एक्स्प्लोर

करुणानिधींच्या अंत्यसंस्काराचा वाद हायकोर्टात, मरिना बीचचं महत्त्व काय?

द्रविड मुनेत्र कडगम (डीएमके) पक्षाचे सर्वेसर्वा एम. करुणानिधी यांचं मंगळवार 7 ऑगस्ट रोजी वयाच्या 94 व्या वर्षी निधन झालं. आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

चेन्नई : तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि द्रविड मुनेत्र कडगम (डीएमके) पक्षाचे सर्वेसर्वा एम. करुणानिधी यांचं मंगळवार 7 ऑगस्ट रोजी वयाच्या 94 व्या वर्षी निधन झालं. आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. मात्र मरीना बीचच्या जागेवरुन तामिळनाडू सरकार आणि द्रमुक समर्थकांमध्ये वाद सुरु असून, तो कोर्टात पोहोचला आहे. करुणानिधी यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी चेन्नईतील राजाजी हॉलमध्ये ठेवण्यात आलं आहे. अंत्यसंस्कारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींसह देशभरातील दिग्गज नेते चेन्नईत पोहोचत आहेत. अंत्यसंस्काराचा वाद हायकोर्टात कशामुळे? दिग्गज नेते एम करुणानिधी, ज्यांनी दक्षिणेचं महत्त्व जगाला पटवून दिलं, त्यांच्या मृत्यूनंतरही कोर्टाच्या दारात जावं लागलं. समाधीसाठी समर्थकांना हवी असलेली जागा न मिळणं यामागचं कारण आहे. चेन्नईतील मरिना बीचवर जागा देण्यास राज्य सरकारने मनाई केली आहे. त्यामुळे डीएमकेने मद्रास हायकोर्टात धाव घेतली. करुणानिधींच्या समाधीसाठी तामिळनाडू सरकारने दुसरी जागा सुचवली आहे. पण डीएमके मरिना बीचवर ठाम आहे. सी. राजगोपालचारी आणि के कामराज यांची समाधी असलेली जागा राज्य सरकारने सुचवली आहे. मात्र ही जागा करुणानिधींच्या समर्थकांना मान्य नाही. दक्षिणेत मरिना बीचचं महत्त्व काय? चेन्नईतील मरिना बीच हा एक समुद्र किनारा नसून या जागेचं दक्षिणेच्या राजकारणात खास महत्त्व आहे. ही जागा दिग्गज द्रविड राजकारण्यांच्या समाधीसाठी ओळखली जाते. मरिना बीच अशी जागा आहे, जी द्रविडी राजकारणाचा इतिहास सांगते. इथे तीन दिग्गज नेत्यांची समाधी आहे. द्रविड मुन्नेत्र कडगम (डीएमके) चे संस्थापक सीएम अन्नादुरै यांची समाधी मरिना बीचवर आहे. अन्नादुरै यांच्यानंतर दक्षिणेतील दिग्गज नेते एमजीआर यांनाही मरिना बीचवरच जागा देण्यात आली, तर काही महिन्यांपूर्वीच निधन झालेल्या तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांचीही समाधी मरिना बीचवर आहे. त्यामुळे देशाच्या राजकारणाला 61 वर्ष देणाऱ्या करुणानिधींच्या समाधीसाठीही मरिना बीचवरच जागा द्यावी, अशी मागणी आहे. दरम्यान, विशेष म्हणजे द्रविड आंदोलनाचे जनक पेरियार यांची समाधी मरिना बीचवर नाही. पेरियार यांची समाधी चेन्नईतील दुसऱ्या ठिकाणी आहे, ज्याला पेरियार थिडाल म्हणून ओळखलं जातं.

महत्त्वाच्या बातम्या

बाहेर पाऊस पडत होता, ऐकमेकांना ढकलाढकली सुरु होती, कोलकातामध्ये चेंगराचेंगरीचा घटना नेमकी कशी घडली?  
बाहेर पाऊस पडत होता, ऐकमेकांना ढकलाढकली सुरु होती, कोलकातामध्ये चेंगराचेंगरीचा घटना नेमकी कशी घडली?  
कोलकातामध्ये मोठी दुर्घटना, गर्दीमुळं दुर्गा पूजा मंडपात चेंगराचेंगरी, तब्बल 18 जणांचा मृत्यू, तर अनेकजण जखमी
कोलकातामध्ये मोठी दुर्घटना, गर्दीमुळं दुर्गा पूजा मंडपात चेंगराचेंगरी, तब्बल 18 जणांचा मृत्यू, तर अनेकजण जखमी
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
Student Protest: आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश

व्हिडीओ

Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha
SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolkata Stampede Marathi News: कुठे पर्स, कुठे विखुरलेल्या चप्पल; दुर्गापूजा मंडपात चेंगराचेंगरी, 19 जणांचा मृत्यू, कोलकातामधील थरकाप उडवणारे 8 फोटो
कुठे पर्स, कुठे विखुरलेल्या चप्पल; दुर्गापूजा मंडपात चेंगराचेंगरी, 19 जणांचा मृत्यू, कोलकातामधील थरकाप उडवणारे 8 फोटो
दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला संपवलं; घराकडे जात असताना प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर पसार
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला संपवलं; घराकडे जात असताना प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर पसार
शिवसेना नेत्या शायना एनसींच्या मुलीचा साखरपुडा; राज ठाकरेंसह बॉलिवूडचा भाईजान उपस्थित, नव दाम्पत्यास शुभेच्छा
शिवसेना नेत्या शायना एनसींच्या मुलीचा साखरपुडा; राज ठाकरेंसह बॉलिवूडचा भाईजान उपस्थित, नव दाम्पत्यास शुभेच्छा
Uddhav Thackeray: मग दिल्लीत हजारो पोलिस दांडिया खेळायला आणलेत का? अशी राजवट गाडलीच पाहिजे आणि ती गाडण्यासाठीच आम्ही सगळे उभे आहोत; उद्धव ठाकरेंचं राजनाथ सिंहांना प्रत्युत्तर
मग दिल्लीत हजारो पोलिस दांडिया खेळायला आणलेत का? अशी राजवट गाडलीच पाहिजे आणि ती गाडण्यासाठीच आम्ही सगळे उभे आहोत; उद्धव ठाकरेंचं राजनाथ सिंहांना प्रत्युत्तर
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन कोणी कारवाया केल्यास निलंबन; FDA च्या अधिकाऱ्यांना मंत्री नरहरी झिरवाळांची वॉर्निंग

Embed widget