एक्स्प्लोर
हिंदू विद्यार्थ्यांच्या जबरदस्ती रमजानच्या रोजाचं व्हायरल सत्य
नवी दिल्ली : सोशल मीडियात रोज अनेक मेसेज, फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. या व्हायरल मेसेज, फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून थक्क करणारे अनेक दावे केले जातात. सध्या असाच एक मेसेज व्हायरल होत असून, यातून उत्तर प्रदेशमधील अलीगड मुस्लीम विद्यापीठातील हिंदू विद्यार्थ्यांना जबरदस्तीने रमजाने रोजे (उपवास) करावे लागत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
तसेच मुस्लीम विद्यार्थ्यांन सोबतच इतर विद्यार्थ्यांना पहाटे 3 वाजताच सकाळचा नाश्ता दिला जातो. यानंतर त्यांना दिवसभर काही दिलं जात नाही. असंही सांगितलं जात आहे.
या मेसेजची सत्यता पडताळण्यासाठी एबीपी न्यूजची टीम अलीगड मुस्लीम विद्यापीठात दाखल झाली. एबीपी न्यूजच्या प्रतिनीधींनी सर सैय्यद हॉल या वस्तीगृहाची पाहाणी केली, त्यावेळी जे कॅन्टीन दुपारच्या जेवणाच्या वेळेस विद्यार्थ्यांच्या गर्दीनं भरलं असतं, तेच कॅन्टीन रिकामं असल्याचं पाहायला मिळालं.
यानंतर अधिक चौकशी करण्यासाठी एबीपी न्यूजच्या टीमने डायनिंग हॉलचे इंचार्ज शमशुद्दीन यांची भेट घेतली. यावेळी शमशुद्दीन यांनी सांगितलं की, ''या कॅन्टीनमध्ये इतर दिवशी सकाळी 7 ते 9 नाश्ता, दुपारी 12 ते 2.30 जेवण उपलब्ध असते. पण रमजानचे उपवास सुरु असल्याने विद्यार्थ्यांना भल्या पहाटेच नाश्ता आणि जेवण दिलं जातं.''
याची अधिक पडताळणी करण्यासाठी एबीपी न्यूजच्या टीमने मुस्लीम सोडून इतर समाजातील विद्यार्थ्यांना गाठलं. यात राजेश्वर नावाच्या विद्यार्थ्याने सांगितलं की, ''सध्या सकाळचा नाश्ता, आणि दुपारचे जेवण विद्यापीठाच्या कॅन्टीनमध्ये उपलब्ध नसते. त्यामुळे आम्हाला आसपासच्या हॉटेलमध्ये जाऊन जेवण करावं लागतं. पहाटे तीन वाजता उठून नाश्ता करणं आम्हाला शक्य नाही. त्यामुळे जे विद्यार्थी रमजानचे रोजे (उपवास) करत नाहीत, त्यांची मोठी गैरसोय होते.''
विद्यार्थ्यांच्या या गैरसोयीमुळे विद्यापीठ प्रशासनाने मुस्लीम सोडून इतर विद्यार्थ्यांचा विचार कधी केला आहे का? असा प्रश्न उपस्थित होतो. याचं उत्तर जाणून घेण्यासाठी एबीपी न्यूजच्या टीमने विद्यापीठाच्या जनसंपर्क विभागाशी संपर्क साधला. त्यावेळी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी ओमर पीरजादा आणि इतर अधिकाऱ्यांनी बोलण्यास नकार दिला. पण पीरजादा यांनी उप कुलगुरुंशी चर्चा केल्यानंतर, एबीपी न्यूजशी बोलण्याची तयारी दर्शवली.
पीरजादा यांनी सांगितलं की, ''विद्यापीठातील जे विद्यार्थी उपवास करत नाहीत, ते इतर विद्यार्थ्यांच्या सहमतीने एक-दुसऱ्यांसोबत राहतात. पण यावर्षी विद्यार्थ्यांनी वस्तीगृहात वर्षभर जेवणाची सुविधा उपलब्ध करुन देण्याची मागणी केली. त्या मागणीचा विद्यापीठ प्रशासनाने गांभीर्याने विचार करुन, जेवण उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला आहे.''
वास्तविक, एबीपी न्यूजची टीम व्हायरल मेसेजची सत्याता पडळण्यासाठी जेव्हा अलीगड विद्यापीठात दाखल झाली, तेव्हा विद्यापीठात मोठा गोंधळ उडाला होता. यानंतर विद्यापीठ प्रशासनाने तत्काळ रमजानच्या काळातही जेवण आणि नाश्त्याची सुविधा उपलब्ध करुन देण्याची घोषणा केली.
एबीपी न्यूजची टीम विद्यापीठात 1 वाजता दाखल झाली होती. पण तब्बल एक तासात म्हणजे 2 वाजून 7 मिनिटांनी विद्यापीठ प्रशासनाने नवा आदेश काढून जेवणाची व्यवस्था उपलब्ध करुन देणार असल्याचं सांगितलं. त्याची माहिती विद्यापीठाने एबीपी न्यूजला मेलद्वारे दिली.
या मेलमध्ये, ''अलीगड मुस्लीम विद्यापीठ प्रशासानाने, उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरु होईपर्यंत विद्यापीठातील विद्यार्थ्यांना दुपारचे जेवण उपलब्ध करुन दिले जाईल,'' असं सांगितलं. तसेच उन्हाळ्याच्या सुट्ट्या 5 जूनपासून सुरु होणार असल्याची माहितीही यावेळी विद्यापीठाने या मेलद्वारे दिली.
पण मेलवरुन व्हायरल मेसेजमधील दावा खरा असल्याचं समोर आलं. रमजानच्या काळात अलीगड मुस्लीम विद्यापीठातील मुस्लीम सोडून इतर समाजातील विद्यार्थ्यांना जेवण आणि नाश्ता उपलब्ध होत नाही.
व्हिडीओ पाहा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement