मुंबई : भारतात 4 जी सेवा आल्यानंतर गेल्या पाच वर्षात काम करण्याचे स्वरुप पूर्णपणे बदलले आहे. 4 जी नेटवर्कमुळे इंटरनेटचा स्पीड वाढला आणि त्यामुळे कामापासून ते अभ्यासपर्यंत सर्व गोष्टी सोप्या केल्या आहे. लॉकडाऊनमध्ये या काळात 4 जी नेटवर्कमुळे लोकांना घरबसल्या काम करणे सहज शक्य झाले. देशातल्या कानाकोपऱ्यात सध्या 4 जी नेटवर्क पोहचले आहे परंतु अंदमान निकोबारमध्ये अद्याप 4 जी नेटवर्कची सुविधा नव्हती. परंतु अंदमान निकोबारमध्ये आता 4 जी नेटवर्क सेवा आली आहे. कारण भारतातील सर्वात मोठी मोबाईल नेटवर्क कंपनी एअरटेलने बीएसएनलसोबत करार केला आहे.
एअरटेल कायमच आपल्या ग्राहकांना सर्वोत्कृष्ट सेवा देत आहे. अंदमानमध्ये 4 जी सेवा पुरविण्यासाठी एअरटेलला अनेक समस्यांचा सामना करावा लागला. एअरटेलने चेन्नईतील समुद्रात 2313 किमीची ऑप्टिकल फायबर टाकून अंदमान निकोबारमध्ये 4 जी सेवा सुरू केली आहे. समुद्राखाली जवळपास 2313 किलोमीटर केबल टाकताना खोल समुद्राचे सर्वेक्षण करणे , केबलची गुणवत्ता राखणे आणि खास जहाजातून केबल टाकणे या गोष्टी कराव्या लागतात आणि ही कामगिरी एअरटेलने उत्कृष्ट पद्धतीने केली. अंदमान निकोबारमध्ये 4 जी अल्ट्रा हाय स्पीड पुरवणारे एअरटेल भारतातील पहिलं मोबाईल नेटवर्क ठरलं आहे. एअरटेलचे चेअरमेन सुनील भारती मित्तल यांनी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. सुनील भारती मित्तल म्हणाले, फायबर लाईनमुळे भारताने डिजिटल ट्रान्समिशनमध्ये एक नवीन ओळख निर्माण केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार की, त्यांनी अंदमान आणि निकोबार बेटांना मुख्य भूमीशी जोडणाऱ्या सबमरीन ऑप्टिकल फायबर केबलच्या उद्घाटनासाठी आपला अमूल्य वेळ दिला.अंदमान-निकोबर बेटावर 4जी सेवा पुरवणारं एअरटेल पहिलं मोबाईल नेटवर्क
ABP Live Focus | 12 Aug 2020 09:24 PM (IST)