एक्स्प्लोर
सत्ता मिळाल्यास तिहेरी तलाक कायदा रद्द करणार : काँग्रेस
अल्पसंख्याकांमध्ये पक्षाला अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने आज (7 फेब्रुवारी) राष्ट्रीय अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलं होतं.
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेसने मोठी घोषणा केली आहे. सत्तेत आल्यावर तिहेरी तलाक कायदा रद्द करणार असल्याचं महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सुष्मिता देव यांनी म्हटलं आहे. दिल्लीत आयोजित काँग्रेसच्या अल्पसंख्याक अधिवेशनात त्या बोलत होत्या. सुष्मिता देव या सिलचरच्या खासदार आहेत.
तिहेरी तलाक कायदा करण्यामागे मुस्लीम पुरुषांना जेलमध्ये पाठवण्याचं षडयंत्र असल्याचा आरोपही देव यांनी केला आहे. "आपण मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाच्या महिला शाखेला भेटून तिहेरी तलाक कायद्याला विरोध केल्याप्रकरणी त्यांचे मानले," असं सुष्मिता देव यांनी सांगितलं.
अल्पसंख्याकांमध्ये पक्षाला अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने आज (7 फेब्रुवारी) राष्ट्रीय अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलं होतं. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी या अधिवेशनाचे प्रमुख पाहुणे होते. यावेळी राहुल गांधींनी मोदी सरकावर जोरदार टीका केली. "पंतप्रधान मोदींचा चेहरा नीट पाहिला तर तुम्हाला भीती दिसेल," असं राहुल गांधी म्हणाले.
हा देश किती एका धर्माचा नाही. हा देश भारतातील प्रत्येक व्यक्तीचा आहे. लढाई दोन विचारधारांमधील आहे. अल्पसंख्यांकांनीही या देशासाठी काम केलं आहे. एक विचारधारा म्हणते देश सोन्याची चिमणी आहे, याचा अर्थ असा की, देश एक उत्पादन आहे. आमच्या विचारधारेनुसार, देश एक नदी आहे, ज्यात सगळ्यांना जागा मिळायला हवी.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement