एक्स्प्लोर
Advertisement
हृदय पिळवटून टाकणारे वीरुचे ट्वीट
मुंबई: भारतीय क्रिकेटचा तडाखेबाज माजी फलंदाज त्याच्या हटके ट्वीटमुळे नेहमीच चर्चेत असतो. रिओ ऑलिम्पिकमधील भारताच्या यशावर टीका करणाऱ्या ब्रिटीश पत्रकाराला त्याने ज्या शब्दात प्रत्युत्तर दिले, त्यावर सर्व भारतीयांनी त्याचे कौतुक केले. मात्र, रविवारी काश्मीरच्या उरीमधील दहशतवादी हल्ल्यात शहीद जवानांना श्रद्धांजली देणाऱ्या त्याच्या ट्वीटचे शब्द सर्वच भारतीयांचे हृदय पिळवटून टाकणारे आहेत.
त्याच्या या ट्वीटमध्येही त्याने आपली संवेदना बोलून दाखवली आहे. तसेच दहशतवाद्यांना त्याच शब्दात प्रत्युत्तर दिले पाहिजे अशी भावनाही व्यक्त केली आहे. वीरुने उरी हल्ल्याचा निषेध करण्यासोबतच, शहीद जवानांना श्रद्धांजली वाहणारे, असे दोन ट्वीट केले आहेत.
वीरुने आपल्या पहिल्या ट्वीटमध्ये, ''उरी हल्ल्याची माहिती मिळताच मनावर आघात झाला. ते बंडखोर नव्हेत, तर ते दहशतवादीच आहेत. दहशतवादाला, योग्य ते प्रत्युत्तर दिलंच पाहिजे,'' अशी भावना व्यक्त केली आहे.
तर दुसऱ्या ट्वीटमधून त्याने शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली आहे. वीरुने आपल्या दुसऱ्या ट्वीटमध्ये, ''17 जीव, त्यांनाही कुटुंब होतं, त्यांनाही मुलं-बाळं होती. ते मातृभूमीची सेवा करत होते. पण हे दृश्य पाहून अतिशय वेदना होत आहेत.''Very very heartbroken to hear about #UriAttack They are not Rebels,they are Terrorists. Terrorism must be answered appropriately
— Virender Sehwag (@virendersehwag) September 18, 2016
17 lives. They had a family,they had a son,they had a daughter. They were serving our motherland. Pains to see this. pic.twitter.com/65WeRRhgI5 — Virender Sehwag (@virendersehwag) September 19, 2016
संबंधित बातम्या
महाराष्ट्राच्या चार सुपुत्रांना वीरमरण, शहीदांचा आकडा 18 वर
जम्मू काश्मीर : उरीमध्ये आत्मघाती हल्ला, 17 जवान शहीद
उरी हल्ल्यातील दहशतवादी पाकिस्तानीच, भारतीय लष्कराची माहिती
पाकिस्तानची भारताला पुन्हा एकदा आण्विक हल्ल्याची धमकी
वरातीऐवजी अंत्ययात्रा, नाशिकचे शहीद ठोक यांचं कुटुंब शोकसागरात शहीदांना श्रद्धांजली वाहताना गंभीरनं 'या' क्रिकेटरवर निशाणा साधला? उरीच्या सैन्यतळावर पुन्हा एकदा स्फोटांचे आवाज पाकच्या हद्दीत घुसून जशास तसे उत्तर द्या, सैन्यातून मागणीअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
निवडणूक
निवडणूक
क्रिकेट
Advertisement