Blue Aadhaar : ब्लू आधार कार्ड म्हणजे नेमकं काय? किती वर्षाच्या मुलांसाठी ती सोय आहे? असा करा अर्ज
What is Blue Aadhaar : घरी बसूनही तुम्ही ब्लू आधार कार्डसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. व्हेरीफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला कार्ड मिळू शकेल.
मुंबई: सध्याच्या काळात आधार कार्ड (Aadhaar Card) हे केवळ एका सरकारी डॉक्युमेंट्सपेक्षा जास्त महत्त्वाची भूमिका बजावते. यूआयडीएआयकडून जारी करण्यात येणाऱ्या या कार्डवर नाव, पत्ता, जन्मदिन या सारखी महत्त्वाची बातमी असते. त्यामुळे ते देशातील नागरिकाला एक ओळख मिळवून देते. कोणत्याही सरकारी योजनेसाठी (Government Scheme) आधार कार्ड महत्त्वाचं आहे. आधारकार्डसाठी किमान वय पाच वर्षे नमूद करण्यात आलं आहे. मग त्यापेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी काय असा प्रश्न अनेकांना पडतो. तर शून्य ते पाच वर्षापर्यंतच्या मुलांसाठी ब्लू आधार कार्ड (Blue Aadhaar Card) किंवा बाल आधार कार्डची (Baal Aadhaar) तरतूद करण्यात आली आहे.
निळे आधार कार्ड काय आहे? (What is Blue Aadhaar)
देशातील शून्य ते पाच वर्षांखालील मुलांसाठी ब्लू आधार कार्ड बनवले जाते. त्याला बाल आधार कार्ड (Baal Aadhaar) असेही म्हणतात. वास्तविक या आधार कार्डमध्ये बायोमेट्रिक्स आवश्यक नाहीत. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने या आधार कार्डची अर्ज प्रक्रिया अगदी सोपी केली आहे.
निळे आधार बनवण्यासाठी अत्यावश्यक डॉक्युमेंट्स
- मुलाचे जन्म प्रमाणपत्र
- पालकांचा आधार क्रमांक (पत्ता आणि इतर माहितीसाठी)
मुलाचे जन्म प्रमाणपत्र नसतानाही ब्लू आधार कार्ड काढता येणार
काही वर्षांपूर्वी हे आधार कार्ड बनवण्यासाठी जन्माचा दाखला आवश्यक होता, मात्र आता जन्म प्रमाणपत्र नसतानाही ब्लू आधार कार्ड बनवता येणार आहे. तुम्ही घरी बसूनही या आधार कार्डसाठी अर्ज करू शकता. अनेक ठिकाणी मुख्यतः शहरांतील शाळांमध्ये मुलांच्या प्रवेशासाठी ब्लू आधार कार्ड बंधनकारक करण्यात आलं आहे. त्यामुळे अनेकदा त्याची गरज भासते.
अर्ज कसा करायचा (How To Apply)
- तुम्ही UIDAI च्या अधिकृत पोर्टलवर (www.UIDAI.gov.in) जा.
- आता तुम्हाला आधार कार्डच्या लिंकवर क्लिक करावे लागेल.
- यानंतर एक नवीन विंडो उघडेल.
- आता इतर सर्व माहिती जसे की मुलाचे नाव, मोबाईल नंबर, ईमेल आयडी भरा.
- भरलेली माहिती एकदा तपासून फॉर्म सबमिट करा.
- यानंतर तुम्हाला UIDAI केंद्रात जावे लागेल.
- व्हेरीफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला ब्लू आधार कार्ड दिले जाईल.
- अर्ज केल्यापासून 60 दिवसांच्या आत तुम्हाला ब्लू आधार कार्ड हे घरपोच मिळेल.
ही बातमी वाचा: