एक्स्प्लोर

व्हायरल सत्य: सर्जिकल स्ट्राईकमध्ये 'हे' जवान सहभागी होते का?

नवी दिल्ली: गुरुवारी भारतीय जवानांनी पाकिस्तानात घुसून सात दहशतवादी अड्डे उद्धवस्त केल्यानंतर संपूर्ण देशात मोठा जल्लोष साजरा करण्यात आला. अनेक ठिकाणी फटाके फोडून हा आनंद व्यक्त करण्यात आला. कारण भारतीय सैन्यदलाने उरीमधील दहशतवादी हल्ल्यात शहीद जवानांच्या हौतात्म्याचा वचपा काढला होता. पण यानंतर सोशल मीडियावरुन एक फोटो व्हायरल कमालीचा होत आहे. या फोटोत दिसणारे जवान सर्जिकल स्ट्राईकमध्ये सहभागी झाल्याचा दावा केला जात आहे. हा फोटो सोशल मीडियावरुन व्हायरल होत असताना भारतीय सैन्यदलाच्या या सहसाला आभिवादन केले जात असले तरी हा फोटो खरंच त्याच जवानांचा आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. अन् हा फोटो जर खरंच त्या जवानांचा असेल, तर असा फोटो सोशल मीडियावरुन व्हायरल होणे पूर्णपणे चुकीचं आहे. कारण यामुळे या जवानांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. पण जर हा फोटो चुकीचा असेल, तर या पाठीमागचे सत्यही समोर येणे अतिशय महत्त्वाचे आहे. कारण जर हे जवान सैन्यदलाच्या दुसऱ्या कोणत्या ऑपरेशनमध्ये सहभागी झाले असतील, अन् त्याचा संबंध सर्जिकल स्ट्राईकशी जोडल्यानेही त्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर येऊ शकतो. या फोटोच्या सत्यतेची पडताळणी एबीपी न्यूज टीमचे प्रतिनिधी नीरज राजपूत यांनी केली. त्यांनी हे फोटो काही सैन्यदल आणि वायूदलाच्या अधिकाऱ्यांना दाखवले. वायूदलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे जवान एका मिलिट्री ट्रान्सपोर्ट विमानात दिसत आहेत. त्यामुळे हा फोटो चुकीचा असल्याचा पहिला पुरावा त्यांनी दिला. कारण, पीओकेवर झालेल्या सर्जिकल स्ट्राईकवेळी स्पेशल फोर्स कमांडोजनी कोणत्याही विमानाचा वापर केला नव्हता. सर्जिकल स्ट्राईकसाठी हे कमांडो जम्मू-काश्मीरमधील सैन्यदलाच्या उत्तरेकडील दोन गुप्त ठिकाणातून एलओसीपर्यंत हेलिकॉप्टरमधून गेले. यानंतर हे जवान एलओसीवर हॅलिकॉप्टरमधून उतरुन सरपटत पीओकेमध्ये दाखल झाले होते. त्यामुळे सैन्यदलाच्या सूत्रांनी हा फोटो पाहताक्षणीच तो बोगस असल्याचे सांगितलं. या फोटोतील जवानांनी जे हेलमेट वापरले आहे, तेही एखाद्या मिलिट्री एअरक्राफ्टमधून पॅरा जम्पिंगवेळी वापरले जाते. तेव्हा 28-29 सप्टेंबरच्या मध्यरात्री झालेल्या सर्जिकल स्ट्राईकमध्ये अशा कोणत्याही एअरक्राफ्टचा वापर केला नव्हता, हे ही त्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे एबीपी न्यूजच्या या पडताळणीत व्हायरल होणारा फोटो चुकीचा असल्याचं उघड झालं आहे. VIRAL-2 तसेच आपणा सर्वांना अशा प्रकारचे मिलिट्री ऑपरेशनचे फोटो सोशल मीडियावरुन व्हायरल करु नयेत असं आवाहन आम्ही सर्वांना करत आहोत. कारण असे करण्याने जवानांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.

महत्त्वाच्या बातम्या

पृथ्वीचं तापमान वाढणार, आत्तापर्यंतचे सर्व विक्रम मोडणार! 19 व्या शतकानंतर सर्वात शक्तिशाली एल निनो
पृथ्वीचं तापमान वाढणार, आत्तापर्यंतचे सर्व विक्रम मोडणार! 19 व्या शतकानंतर सर्वात शक्तिशाली एल निनो
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
सोनं चांदी आवाक्याबाहेर! युवकानं तयार केल्या शेणापासून राख्या, आकर्षक आणि पर्यावरणपूरक राख्यांना मागणी
सोनं चांदी आवाक्याबाहेर! युवकानं तयार केल्या शेणापासून राख्या, आकर्षक आणि पर्यावरणपूरक राख्यांना मागणी
साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल, मिठाई विक्रेते ते बेकर्ससाठी नवीन नियमावली जारी, नियमांचं उल्लंघन केल्यास कारवाई 
साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल, मिठाई विक्रेते ते बेकर्ससाठी नवीन नियमावली जारी, नियमांचं उल्लंघन केल्यास कारवाई 

व्हिडीओ

Solpaur Drought Marriage Special Report : 350 तरुणांची लग्न पाण्याखाली रखडली? ABP Majha
Bhuleshwarcha Raja Special Report : भुलेश्वरच्या दुर्घटनेचं कारण काय? मुंबईतील गणेश मंडळं सावध
Gen Z Special Report : नेत्यांची व्होट बँक जेन झी, राजकीय नेत्यांकडून मेळावे : ABP Majha
Ravindra Sathe Majha Katta : आम्ही ठाकर, ठाकरss अजरामर गाण्याचा जादुई आवाज, रवींद्र साठेंसोबत गप्पा
Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : विदेशी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, ऑगस्टमध्ये भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले, जाणून घ्या सविस्तर 
जुलैचा ट्रेंड ऑगस्टमध्ये कायम ठेवला, FPI नं भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले,तज्ज्ञ म्हणतात... 
Sambhajinagar News: तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
Chhatrapati Sambhajinagar News: हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
Baramati News: रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
Embed widget