एक्स्प्लोर

Cell Broadcast Alert System: मोबाईलवर 'इमर्जन्सी अलर्ट'चा सायरन वाजला? घाबरू नका! जाणून घ्या काय आहे सेल ब्रॉडकास्ट अलर्ट सिस्टम?

Cell Broadcast Alert System: शनिवारी अचानक अनेकांच्या मोबाईलवर एक आपत्कालीन संदेश आला आणि सायरनसारखा एक आवाज ऐकू आला. यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते.

Cell Broadcast Alert System: देशभरातील लाखो अँड्रॉइड आणि आयओएस स्मार्टफोनधारकांना शनिवारी एक वेगळाच अनुभव आला. अचानक अनेकांच्या मोबाईलवर एक आपत्कालीन संदेश (Emergency Alert) आला आणि सायरनसारखा मोठा आवाज ऐकू आला. सार्वजनिक ठिकाणी एकाच वेळी अनेकांचे फोन वाजू लागल्याने सुरुवातीला नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण होते, मात्र काही वेळातच ही सरकारकडून केलेली एक 'चाचणी' असल्याचे स्पष्ट झाले. भारत सरकारने स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट सिस्टम'ची (Cell Broadcast Alert System) चाचणी सुरू केली आहे. ही यंत्रणा भविष्यात नैसर्गिक आपत्ती किंवा धोक्याच्या वेळी नागरिकांना सतर्क करण्यासाठी वापरली जाणार आहे.

Cell Broadcast Alert System: सेल ब्रॉडकास्ट अलर्ट सिस्टम म्हणजे काय?

ही एक हायटेक आपत्कालीन सावधानतेचा इशारा देणारी प्रणाली आहे. याच्या माध्यमातून सरकार कोणत्याही आपत्ती किंवा धोक्याच्या परिस्थितीत थेट मोबाईल फोनवर अलर्ट पाठवू शकते. याचा वापर भूकंप, सुनामी, वीज कोसळणे, पूर, गॅस लीक, रासायनिक धोके तसेच इतर मानवनिर्मित आपत्कालीन परिस्थितींमध्ये केला जाऊ शकतो.

Cell Broadcast Alert System हे सिस्टम कसे काम करते?

ज्या वापरकर्त्यांच्या फोनवर हा मेसेज येईल, त्यांच्या मोबाईलवर जोरात सायरनसारखा आवाज येईल आणि स्क्रीनवर फ्लॅश मेसेज दिसेल. वापरकर्त्यांना तत्काळ आपत्कालीन इशारा मिळेल. ही प्रणाली विशेषतः प्रभावित भागातील लोकांपर्यंत तात्काळ माहिती पोहोचवण्यासाठी तयार करण्यात आली आहे.

Cell Broadcast Alert System: ‘SACHET’ सिस्टमद्वारे अलर्ट पाठवले जातील

सरकारच्या माहितीनुसार हे अलर्ट स्वदेशी Integrated Alert System ‘SACHET’ च्या माध्यमातून पाठवले जातील. हे सिस्टम C-DOT (Centre for Development of Telematics) ने विकसित केले आहे. हे कॉमन अलर्टिंग प्रोटोकॉल (CAP) वर आधारित असून, याची शिफारस इंटरनॅशनल टेलीकम्युनिकेशन युनियन (ITU) ने केली आहे.

Cell Broadcast Alert System: टेस्ट अलर्ट का पाठवले जात आहेत?

सरकार देशभरातील मोबाईल नेटवर्क आणि अलर्ट सिस्टमची विश्वसनीयता तपासू इच्छित आहे. जेणेकरून प्रत्यक्ष आपत्तीच्या वेळी अलर्ट वेगाने आणि अचूकपणे लोकांपर्यंत पोहोचू शकतील. NDMA ने स्पष्ट केले आहे की हे संदेश केवळ चाचणीचा भाग आहेत आणि नागरिकांनी कोणतीही कारवाई करण्याची गरज नाही.

Cell Broadcast Alert System: इमर्जन्सी अलर्ट ऑन किंवा ऑफ कसे करावे?

जर तुम्ही अँड्रॉइड वापरकर्ते असाल, तर पुढील स्टेप्स फॉलो करा.

- सर्वप्रथम सेटिंग्समध्ये जा.

- त्यानंतर ‘Safety & Emergency’ मध्ये जा.

- ‘Wireless Emergency Alerts’ मध्ये जाऊन ‘Test Alerts’ ऑन किंवा ऑफ करा.

मात्र, सरकारने स्पष्ट केले आहे की, भविष्यात प्रत्यक्ष आपत्तीच्या वेळी सर्व मोबाईल फोनवर विविध भारतीय भाषांमध्ये अलर्ट पाठवले जातील.

Cell Broadcast Alert System: फक्त SMS नाही, डिजिटल सुरक्षेकडे मोठे पाऊल

सरकारचा हा उपक्रम केवळ मेसेज पाठवण्यापुरता मर्यादित नसून, भारताच्या डिजिटल आपत्ती व्यवस्थापन नेटवर्कला अधिक मजबूत करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

आणखी वाचा 

Emergency Alert on phone: अचानक सर्व मोबाईल फोनवर एकाचवेळी धडाधड इमर्जन्सी मेसेज, नेमकं कारण काय?

महत्त्वाच्या बातम्या

Pralhad Joshi NTA : एनटीएची सर्वात मोठी कारवाई, पेपर तयार करणाऱ्या 600 तज्ज्ञांची उचलबांगडी
एनटीएची सर्वात मोठी कारवाई, पेपर तयार करणाऱ्या 600 तज्ज्ञांची उचलबांगडी
महिलांसाठी गुड न्यूज! आता तिसऱ्या अपत्याच्या जन्मासाठीही मिळणार 365 दिवसांची रजा, 'या' सरकारनं घेतला मोठा निर्णय 
महिलांसाठी गुड न्यूज! आता तिसऱ्या अपत्याच्या जन्मासाठीही मिळणार 365 दिवसांची रजा, 'या' सरकारनं घेतला मोठा निर्णय 
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Bangladesh : भारतावर जळणारा बांगलादेश अंधारात, मदतीसाठी भारताकडे याचना; परराष्ट्र मंत्रालय म्हणाले, आमच्या गरजा लक्षात घेऊन...
भारतावर जळणारा बांगलादेश अंधारात, मदतीसाठी भारताकडे याचना; परराष्ट्र मंत्रालय म्हणाले, आमच्या गरजा लक्षात घेऊन...

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Wardha Crime News: प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर
प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर
Dombivli Crime news: डोंबिवलीत फेरीवाल्यांची दादागिरी, थेट पोलिसांना नडले, बायका अंगावर धावून गेल्या अन्...
डोंबिवलीत फेरीवाल्यांची दादागिरी, थेट पोलिसांना नडले, बायका अंगावर धावून गेल्या अन्...
Marathwada Rain Update: मराठवाड्यात शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी अपडेट, फक्त आज-उद्या पाऊस पडणार नंतर गायब होणार, हवामान खात्याकडून बळीराजाला महत्त्वाचा सल्ला
मराठवाड्यात शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी अपडेट, फक्त आज-उद्या पाऊस पडणार नंतर गायब होणार, हवामान खात्याकडून बळीराजाला महत्त्वाचा सल्ला
Nagpur Crime: नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
BMC Ritu Tawde : मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
Thane News: 'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Maharashtra Live blog updates: आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी मातंग समाज आक्रमक; धाराशिवमध्ये 20 ऑगस्ट रोजी निघणार महामोर्चा 
Maharashtra Live blog updates: आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी मातंग समाज आक्रमक; धाराशिवमध्ये 20 ऑगस्ट रोजी निघणार महामोर्चा 
Embed widget