नवी दिल्ली : बऱ्याच दिवसांपासून देशातील आर्थिक परिस्थितीबाबत मोदी सरकारवर राहुल गांधी सतत निशाणा साधत आहेत. अशातच पुन्हा एकदा राहुल गांधी यांनी भाजपचा 'मोदी है तो मुमकिन है' या नाऱ्यासोबत सरकारवर देशातील आर्थिक परिस्थितीवरुन टीकास्त्र लादलं आहे.


राहुल गांधी यांनी पहिल्यांदाच 'मोदी है तो मुमकिन है' या भाजपच्याच घोषणेचा वापर करत सरकारवर हल्लाबोल केला आहे. याआधी ते 'सूट-बूट की सरकार' यांसारख्या घोषणा देत सरकारवर निशाणा साधत होते. राहुल गांधी यांनी आपल्या ट्वीटसोबत एक बातमीही शेअर केली आहे. यामध्ये इन्फोसिसचे संस्थापक एनआर नारायण मूर्ति यांचा हवाला देत दावा केला आहे की, जीडीपी ग्रोथ 1947 मधील जीडीपीपेक्षाही खाली जाऊ शकते.



राहुल गांधी यांनी ट्वीटमध्ये जी बातमी शेअर केली त्यात काय आहे?


इन्फोसिसचे संस्थापक एन. आर. नारायणमूर्ती यांनी मंगळवारी एक शंका उपस्थित केली आहे. ते म्हणाले की, 'स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच कोरोना व्हायरसमुळे या आर्थिक वर्षात देशाची आर्थिक गती सर्वात खराब स्थितीत असणार आहे. त्यांनी सांगितलं की, अर्थव्यवस्थेला लवकरात लवकर गती देणं गरजेचं आहे.'


नारायणमूर्ती यांनी शंका उपस्थित केली आहे की, यावेळी जीडीपीमध्ये स्वातंत्र्यानंतरची सर्वात मोठी घसरण दिसू शकते. नारायणमूर्ती यांनी एक नवी प्रणाली विकसिक करण्यावरही जोर दिला आहे, ज्यामध्ये देशाच्या अर्थव्यवस्थेतील प्रत्येक क्षेत्रात, प्रत्येक व्यावसायिकाला पूर्ण क्षणतेने काम करण्याची अनुमती असवी.'


सॉफ्टवेअर क्षेत्रातील मोठं नाव असणारे नारायणमूर्ती यांनी भारताच्या डिजिटल क्रांतीच्या नेतृत्वावर आधारित एका चर्चेत भाग घेतला होता. व्हिडीओ कॉन्फरन्सिंमार्फत झालेली ही चर्चा इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अॅन्ड टेक्नॉलॉजीच्या 16व्या इंडिया डिजिटल कन्वर्सेशनच्या निमित्ताने आयोजित करण्यात आली होती.


नारायणमूर्ती यांनी सांगितलं आहे की, 'जगाचाही जीडीपी देखील खाली आला आहे. जगभरातील अनेक व्यावसाय, व्यापार बुडत आहेत. अशातच जगभरातील जीडीपीमध्ये 10 टक्क्यांची घट होण्याची शक्यता आहे.'


महत्त्वाच्या बातम्या :