Ayodhya Ram Mandir : रामभक्तांसाठी महत्त्वाची बातमी! 1 नोव्हेंबरपासून अयोध्येतील राम मंदिर दर्शनाच्या वेळेत मोठा बदल; जाणून घ्या नवीन वेळापत्रक
Ram Mandir Timings Changed : हवामानातील बदलांमुळे अयोध्येतील भव्य राम मंदिरात 1 नोव्हेंबरपासून पूजा, आरती आणि दर्शनाच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. आता मंदिराचे दरवाजे सकाळी 4 वाजता उघडतील.

मुंबई : अयोध्येतील भव्य श्रीराम जन्मभूमी मंदिरात रामलल्लाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या लाखो भाविकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. हिवाळा आणि ऋतू बदलाचा विचार करता श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टकडून दैनंदिन पूजा, आरती, भोग, विश्राम आणि दर्शनाच्या वेळात मोठा बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही नवीन वेळ रविवारी, 1 नोव्हेंबर पासून लागू होणार आहे.
सध्या राम मंदिराचे दरवाजे सकाळी 03:45 वाजता उघडतात आणि रात्री 10:30 वाजता बंद होतात. मात्र, नवीन नियमानुसार आता मंदिराचे दरवाजे सकाळी 04:00 वाजता उघडतील आणि रात्री 10:00 वाजता बंद होतील.
Ram Mandir New Schedule : पहाटेची आरती अन् दर्शनाची वेळ
मंदिर न्यासाचे मुख्य अर्चक आचार्य केशव यांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 नोव्हेंबरपासून सकाळी 04:30 ते 04:40 या वेळेत मंगला आरती होईल. त्यानंतर 04:40 ते 06:30 या वेळेत रामलल्लाचा अभिषेक, श्रृंगार, धूप-दीप आणि नैवेद्यासाठी मंदिराचे दरवाजे बंद राहतील. सकाळी 06:30 वाजता श्रृंगार आरती पार पडल्यानंतर सकाळी 07:00 वाजेपासून भाविकांना दर्शनासाठी प्रवेश दिला जाईल.
सकाळी 08:00 ते 08:10 या वेळेत बालभोगासाठी थोडा वेळ दर्शन थांबवले जाईल, त्यानंतर सकाळी 11:30 वाजेपर्यंत भाविकांना दर्शन घेता येईल.
Bhagwan Ram Lalla Bhog Rest : दुपारी विश्राम अन् संध्याकाळची आरती
सकाळी 11:30 ते दुपारी 12:00 या वेळेत राजभोगासाठी दरवाजे बंद राहतील आणि दुपारी 12:00 वाजता राजभोग आरती पार पडेल. दुपारी 12:30 ते 01:30 या वेळेत रामलल्लाचा विश्राम काळ असेल. त्यानंतर दुपारी 01:35 वाजता पुन्हा दर्शन सुरू होऊन ते संध्याकाळी 04:00 वाजेपर्यंत चालणार आहे.
संध्याकाळी 04:00 ते 04:10 बालभोगानंतर 06:45 पर्यंत दर्शन सुरू राहील. 06:45 ते 07:00 या वेळेत दरवाजे बंद राहून 07:00 वाजता संध्या आरती होईल. रात्री 08:00 ते 08:30 आणि 09:15 ते 09:30 या वेळेत नैवेद्यासाठी दरवाजे बंद राहतील. अखेर रात्री 09:30 वाजता शयन आरती झाल्यानंतर रात्री 10:00 वाजता मंदिराचे दरवाजे पूर्णपणे बंद केले जातील.
Ayodhya Ram Mandir Old vs New Timings : असा आहे जुन्या अन् नवीन वेळेतील बदल
| धार्मिक विधी / उपक्रम | सध्याची वेळ | 1 नोव्हेंबरपासून नवीन वेळ |
| दरवाजा उघडणे | सकाळी 03:45 | सकाळी 04:00 |
| मंगला आरती | सकाळी 04:00 | सकाळी 04:30 |
| श्रृंगार आरती | सकाळी 06:00 | सकाळी 06:30 |
| सकाळचा बालभोग | सकाळी 09:00 - 09:05 | सकाळी 08:00 - 08:10 |
| दुपारचा विश्राम | दुपारी 12:30 - 12:55 | दुपारी 12:30 - 01:30 |
| शयन आरती | रात्री 10:00 | रात्री 09:30 |
| दरवाजा बंद होणे | रात्री 10:30 | रात्री 10:00 |
ही बातमी वाचा :
Before You Go
Shiv Sena PC : सोनिया गांधींच्या पुस्तकाचा निषेध,शिवसेनेने पुस्तकाचा 'तो' मजकूर फाडला





















