News
News
टीव्हीabp shortsABP शॉर्ट्सव्हिडीओ पॉडकास्ट
X

डान्सिंग अंकलला विदिशा महापालिकेचं मोठं गिफ्ट

संजीव श्रीवास्तव यांनी एका लग्न सोहळ्यात केलेल्या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यांच्या गोविंदास्टाईल डान्सवर लोक अक्षरश: फिदा झाले.

FOLLOW US: 
Share:
भोपाळ: भन्नाट डान्समुळे अल्पावधित लोकप्रिय होत, देशभरात धुमाकूळ घालणाऱ्या डान्सर अंकलला, मध्य प्रदेशातील विदिशा महानगरपालिकेने मोठं गिफ्ट दिलं आहे. डान्सर अंकल अर्थात प्रोफेसर संजीव श्रीवास्तव यांना विदिशा महानगरपालिकेने ब्रॅण्ड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्त केलं आहे. संजीव श्रीवास्तव यांनी एका लग्न सोहळ्यात केलेल्या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यांच्या गोविंदास्टाईल डान्सवर लोक अक्षरश: फिदा झाले. संजीव श्रीवास्तव अल्पावधीतच प्रकाशझोतात आले आणि मीडियाची हेडलाईन्स बनले. त्याचाच फायदा उचलण्यासाठी विदिशा महापालिकेने अचूक टायमिंग साधलं. संजीव श्रीवास्तव यांना विदिशा महानगरपालिकेने ब्रॅण्ड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्त केलं. कोण आहेत डान्सिंग अंकल? एका लग्नातील जबरदस्त डान्समुळे सोशल मीडिया सेंसेशन बनलेल्या या काकांचा पत्ता लागला. भन्नाट डान्स करणाऱ्या या काकांचं नाव संजीव श्रीवास्तव असून ते मध्य प्रदेशच्या विदिशात राहतात. डब्बू अंकल म्हणून त्यांना ओळखलं जातं. ग्वाल्हेरमध्ये 12 मे रोजी मेहुण्याच्या लग्नाच्या संगीतातील त्यांचा खुदगर्ज सिनेमातील आप के आ जानेसे या गाण्यावरील डान्सचा व्हिडीओ व्हायरल झाला. 'आप के आ जाने से..' काकांचा गोविंदा स्टाईल भन्नाट डान्स  नागपूर विद्यापीठ आणि नागपूरच्याच प्रियदर्शनी इंजिनिअरिंग कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केलेले संजीव श्रीवास्तव भाभा इंजिनिअरिंग रिचर्स इन्स्टिट्यूटमध्ये काम करतात. मिथुन चक्रवर्ती आणि गोविंदाकडून डान्सची प्रेरणा मिळाली. पण गोविंदाच्या गाण्यावर जास्त डान्स केले. कॉलेजमध्ये असताना स्टेजवर डान्स करायचो. पण 1998 मध्ये डान्स करणं बंद केलं होतं, असं संजीव श्रीवास्तव यांनी एबीपी न्यूजशी बोलताना सांगितलं. सध्याच्या काळात हृतिक रोशनचा डान्स आवडतो, तो कम्प्लिट डान्सर आहे. त्याच्या 'कहो ना प्यार है' गाण्याच्या स्टेपवर डान्स केला होता, असंही ते म्हणाले. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सतत कॉल येत असल्याचंही संजीव श्रीवास्तव यांनी सांगितलं. मुख्यमंत्र्यांकडून कौतुक देशभर गाजणाऱ्या डान्सर अंकल अर्थात संजीव श्रीवास्तव यांचं मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनीही कौतुक केलं. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी स्वत:च्या ट्विटर अकाऊंटवरुन संजीव श्रीवास्तव यांचा व्हिडीओ शेअर केला. त्यासोबत लिहिलं, “विदिशात काम करणारे प्रोफेसर श्री संजीव श्रीवास्तवजी यांनी देशभरातील इंटरनेटवर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. विश्वास ठेवा अथवा नको, पण मध्य प्रदेशच्या पाण्यात काहीतरी खास आहे”, असं ट्विट शिवराजसिंह चौहान यांनी केलं. संबंधित बातम्या  गोविंदासारखा डान्स करणाऱ्या काकांचा पत्ता लागला!   'आप के आ जाने से..' काकांचा गोविंदा स्टाईल भन्नाट डान्स 
Published at : 04 Jun 2018 11:08 AM (IST) Tags: govinda

आणखी महत्वाच्या बातम्या

आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट

आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट

Rahul Gandhi : सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा

Rahul Gandhi : सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा

Rahul Gandhi : राहुल गांधी यांचं हेलिकॉप्टर झारखंडमध्ये रोखलं, ATC कडून परवानगी न मिळाल्यानं थांबून राहावं लागलं,काँग्रेसचा दावा

Rahul Gandhi : राहुल गांधी यांचं हेलिकॉप्टर झारखंडमध्ये रोखलं, ATC कडून परवानगी न मिळाल्यानं थांबून राहावं लागलं,काँग्रेसचा दावा

मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी

मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी

Pimpri Assembly Constituency: बालेकिल्ल्यात दोन्ही ‘राष्ट्रवादी काँग्रेस’ची प्रतिष्ठेची लढाई; बनसोडे पुन्हा हॅट्रीक मारणार की सुलक्षणा शीलवंत धुळ चारणार?

Pimpri Assembly Constituency: बालेकिल्ल्यात दोन्ही ‘राष्ट्रवादी काँग्रेस’ची प्रतिष्ठेची लढाई; बनसोडे पुन्हा हॅट्रीक मारणार की सुलक्षणा शीलवंत धुळ चारणार?

टॉप न्यूज़

Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब

Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब

Horoscope Today 16 November 2024 : आज शनिवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today 16 November 2024 : आज शनिवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य

Astrology : आज गजकेसरी योगासह बनले अनेक शुभ योग; मेषसह 4 राशींना होणार अपार धनलाभ, नशिबाला लागणार चार चाँद

Astrology : आज गजकेसरी योगासह बनले अनेक शुभ योग; मेषसह 4 राशींना होणार अपार धनलाभ, नशिबाला लागणार चार चाँद

Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय

Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय