एक्स्प्लोर

Weather Update Today : थंडीची प्रतीक्षा कायम! पुढील चार ते पाच दिवस पावसाचा अंदाज

IMD Weather Forecast : देशातील काही भागात पुढील चार ते पाच दिवसांत हलका ते मध्यम पाऊस स्वरुपाचा पडेल. पर्वतीय भागांत बर्फवृष्टी झाल्यामुळे उत्तर भारतात थंडी वाढू लागली आहे.

Weather Update Today : देशात थंडीची (Cold Weather) प्रतीक्षा अद्याप कायम आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, देशातील काही भागात पुढील चार ते पाच दिवसांत हलका ते मध्यम पाऊस स्वरुपाचा पडेल. केरळ, माहे, तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल आणि लक्षद्वीपमध्ये विजांचा कडकडाट आणि गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. आज केरळ, तामिळनाडू आणि आज लक्षद्वीपमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. 12 डिसेंबरपर्यंत सिक्कीम, बंगालमध्ये भागात गारपीट होण्याची शक्यता आहे.

पुढील 24 तासांत पावसाची शक्यता

पुढील 24 तासांत नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, मेघालय आणि आसाम तसेच झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये पावसाची शक्यता आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला मिचॉन्ग चक्रीवादळामुळे (Cyclone Michaung) चेन्नईमध्ये जनजीवन अद्याप विस्कळीत आहे. 4 आणि 5 डिसेंबर रोजी चक्रीवादळामुळे मुसळधार पाऊस पडला, यामुळे शहरात पूर आला आणि मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

उत्तर भारतात गारठा वाढला

पर्वतीय भागांत बर्फवृष्टी झाल्यामुळे उत्तर भारतात थंडी वाढू लागली आहे. लोक उबदार कपडे घालूनच घराबाहेर पडत आहेत. राजधानी दिल्लीत तापमानात सातत्याने घट होत आहे. उत्तर प्रदेश, पंजाब आणि हरियाणामध्ये जोरदार वारे वाहत असल्याने हवेत गारठा जाणवू लागला आहे. हवामान खात्याने उत्तर प्रदेश, बिहार, झारखंडमध्ये हलक्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

उत्तर भारतात कडाक्याची थंडी

दिल्लीसह उत्तर भारतात आता तापमानात घट दिसून येत आहे. अनेक राज्यांमध्ये सकाळपासून दाट धुक्याची चादर पाहायला मिळत आहे आहे. दरम्यान, येत्या काही दिवसांत उत्तर भारतासह देशात कडाक्याची थंडी पडणार असल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज म्हणजेच 9 डिसेंबरला बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश, तामिळनाडू, केरळ, झारखंड, तेलंगणामध्ये हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

दक्षिण भारतात मुसळधार पावसाची शक्यता

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात पुढील 24 तास पावसाची शक्यता असून अनेक भागात तापमानात घट झाल्याचं पाहायला मिळणार आहे. आज पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशात दाट धुके दिसून येईल. याशिवाय पुढील तीन दिवस दक्षिण भारतात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. याशिवाय बिहारमध्ये 10 डिसेंबरपर्यंत आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये 9 ते 11 डिसेंबरपर्यंत दाट धुके कायम राहू शकते.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Maharashtra Weather : राज्यात गारठा वाढणार! पुढील 24 पावसाची शक्यता, हवामान कसं असेल? जाणून घ्या

महत्त्वाच्या बातम्या

काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला

Embed widget