकला जाणार नाही.


अशाचप्रकारे आयकर अधिकाऱ्यांवर करदात्यांच्या समस्यांचं, अडचणींचं लवकरात लवकर निराकरण करण्याची जबाबदारी असेल. म्हणजेच ते कोणत्याही प्रकारची टाळाटाळ किंवा टोलवाटोलवी चालणार नाही. तसंच जर करदात्यांविरोधात एखादा आदेश जारी झाला तर त्याच्या छाननीची संधी अधिकाऱ्यांना दिली जाते.


पंतप्रधान टॅक्सपेअर्स चार्टरवर काय म्हणाले?
टॅक्सपेअर्स चार्टर हे विकाराच्या दिशेने टाकलेलं मोठं पाऊल असल्याचं पंतप्रधान मोदींनी सांगितलं. ते म्हणाले की, "आता करदात्यांना योग्य, विनम्र आणि तर्कसंगत व्यवहाराची खात्री देण्यात आली आहे." म्हणजेच आयकर विभागाला आता करदात्यांच्या स्वाभिमानाची संवेदनशीलताही लक्षात ठेवावी लागणार आहे.


महत्त्वाच्या बातम्या : 


'मोदी है तो मुमकिन है';  घसरत्या GDP वरुन राहुल गांधी यांचा निशाणा


RBI | एप्रिलच्या तुलनेत अर्थव्यवस्था सुधारतेय, रेपो रेटमध्ये बदल नाही : शक्तिकांत दास


केंद्र सरकारची मोठी घोषणा, संरक्षण मंत्रालयाकडून 101 वस्तूंवर आयातबंदी, राजनाथ सिहांची माहिती