Pimpri Assembly Constituency: पिंपरीत अजितदादांच्या राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे यांची हॅट्ट्रिक; इतक्या हजारांंचं घेतलं मताधिक्य
Pimpri Assembly Constituency: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील पक्षफुटीनंतर दोन गट झालेत. या विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी विरूध्द राष्ट्रवादी अशी लढत होणार आहे.
Pimpri Assembly Constituency: पिंपरी विधानसभा मतदारसंघ हा पुण्यातील महत्त्वाच्या विधानसभेपैकी एक आहे. हा विधानसभा मतदारसंघ हा मावळ लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. पिंपरी मतदारसंघाचा परिसर मोठ्या प्रमाणात औद्योगिक आणि शहरी असल्याने येथील निवडणुकीचे वातावरण नेहमीच रंजक बनते. या भागात नवीन विमानतळ उभारण्याचाही महाराष्ट्र सरकारचा प्रस्ताव असून, त्यामुळे ते आणखी महत्त्वाचे होणार आहे. त्याचबरोबर राज्यातील राजकारणात झालेल्या बदलामुळे राजकीय समीकरणे बदलेली होती . तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील पक्षफुटीनंतर दोन गट झालेत. या विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी विरूध्द राष्ट्रवादी अशी लढत झाली. पण यामध्ये पुन्हा एकदा विद्यमान आमदार अण्णा बनसोडे यांनी विजयाचा गुलाल उधळला आहे. पहिल्या फेरीपासून बनसोडे आघाडीवर होते. त्यांनी राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या सुलक्षणा शिलवंत यांचा 36,698 मतांनी पराभव केला आहे.
पिंपरी विधानसभेचे राजकारण
2009 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अण्णा बनसोडे यांनी पिंपरीची जागा जिंकून राष्ट्रवादीचा प्रभाव वाढवला. मात्र, 2014 मध्ये शिवसेनेचे उमेदवार गौतम चाबुकस्वार विजयी झाल्याने या जागेवरील राजकीय समीकरणे बदलली होती. 2014 च्या निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीचा प्रभाव या जागेवरही दिसून आला, त्यात शिवसेनेने मजबूत पकड मिळवली.
2019चा निकाल काय?
2019 च्या विधानसभा निवडणुकीत राजकीय समीकरणे पुन्हा बदलली. यावेळी राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे यांनी पुन्हा ही जागा काबीज करत भाजप-शिवसेना युतीच्या विरोधात मोठा विजय मिळवला. या निवडणुकीत अण्णा बनसोडे यांना 86,985 मते मिळाली, त्यांनी शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव करून मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा बळकट केलं. अण्णा बनसोडे यांची लोकप्रियता आणि त्यांनी केलेल्या विकासकामांचा परिणाम त्यांच्या विजयात महत्त्वाचा वाटा आहे.
2009 आणि 2019 मध्ये राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे विजयी झाले होते, तर 2014 मध्ये शिवसेनेने विजय मिळवला होता. यामुळे पिंपरीचा राजकीय मूड बदलत राहतो आणि जनता दरवेळी नवीन उमेदवार व पक्षाला संधी देत असल्याचे स्पष्ट होते. यावेळी राष्ट्रवादीत फुट झाल्याने राष्ट्रवादीचे दोन्ही गट आमने-सामने येणार आहेत.
विधानसभेचे आत्ताचे उमेदवार
पिंपरी मुळशी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाने पुन्हा एकदा सुलक्षणा शिलवंत यांना संधी दिली होती. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाने पुन्हा एकदा विद्यमान आमदार अण्णा बनसोडे यांना उमेदवारी देण्यात आली होती. पिंपरी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुलक्षणा शीलवंत- धर यांची 2019 च्या विधानसभा निवडणुकीत ऐनवेळी उमेदवारी कशी कापली गेली होती.