एक्स्प्लोर

Wayanad Landslide : वायनाडमध्ये निसर्गाचं रौद्ररुप; आतापर्यंत 308लोकांनी गमावला जीव, आस्मानी संकटानं अनेक संसार रस्त्यावर

Wayanad Landslide: अत्यंत मुसळधार पावसामुळे मंगळवारी पहाटे वायनाडच्या डोंगराळ भागात भूस्खलन झालेलं. या दुर्घटनेत किमान 308 लोकांचा मृत्यू झाला आहे.

Wayanad Landslides Updates: नवी दिल्ली : केरळमधील (Keral) वायनाडमध्ये (Wayanad)  झालेल्या मुसळधार पावसानं भूस्खलन होऊन अनेक कुटुंब उध्वस्थ झालीत. 29 जुलै रोजी रात्री उशिरा केरळमधील वायनाड येथे जमीन खचली, अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले. या दुर्घटनेत आतापर्यंत 308 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एक हजाराहून अधिक लोकांना वाचवण्याच बचाव पथकाला यश आलं आहे. अद्याप 29 मुलं बेपत्ता आहेत. वायनाड घटनेचे पडसाद संसदेतही उमटले आणि त्यानंतर या प्रकरणावरुन राजकारणही सुरू झाल्याचं पाहायला मिळालं. 

अत्यंत मुसळधार पावसामुळे मंगळवारी पहाटे वायनाडच्या डोंगराळ भागात भूस्खलन झालेलं. या दुर्घटनेत किमान 308 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 200 हून अधिक जखमी झाले आहेत. अजून 240 लोक अजूनही बेपत्ता आहेत. बचाव पथकाकडून युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू आहे. लष्कराच्या वतीनं काही काळासाठी बचाव कार्य थांबवण्यात आलं होतं. थोड्या विश्रांतीनंतर गुरुवारी सकाळी शोध आणि बचावकार्य पुन्हा सुरू करण्यात आलं. संततधार पावसामुळे बचावकार्यात अनेक अडथळे येत आहेत. 

लष्कराच्या वतीनं समन्वयासाठी कोझिकोड येथे ब्रिगेडियर अर्जुन सेगन यांच्यासह कर्नाटक आणि केरळ उपक्षेत्राचे जनरल ऑफिसर कमांडिंग मेजर जनरल विनोद मॅथ्यू यांच्या नेतृत्वाखाली कमांड आणि कंट्रोल सेंटरची स्थापना केली आहे.

राहुल गांधी, प्रियांका गांधी वायनाडला पोहोचले

दरम्यान, विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी वायनाडला पोहोचल्या आहेत. यादरम्यान त्यांनी वायनाड जिल्ह्यातील भूस्खलनग्रस्त भागांत उभारलेल्या विविध मदत शिबिरांनाही भेट दिली. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी मेपड्डी, वायनाड येथे या दुर्घटनेतील पीडितांची भेट घेतली. दोन्ही नेते सकाळी 9.30 वाजता कन्नूर विमानतळावर उतरले आणि त्यानंतर रस्त्यानं वायनाडला पोहोचले.

बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू 

वायनाडमधील भूस्खलनानंतर भारतीय लष्कर, हवाई दल, नौदल, एनडीआरएफ आणि स्थानिक पोलीस-प्रशासन वेगानं बचावकार्य करत आहेत. बचाव कर्मचारी उद्ध्वस्त घरं आणि इमारतींमधील लोकांचा शोध घेत आहेत, मात्र आजूबाजूला ढिगारा साचल्यानं त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

लष्करानं विक्रमी वेळेत उभारला ब्रीज 

केरळमधील वायनाड येथे झालेल्या भीषण आपत्तीनंतर भारतीय लष्कराने मदत आणि बचाव कार्याची कमान हाती घेतली आहे. गुरुवारी, सैनिकांनी विक्रमी वेळेत भूस्खलनाच्या ठिकाणाजवळील नदीवरील बेली ब्रिजचे बांधकाम पूर्ण केले. वायनाडमधून समोर आलेल्या व्हिडिओमध्ये लष्कराचे जवान 'भारत माता की जय'चा नारा देताना दिसत आहेत. भारतीय लष्कराकडून वायनाडमधील बेली ब्रिजचे बांधकाम पूर्ण झाले आहे. पुलाची ताकद तपासण्यासाठी लष्कराने प्रथम आपली वाहने नदीच्या पलीकडे नेली. काम पूर्ण झाल्यानंतर बांधकामात सहभागी असलेल्या लष्कराच्या जवानांनी ‘भारत माता की जय’च्या घोषणा दिल्या. पुलाच्या बांधकामामुळे आता जड वाहनांना दरड कोसळण्याच्या ठिकाणी नेता येणार आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर
आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर

व्हिडीओ

CM Devendra Fadnavis Parbhani : लाडक्या बहणींना लखपती बनवणार, देवाभाऊची मोठी घोषणा
Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका
Kishori Pednekar Mumbai : 'भाजप आणि सेनेने धमक्या दिल्या नाहीत आजूबाजूला चाय कम किटली गरम असता'
Amit Thackeray Solapur : अमित ठाकरेंकडून बाळासाहेब सरवदेयांच्या कुटुंबियांचं सांत्वन
Gulabrao Patil Jalgaon : मला सर्वांसोबत आय लव यू करावं लागतं गुलाबराव पाटलांची तुफान फटकेबाजी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर
आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर
Pune NCP : अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
शिवशाही बस अन् दुचाकीचा भीषण अपघात; तीन युवक जागीच ठार, हायवेवर मोठी गर्दी
शिवशाही बस अन् दुचाकीचा भीषण अपघात; तीन युवक जागीच ठार, हायवेवर मोठी गर्दी
माझी तब्येत ठीक, शुगर वाढली होती; नारायण राणेंनी दिली माहिती, राजकीय निवृत्तीबाबतही स्पष्टच सांगितलं
माझी तब्येत ठीक, शुगर वाढली होती; नारायण राणेंनी दिली माहिती, राजकीय निवृत्तीबाबतही स्पष्टच सांगितलं
Nashik Municipal Election 2026 : नाशिक महानगरपालिका: प्रभाग निहाय पक्षीय उमेदवारांची 'अशी' होणार लढत, उमेदवारांची यादी एका क्लिकवर
नाशिक महानगरपालिका: प्रभाग निहाय पक्षीय उमेदवारांची 'अशी' होणार लढत, उमेदवारांची यादी एका क्लिकवर
Embed widget