आंदोलनामुळेच सर्व राजकीय पक्ष शेतकऱ्यांचे नाव घेतायेत, मात्र आमचा कोणत्याही पक्षाला पाठिंबा नाही : राकेश टिकैत
पाच राज्यांच्या निवडणुकींच्या रणधुमाळीला सुरूवात झाली आहे. या निवडणुकांमध्ये आम्ही कोणत्याही पक्षाला पाठिंबा देणार नसल्याची भूमिका भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी मांडली आहे.
![आंदोलनामुळेच सर्व राजकीय पक्ष शेतकऱ्यांचे नाव घेतायेत, मात्र आमचा कोणत्याही पक्षाला पाठिंबा नाही : राकेश टिकैत We do not support any party in the Assembly elections says BKU leader Rakesh Tikait आंदोलनामुळेच सर्व राजकीय पक्ष शेतकऱ्यांचे नाव घेतायेत, मात्र आमचा कोणत्याही पक्षाला पाठिंबा नाही : राकेश टिकैत](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/22/6f94fa49d557b3cf29281929a21f107b_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Rakesh Tikait : आंदोलनामुळेच आज सर्वच राजकीय पक्ष शेतकऱ्यांचे नाव घेऊ लागले आहेत, हा आंदोलनाचा मोठा विजय असल्याचे वक्तव्य भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी केले. शेतकऱ्यांना आता स्वत: चा नफा तोटा पाहावा लागेल. त्यामुळे पाच राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आम्ही कोणत्याही पक्षाला पाठिंबा देणार नसल्याची भूमिका राकेश टिकैत यांनी मांडली आहे. प्रयागराजमध्ये टिकैत यांनी भूमिका जाहीर केली.
पाच राज्यांच्या निवडणुकींच्या रणधुमाळीला सुरूवात झाली आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या राज्यात विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकांमध्ये भारतीय किसान युनिय कोणाला पाठिंबा देणार याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू होती. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत भारतीय किसान युनियन समाजवादी पार्टी आणि राष्ट्रीय लोक दल यांच्या युतीला समर्थन देणार असल्याचे बोलले जात होते. याच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय किसान संघटनेचे (BKU) प्रमुख नरेश टिकैत यांनी समाजवादी पार्टी आणि राष्ट्रीय लोक दल यांच्या युतीला समर्थन देण्याचा निर्णयही देखील घेतला होता. मात्र, त्यांच्या या निर्णयाचा त्यांचे बंधू राकेश टिकैत यांनी इन्कार करत विधानसभा निवडणुकीत आम्ही कोणत्याही पक्षाला पाठिंबा देणार नसल्याची भूमिका टिकैत यांनी मांडली आहे.
आम्ही कोणत्याही पक्षाला पाठिंबा दिलेला नाही, लोकांचा चुकीचा गैरसमज झाला असल्याचे राकेश टिकैत यांनी म्हटले आहे. मुझफ्फरनगर जिल्ह्यातील बुढाणा विधानसभा मतदारसंघातून तिकीट जाहीर झाल्यानंतर राष्ट्रीय लोक दलाचे उमेदवार राजपाल बल्यान यांनी नरेश टिकैत यांची भेट घेतली होती. त्यानंतर नरेश टिकैत यांना समर्थन दिल्याचे समोर आले होते. याच मुद्यावरुन राकेश टिकैत या प्रश्न विचारण्यात आले. त्यांनी सांगितले की, आम्ही अद्याप कोणालाही समर्थन दिलेले नाही आणि आम्ही लवकरच आमच्या अधिकृत सोशल मीडियाद्वारे याची माहिती देऊ. विविध पक्षांचे नेते गावागावात पोहोचत आहेत. त्यामुळे तुम्ही निवडणूक लढवा, असे सर्वांना सांगितले जात आहे. तुमच्या घरी कोणी आले तर आम्ही तुमच्यासोबत आहोत, असे सांगितले जाते. आम्ही कोणाला मत द्यायचे हे सांगत नसल्याचे यावेळी राकेश टिकैत म्हणाले.
आम्ही कोणालाही समर्थन देणार नसल्याचे ठरवले आहे. कारण सर्वांनी माहित आहे की, या निवडणुकीत काय निर्णय घ्यायचा ते. त्यामुळे समर्थन दिल्याच्या ज्या बातम्या येत आहे त्या चुकीच्या आहेत. लोकांचा याबाबत काहीतरी गैससमज झाला आहे. त्यामुळे सर्व पक्षांनी त्यांच्या पद्धतीने निवडणूक लढवावी असे राकेश टिकैत यावेळी म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)