एक्स्प्लोर

PM Modi: फक्त गन नव्हे तर पेन घेतलेल्या नक्षलवादाचाही बिमोड करा; PM मोदी यांचे आवाहन

PM Modi On Naxalism: देशात पेन घेतलेल्या नक्षलवाद्यांचे आव्हान असून त्यांच्याकडून तरुणांची दिशाभूल करण्यात येत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले.

PM Modi On Naxalism: देशात फक्त बंदूक हाती घेतलेले नक्षलवादी नसून लेखणीच्या माध्यमातून युवकांची दिशाभूल करण्याचे काम सुरू आहे. या दोन्ही प्रकारच्या नक्षलवादाचा बिमोड करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. फरिदाबाद येथे सुरू असलेल्या राज्याचे गृहमंत्री आणि पोलीस महासंचालकांच्या चिंतन शिबिराला पंतप्रधान मोदी यांनी संबोधित केले. त्यावेळी ते बोलत होते.  पंतप्रधान मोदी यांच्या वक्तव्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे संबोधित करताना म्हटले की, तरुणांचाा भावनांचा गैरफायदा घेतला जात आहे. देशाची राष्ट्रीय एकात्मता बिघडवणाऱ्या शक्तींना पराभूत करण्यासाठी बौद्धिक क्षमताही वाढवणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले. भारतीय संविधान, कायदा, व्यक्ती स्वातंत्र्याची भाषा या विघातक शक्तींकडून वापरली जाते. साध्या भोळ्या चेहऱ्या मागील देशविघातक शक्ती ओळखणे गरजेचे असून त्यासाठी पोलिसांनी अधिक सक्षम राहावे असे आवाहनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. 

केंद्रीय तपास यंत्रणांना सहकार्य करा

केंद्रीय तपास संस्थांना विविध राज्यांमध्ये तपास करावा लागतो. राज्यांनीदेखील तपास यंत्रणांना सहकार्य केले पाहिजे, ही त्यांची जबाबदारी असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. कोणतीही तपास यंत्रणा असो, राज्यांचे पोलीस असो, प्रत्येकांने एकमेकांना सहकार्य केले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बहुमजली पोलीस ठाणे उभारण्याची आवश्यकता अधोरेखित केली. तळ मजल्यावर पोलीस ठाणे असेल आणि इमारतीच्या इतर मजल्यावर पोलिसांसाठी घरे असतील. त्यामुळे शहरापासून दूर राहणाऱ्या पोलिसांची मोठी समस्या सुटेल असे त्यांनी म्हटले. पोलिसांनी सरकारच्या धोरणांनुसार जुन्या वाहनांचा वापर करण्याचे टाळले पाहिजे असेही त्यांनी म्हटले. 

अफवांपासून सावध राहा

सोशल मीडियाला कमी लेखू नये असेही पंतप्रधानांनी म्हटले. सोशल मीडियावरून खोट्या बातम्या, अफवा वेगाने पसरतात. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. कोणतीही बातमी फॉरवर्ड करण्याआधी 10 वेळा विविध वृत्तसंस्थांकडून पडताळणी करून घ्या, असेही पंतप्रधान मोदींनी म्हटले.

'एक देश एक पोलीस गणवेश'

'एक देश, एक पोलीस गणवेश' याबाबतही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आग्रह धरला. माझे मत मी थोपवू इच्छित नाही. पण, देशातील पोस्ट खात्याच्या धर्तीवर देशभरातील पोलिसांसाठी एकच गणवेश असावा अशी सूचनाही  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. 

महत्त्वाच्या बातम्या

काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला

Embed widget