नवी दिल्ली : आजपासून प्रामाणिक करदात्यांसाठी 21व्या शतकातील टॅक्स सिस्टमची नवी व्यवस्था सुरु करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'ट्रान्सपरंट टॅक्सेशन - ऑनरिंग द ऑनेस्ट' (पारदर्शक कराधान मंच) नावाच्या एका मंचाचं लोकार्पण केलं. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, 'या प्लॅटफॉर्ममध्ये Faceless Assessment, Faceless Appeal आणि Taxpayers Charter यांसारखे मोठे रिफॉर्म्स आहेत. Faceless Assessment आणि Taxpayers Charter आजपासून लागू करण्यात आले आहेत. तर Faceless appeal ची सुविधा 25 सप्टेंबर म्हणजेच, दीन दयाळ उपाध्याय यांच्या जयंतीच्या दिवशी संपूर्ण देशभरात नागरिकांसाठी उपलब्ध करण्यात येईल.'


प्रामाणिक करदात्यांचा सन्मान


पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, 'देशभरातील प्रामाणित करदाते राष्ट्रनिर्माणात खूप मोठी भूमिका साकारत आहे. जेव्हा देशातील प्रामाणिक करदात्यांचं जीवन अत्यंत सुलभ होतं, ते पुढे जातात, तेव्हा देशाचाही विकास होतो, देशही पुढे जातो. आता देशात असं वातावरण तयार होत आहे की, कर्तव्याची जाणीव ठेवून सर्व कार्य करा.'


पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, 'एक वेळ होती, जेव्हा आमच्याकडे रिफॉर्म्सबाबत बोललं जात होतं. कधी काही निर्णय घ्यावे लागायचे, अनेकदा दबावात काही निर्णय घेतले जाऊ शकतात. तर त्याला रिफॉर्म्स म्हटलं जायचं. याच कारणामुळे पाहिजे तसा परिणाम होत नव्हा. आता याबाबत विचार आणि दृष्टीकोन दोन्ही बदलला आहे.'


टॅक्स सिस्टमसाठी नव्या व्यवस्थेची गरज का?


पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, 'भारताच्या टॅक्स सिस्टममध्ये मूलभूत आणि संरचनात्मक सुधारणेची गरज होती कारण आपली आताची सिस्टीम गुलामीच्या कालखंडात तयार करण्यात आली आहे. आणि त्यानंतर हळूहळू विकसित झाली आहे. स्वातंत्र्यानंतर यामध्ये परिवर्तन करण्यात आलं. परंतु, जास्तीत जास्त सिस्टीमचं स्वरुप तेच होतं.'


महत्त्वाच्या बातम्या : 


राहुल गांधी म्हणाले, 'मोदी है तो मुमकिन है'; GDP वरून मोदी सरकारवर निशाणा


RBI | एप्रिलच्या तुलनेत अर्थव्यवस्था सुधारतेय, रेपो रेटमध्ये बदल नाही : शक्तिकांत दास


केंद्र सरकारची मोठी घोषणा, संरक्षण मंत्रालयाकडून 101 वस्तूंवर आयातबंदी, राजनाथ सिहांची माहिती